फोन हा हल्ली सगळ्यांच्याच जवळचा आहे. जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलेले असतानाही खूप जणांना हातात फोन घेऊन काहीही बघत राहण्याची सवय झाली आहे. तरुणांमध्ये फोनचा वापर अधिक आहे असे वाटत असले तरी देखील फोनचा सगळ्यात जास्त वापर हा सध्या ज्येष्ठ नागरिक करताना दिसत आहेत. वेळ जात नाही म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक फोनवर नाहक वेळ घालवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आराम हा महत्वाचा आहे.फिरणे आणि आयुष्य जगणे हे महत्वाचे आहे. पण असे असले तरी देखील ते फोनमध्ये काय पाहतात. त्यामुळे काही वाईट परिणाम होऊ शकतात का? ते जाणून घेणे गरजेचे असते
व्हिडिओ अती पाहणे
घरी राहून काय करायचे? मालिकांनाही वेळ ठरलेली असते. त्यामुळे दिवसभर टाईमपास करण्यासाठी फोनवर असलेले व्हिडिओ ॲप ज्येष्ठ नागरिकांकडून जास्त वापरले जातात. व्हिडिओ पाहताना येणाऱ्या जाहिराती आणि त्यामधून येणाऱ्या लिंक्स या अनेकदा नको ते नुकसान करण्यास कारणीभूत ठरु शकता. शिवाय सतत काहीतरी घरगुती इलाजाचे व्हिडिओ पाहून आजारांकडे दुर्लक्ष करणारे ज्येष्ठ नागरिकही दिसू लागले आहेत. आपल्या आरोग्याची काळजी आणि इलाज फक्त व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकतो असे वाटू लागल्यामुळेच की काय ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरपेक्षा यामधील सल्ले अधिक जवळचे वाटू लागतात. जर तुमच्या घरातील व्यक्ती फोनचा असा अति वापर करत असेल तर फोन काढून घेणे नक्कीच चांगले
झोपेची कमतरता
ज्येष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्येही फोनचा वापर जास्तच आहे. पण झोपेची आणि आरामाची गरज ज्येष्ठ नागरिकांना असते. खूप जणांना फोन वापरण्याची इतकी तंद्री लागते की, आपण किती वेळ फोन वापरतो याचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम झोपेवर होऊ लागतो. ज्येष्ठांमध्ये झोपेची कमतरता झालेली असते. त्यात आणखी कमी झाली की, त्याचा परिणाम हा डोळ्यांवर होऊ लागतो. अंग दुखी, हात दुखी या काही गोष्टी त्यामुळे होऊ शकतो.
घरगुती उपायांनी करा वात रोग उपचार मराठी
नको ते व्हिडिओ पाहणे
खूप जणांना सोशल मीडियाचा वापर करणे कळत नाही.काही वेळा सर्च इंजिनच्या माध्यमातून काहीतरी पाहताना ते कोणत्या नको त्या वेबसाईलमध्ये जातात ते खूप जणांना कळत नाही. अशावेळी पॉर्न साईट किंवा अशा तत्सम साईडला नाहक भेट दिली जाते. मग त्याचीही घाणेरडी सवय लागू शकते. अशा वेबसाईटला भेट देताना सायबर सिक्युरीटीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या फोनमधून काही गोष्टी काढून टाका. कारण त्यांच्या फोनवर लक्ष असणे या कारणासाठी गरजेचे असते.
चिडचिड वाढणे
लहान सहान कारणावरुन ज्येष्ठांची चिडचिड होणे अगदी साहजिक आहे. पण खूप ज्येष्ठ नागरिकांच्या चिडचिडीमागे हल्ली फोन कारणीभूत ठरु लागला आहे. हल्ली सगळ्यांकडे अँड्राईंड फोन आहेत. त्यामुळे त्यातून डोकं बाहेर काढायला लावल्यावर त्यांना राग येतो. इतकेच नाही. तर त्यांचे इतर कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. त्यांना इतर काहीही करायची इच्छा नसते. असे जर होत असेल तर ज्येष्ठ नागरिकांना थोड्या वेगळ्या कामाला लावा.
आता तुमच्या घरातील आई-वडील किंवा इतर कोणीही मोठे सतत फोनवर असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढा.
अधिक वाचा