ADVERTISEMENT
home / आरोग्य
केवळ 5 तासच झोप मिळत असेल तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

केवळ 5 तासच झोप मिळत असेल तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही जर 24 तासांमध्ये पुरेशी झोप न मिळणं हे कोणाच्याही तब्बेतीसाठी नक्कीच चांगले नाही. तुम्ही जर सतत काम करत असाल तर तुमच्या शरीराला त्यामुळे त्रास होईल आणि त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुम्ही जर दिवसातले 5 तासच झोपत असाल तर हे तुमच्या प्रकृतीसाठी नक्कीच चांगले नाही. यामुळे थकवा येऊन तुम्हाला अधिक त्रास होईल. American Academy of Sleep Medicine (AASM) च्या एका शोधानुसार या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे. तुम्हाला जर पुरेशी झोप मिळत नसेल तर आपल्या शरीराला अधिक समस्या होतात. याशिवाय काही रिसर्चमध्ये सिद्ध झाले आहे की, झोप न मिळाल्याने अनेक तऱ्हेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे नक्की कोणकोणते भयंकर परिणाम होतात ते आपण या लेखातून पाहू. 

स्मरणशक्तीवर होतो परिणाम

Shutterstock

झोपेदरम्यान डोकं असं काम करते ज्यामुळे आपल्याला डोक्यात गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत मिळते. झोपेची कमतरता झाल्यास, मेंदूतील हे फंक्शन्स काम नाही करकत आणि त्यामुळे स्मरणशक्तीशी निगडीत समस्या सुरू होते. त्यामुळे तुम्हाला किमान दिवसाची 8 तास तरी झोप हवी. अन्यथा सर्वात पहिला परिणाम होतो तो म्हणजे स्मरणशक्तीवर. 

ADVERTISEMENT

मूडमध्ये होतात बदल

झोप पूर्ण न झाल्यामुळे डोक्याला सतत थकवा जाणवतो. या थकव्यामुळे तुमचा स्वभावही सतत चिडचिडा होतो आणि नक्की आपल्यासह हे बदल का होत आहेत हे कळत नाही. अशावेळी नैराश्य, अस्वस्थता नक्की का वाढते तेदेखील कळत नाही. पण झोप न झाल्याने डोकं सतत दुखत राहातं आणि त्यामुळे चिडचिड आणि चिडचिड वाढल्याने नैराश्यताही वाढते.

दुपारी ऑफिसमध्ये येत असेल झोप तर करा अशी नियंत्रित, सोप्या टिप्स

प्रतिकारशक्तीवरही होतो परिणाम

झोप कमी होणं हे प्रतिकारशक्ती कमी होण्याचं मुख्य लक्षण आहे. अशावेळी सर्दी, खोकला, ताप आणि अन्य व्हायरल आजार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना हे आजार होत नाहीत. पण झोप न झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन आजार पटकन होण्याची शक्यता असते. 

मधुमेहाचा धोका

ADVERTISEMENT

Shutterstock

झोप कमी झाल्याने शरीरामध्ये इन्शुलिनची पातळी कमी होते आणि यामुळेच मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो आणि मधुमेह झाल्याने पुन्हा झोपेची समस्या होते आणि ही चक्र चालूच राहते. यामुळे तुमच्या शरीरावर पटकन परिणाम होतो. तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणे आणि अन्य त्रासही उद्भवतात. त्याशिवाय तुम्ही झोप पूर्ण केली नाहीत तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी जास्त होते आणि मधुमेह अधिक वाढतो आणि शरीर आतून पोखरले जाते. यामुळे पुढे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पर्याप्त झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

सेक्समध्ये येते निरसता

ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही त्यांना सेक्समध्येही निरसता असल्याचे आढळते. झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील हार्मोन्स कमी होतात आणि त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे सेक्स करताना निरसता येणे अथवा समाधान देऊ न शकणे अशा समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. 

ADVERTISEMENT

शरीराचे संतुलन बिघडणे

तुम्ही जर बरेच दिवस केवळ 5 तास अथवा त्यापेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमच्या शरीराला आणि मेंदूला अचानक थकवा येतो आणि त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडून तुम्हाला चक्कर येणे आणि डोकेदुखी होणे अशा समस्या सतावू शकतात. शरीराचं संतुलन बिघडलं की त्यानुसार मनाचं संतुलन बिघडायलाही वेळ लागत नाही.

झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

वजनात होते वाढ

Shutterstock

ADVERTISEMENT

झोप व्यवस्थित न घेतल्यास, वजनामध्येही अचानक वाढ होऊ लागते. कमी झोप घेतल्याने डोक्यावर वेगवेगळे परिणाम होऊ लागतात. त्यामुळे सतत भूक लागून सतत खाल्ले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम होतो तो शरीरावर. त्यामुळे वजनात वाढ होते. तसंच हे वजन आटोक्यात आणणं कठीण होतं. 

या सर्व वरील गोष्टींमुळे पुरेशी झोप घेणं किती गरजेचे आहे हे तुम्हाला कळले असेलच. त्यामुळे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी योग्यरित्या घेण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान 8 तास तरी झोपणं आवश्यक आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT