Care

केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश

Leenal Gawade  |  Mar 25, 2020
केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश

हल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे केसांसाठी काळजी घेणे फारच आवश्यक असते. केसांची निगा राखण्यासाठी घरगुती उपाय हल्ली पुरेशे नसतात तर काही हेअर ट्रिटमेंटसचाही आधार घ्यावा लागतो. केसांना हेअर स्पा, केरेटीन,स्ट्रेटनिंग, स्मुथिंग करणे आता अगदी कॉमन झाले आहे. तुम्ही कधीतरी या गोष्टी नक्कीच केल्या असतील. या ट्रिटमेंट केसांवर केल्यानंतर त्यांची काळजी राखणे फारच आवश्यक असते. तुम्हाला यासाठी हेअर एक्सपर्टकडून काही टिप्सही दिल्या जातात. या सगळ्याचे तंतोतंत पालन आपण करतो. पण कधी कधी काही गोष्टी अशा करतो की, ज्यामुळे तुमच्या सगळ्या मेहनतीवर आणि पैशांवर पाणी फिरते. अशा ट्रिटमेंट केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या केसांना तेल लावत असाल तर थोडा ब्रेक लावा कारण…. हेच कारण आज आपण जाणून घेऊया.

‘स्ट्रेटनिंग’मुळे तुमचेही केस झाले आहेत खराब मग एकदा वाचाच

ट्रिटमेंट्सचा परिणाम करते कमी

shutterstock

ज्यावेळी तुम्ही हेअर स्पा, हेअर स्मुथिंग किंवा कोणतीही हेअर ट्रिटमेंट करता त्यावेळी तुमच्या केसांवर काही केमिकल्सचा वापर केला जातो. तुमच्या केसांसंदर्भात असलेल्या तक्रारी लॉक करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही ट्रिटमेंट केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 दिवस तरी केसांची काळजी घ्या असे सांगितले जाते. याचे कारण असे असते की, तुमच्या केसांमध्ये या गोष्टी व्यवस्थित मुरायला हव्या. काही ट्रिटमेंटमध्ये ही काळजी जास्त काळासाठी म्हणजे किमान 3 महिन्यांसाठी तरी असते. आता या काळात तुम्ही केसांना मस्त रगडून तेल मालिश केलं तर तुम्हाला बरं वाटेल. पण तुम्ही केलेल्या ट्रिटमेंटवर पाणी फिरेल. याचे कारण असे की, तेलामुळे तुमच्या केसांवर असलेल्या क्रिम्स निघून जातात. त्यामुळे या ट्रिटमेंटचा परिणाम कमी करते.  तुम्हाला तुमचे केस ट्रिटमेंट केल्यानंतर जसे वाटतात तसे वाटत नाहीत.

केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

केस होतात रुक्ष

प्रत्येकाची तेलाची निवड वेगळी असते. काहींना नारळाचे तेल, काहींना बदामाचे तेल आवडते. आता प्रत्येकाचे टेक्शचर वेगळे असते. केसांना ट्रिटमेंट केल्यानंतर तुमचे केस छान सिल्की झालेले असतात. हा सिल्कीपणा तेलामुळे निघून जातो. केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही जरी तुम्हाला दिलेल्या शॅम्पूने केस धुतले तरीही तुमच्या केसांचा पोत हा रुक्ष लागू लागतो. तुमचे केस पूर्ववत होऊ लागतात. जे तुम्हाला कधीच व्हावेसे वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही तेल लावण्याची ही चूक करु नका.

ट्रिटमेंटचा कालावधी होतो कमी

हेअर स्मुथिंग, केरेटीन ट्रिटमेंट टिकण्याचा कालावधी हा तुमच्या केसांच्या निगा घेण्यावरही अवलंबून असतो. तुम्ही तुमच्या केसांना तेलाने मालिश केल्यामुळे तुमच्या ट्रिटमेंटचा कालावधी कमी होतो. तुम्हाला तुमच्या स्टायलिशने तुम्ही केलेली ट्रिटमेंट साधारण 6  महिने टिकेल असे सांगितले असेल पण चार महिन्यातच तुम्हाला तुमचे केस पूर्ववत झाल्यासारखे वाटत असेल तर ही तुमची चुकी आहे की तुम्ही या कालावधीत तेल लावले. तेलामुळे तुमच्या केसांना लावलेले सोल्युशन निघून जाते. तुमच्या ट्रिटमेंटचा कालावधी कमी होतो.

केसांची स्वच्छता असते महत्वाची

shutterstock

केसांना तेल लावण्याचे कारण असते आराम मिळणे.  पण तुम्ही केसांना तेल लावल्यानंतर ते तेल तुमच्या केसांमधून स्वच्छ निघाले नाही. तर मग तुमच्या केसांच्या ट्रिटमेंटसचा काहीच उपयोग नाही. केसांना लावलेले तेल काहींना कधीच स्वच्छ करता येत नाही. काही जण तेल काढण्यासाठी शॅम्पूचा इतका वापर करतात की, त्यामुळेही तुमचे केस खराब होतात. 

आता केसांना ट्रिटमेंट चांगले करण्यासाठी ट्रिटमेंट करुन घेतल्यानंतर तुम्ही कधीही तेल मालिश करण्याची कधीही करु नका चुकी.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Care