DIY लाईफ हॅक्स

लहान बाळांना डायपर्स घालताय मग एकदा वाचाच

Leenal Gawade  |  Jun 22, 2021
लहान बाळांना डायपर्स घालताय मग एकदा वाचाच

लहान बाळांना बाहेर घेऊन जायचे असेल तर अशावेळी खूप जण त्यांना डायपर घालतात. बाहेर असताना मुलांनी शीशी आणि सूसू करु नये म्हणून त्यांना हे डायपर्स घातले जातात. पण खूप जण मुलांना सतत डायपर्स घालून ठेवतात. पण मुलांना सतत डायपर्स घालायला हवे का? मुलांनी साधारण किती तासांसाठी डायपर्स घालायला हवा असा विचार तुम्हाला पडला असेल तर लहान बाळांना डायपर्स घालण्याचे फायदे आणि तोट जाणून घेऊया. फायद्यापेक्षा डायपर्स घालण्याचे तोटे हे अधिक आहेत असे लक्षात येईल. जर तुम्ही आई होणार असाल किंवा तुमच्या घरातही तान्हुले बाळ असेल तर तुम्ही एकदा ही महत्वाची माहिती वाचाच.

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

डायपर्स म्हणजे काय?

लहान मुलं सतत सू सू आणि शी शी करत असतात त्यामुळे खूप वेळा त्यांचे कपडे बदलायला कंटाळा येतो. अशावेळी मुलांची सू आणि शी काढण्याचा त्रास कमी करण्यासाठी डायपर्स  बनवलेले आहेत. डायपर्सच्या वापरामुळे शी शी सू सू साफ करणे सोपे जाते.  त्यांना कोणाकडेही देणे शक्य होते. डायपर्सच्या शोधामुळे खूप त्रास हा कमी होतो. डायपर्समध्ये अनेक प्रकार देखील मिळतात. ज्यांच्या वापरामुळे अधिक वेळेसाठी शीशी सूसू धरण्यास मदत मिळते. 

पहिल्या दिवसापासूनच बाळाची घ्या अगदी सौम्यपणे काळजी, महत्त्वाच्या गोष्टी

डायपर्स घालत असाल तर…

जर तुम्ही डायपर्स घालत असाल तर काही गोष्टी या तुम्हाला माहीत असायला हव्यात. सतत डायपर घातल्यामुळे मुलांना काही त्रास होण्याची शक्यता असते. 

बाळंतपणासाठी होणाऱ्या आईने नेमकी काय करावी तयारी

मुलांना घाला सुती लंगोट

मुलांना डायपर घालण्याऐवजी तुम्ही सुती लंगोट घातली तर त्यांना त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे पातळ कपड्यांच्या लंगोट मुलांसाठी आणा. त्यामुळे त्यांच्या त्वचेला त्याचा त्रास होत नाही. मुलांची त्वचा ही चांगली राहते. शिवाय स्वच्छता राखायलाही मदत मिळते.

Read More From DIY लाईफ हॅक्स