Mental Health

तुम्ही तणावाखाली तर नाही ना… जाणून घ्या नैराश्य लक्षणे (Depression Symptoms In Marathi)

Leenal Gawade  |  May 27, 2021
नैराश्य कारणे मराठी

डिप्रेशन, ताण-तणाव, नैराश्य, मानसिक ताण हे शब्द हल्लीच्या दिवसात तुमच्या कानांवर खूप वेळा पडले असेल. तणाव आणि नैराश्य येण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. यासाठी ठराविक असे वय नसते. अगदी लहान मुलांपासून कोणालाही याचा त्रास होऊ शकतो. मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करणे अजिबात चांगले नाही. कारण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अन्य काही समस्या होऊ शकतात. तुम्हालाही सध्या फार अस्वस्थ वाटत असेल किंवा मन स्थिर नाही असे वाटत असेल तर तुम्हाला नैराश्याने ग्रासलेले आहे असे समजावे. याकडे दुर्लक्ष न करता. आज या लेखातून नैराश्याची योग्य माहिती घ्या. त्यामुळे तुम्हाला नैराश्य कसे दूर करावे आणि डिप्रेशन वर उपाय याची माहिती मिळू शकेल.

कडक मंगळ आणि सौम्य मंगळ, फायदे आणि तोटे

नैराश्याची लक्षणे (Depression Symptoms In Marathi)

Depression Symptoms In Marathi

तुम्हाला नैराश्य आले आहे की नाही हे कळत नसेल तर काही लक्षणांमुळे तुम्हाला तुमच्या नैराश्याची लक्षणं (depression symptoms in marathi) नक्कीच कळू शकतात. ही लक्षणं तुम्हाला काही जाणवत असतील तर तुम्ही नैराश्याने ग्रस्त आहात आणि तुम्हाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया नैराश्याची लक्षणं

अस्वस्थपणा (Anxiety)

जर तुम्हाला नैराश्य आले असेल तर तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत राहते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. उगाचच मनात वाईट वाईट विचार येऊ लागतात. असा अस्वस्थपणा एखाद्या ठराविक कारणामुळे तुम्हाला आला असेल तर तुम्हाला नैराश्य आलेले असू शकते. एखाद्या ठराविक घटनेमुळे हा अस्वस्थपणा आला असेल तर ठीक पण तो काही केल्या जात नसेल तर तुम्ही त्या बाबतीत विचार करण्याची फारच गरज आहे.

चिकनगुनिया घरगुती उपाय

कशात रस नसणे (Loss Of Interest)

एखाद्या गोष्टीने जर आपलं मन विषण्ण झालं असेल तर आजुबाजूला कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरी देखील काहीही करण्याची इच्छा आपल्याला होत नाही. जर तुमचाही अस सगळ्यातून रस निघून गेला असेल तर तुम्हाला नैराश्य आले असे समजावे. नैराश्य येणे हे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे तुमचे शारीरिक नुकसान होऊ शकते.

सतत दु:खी वाटणे (Sadness)

नैराश्य आले असेल तर तुम्हाला सतत क्षुल्लक कारणामुळेही दु:खी वाटू लागते. जर तुम्हाला असे क्षुल्लक कारणामुळे वाईट वाटत असेल आणि रडू येत असेल तर तुमच्या मनामध्ये खूप खोल काहीतरी जखम झाली आहे हे समजावे.

खूप भूक लागणे (Excessive Hunger)

कधी कधी टेन्शनमुळेही खूप जणांना सतत खाण्याचा मोह होत राहतो. कधी कधी कारण नसताना आणि भुकेची वेळ नसताना जर एखादी व्यक्ती जर खूप खात असेल तर अशी व्यक्त ही नैराश्यग्रस्त आहे असे समजावे. कारण अनेकदा तणावाखाली असताना अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे.

थकवा(Fatigue)

जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तरी देखील तुम्ही नैराश्यात आहात हे समजावे. थकवा हे देखील नैराश्याचे लक्षण (depression symptoms in marathi) आहे. शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सतत थकत असाल तर हा थकवा मानसिक तणावाचा असू शकतो.

भूक न लागणे (Loss Of Appetite)

वर सांगितल्याप्रमाणे जसे नैराश्यात असताना भूक खूप लागण्याचा त्रास होतो. अगदी तसाच त्रास म्हणजे भूक न लागण्याचा त्रास होतो. खूप जणांना काहीही खावेसे वाटत नाही. खाणे हे अगदी त्यांना नकोसे वाटू लागते. त्यामुळे अन्य शारीरिक व्याधी देखील होऊ लागतात.

लोकांमध्ये राहण्याचा कंटाळा येणे (Social Isolation)

नैराश्य आल्यानंतर एकटे एकटे राहणे खूप जणांना पसंत असते. पण सतत एकटे राहणे हे अजिबात चांगले नाही. माणूस हा समुहात राहणारा प्राणी आहे. जर तो त्यापासून सतत वेगळा राहात असेल तर अशी लोक मानसिक दृष्ट्या ती व्यक्ती कमजोर असण्याची शक्यता आहे. अशी व्यक्ती ही नक्कीच नैराश्यग्रस्त असू शकते.

लक्ष न लागणे (Lack Of Concentration)

मनावर ताण आला असेल तर एखादी गोष्ट अजिबात करण्याची इच्छा होत नाही. जर तुम्हालाही असे होत असेल तुमचे लक्ष कशातही लागत नसेल तर तुमच्याही मनावर ताण आला आहे असे दिसून येते.

कामात दिरंगाई होणे (Slowness Of Activity)

एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर झली असेल तर अशा लोकांचे कामात अजिबात मन लागत नाही. अशा लोकांच्या कामांमध्ये दिरंगाई दिसू लागते. अशा व्यक्ती या कामात खूपच स्लो होऊन जातात. जर तुमचेही का असेच मंदावले असेल तर तुम्हाला असा त्रास होण्याची शक्यता आले.

मूड स्विंग (Mood Swings)

मूड स्विंग हे देखील नैराश्याचे लक्षण (depression symptoms in marathi) आहे. जर तुमच्या वागण्यात असा बदल होत असेल तर हे तुमच्या मानसिक आरोग्याचे लक्षण दर्शवते. त्यामुळे तुम्हाला असा सतत मूड स्विंगचा त्रास होत असेल तर त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

नैराश्य कसे दूर करावे (Depression Solution In Marathi)

Depression Solution In Marathi

नैराश्य दूर करण्यासाठी डॉक्टरी इलाज तर नक्कीच असू शकतात. पण जर तुम्ही अगदी पहिल्या स्टेजवर असाल तर तुम्हाला काही गोष्टी करुन देखील नैराश्य घालवू शकता. हे इलाज फार सोपे आहेत जे तुम्ही अगदी सहज करु शकता.

मेडिटेशन (Meditation)

नैराश्याने ग्रासले असेल तर अशावेळी कशातही लक्ष लागत नाही. पण जर तुम्हाला पुन्हा व्यवस्थित व्हायचे असेल आणि मनाचा ताण घालवायचा असेल तर तुम्ही मेडिटेशन करायला हवे. त्यामुळे लक्ष केंद्रित करायला मदत मिळते. मेडिटेशन हे इतरवेळीही मानसिक समाधानासाठी चांगले असते. एखादी घटना आपल्यासोबत घडली की, आपल्याला ती सतत खात राहते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्हाला मेडिटेशन मन: शांती मिळवून देण्यास मदत करते. त्यामुळे जास्तीतजास्त वेळ मेडिटेशन करा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे फायदा होईल.

व्यायाम करा आणि खाण्याची पद्धत (Exercise And Eat Right )

नैराश्य दूर करण्यासाठी काही गोष्टींमध्ये बदल करणे हे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही नक्कीच व्यायाम करण्याची सवय लावायला हवी. व्यायामुळे शरीर फ्रेश होते. शरीर कमावण्यासारखे कोणतेही सुख नाही. जर तुम्हाला ते वेड लागले तर तुम्ही तुमच्या गोष्टीकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकता. नैराश्य आल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. इतकेच नाही त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही व्यायाम करा आणि खाण्याची पद्धत सवयी बदला तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

झोप (Sleep Schedule)

शांत होण्यासाठी झोप ही फारच गरजेची असते. इतरवेळीही शारीरिक थकवा आला की, झोप त्यावर उत्तम उपाय ठरते. मनाचा ताण हा देखील झोपेमुळे कमी होऊ शकते. नैराश्य आलेल्या व्यक्तींचे स्वास्थ्य बिघण्याचे कारण हे अपुरी झोप असते. वेळेवर न झोपल्यामुळे मनाची शांती कधीच मिळत नाही. खूप वेळा झोप पूर्ण झाली की अशा व्यक्ती या आपलं दु:ख विसरुन जातात. त्यांना थोडासा आराम मिळतो. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानिशी काही औषधे किंवा योग केल्यामुळेही शांत झोप लागण्यास मदत मिळते. त्यामुळे झोप हा त्यावर एक चांगला उपाय असू शकतो.

व्यक्त व्हा (Express Yourself)

एखाद्या गोष्टीचा खूप खोलवर त्रास झाला असेल तर खूप जण बोलणंच सोडून देतात. खूप जण बऱ्याच गोष्टी मनात ठेवायची सवय लागून जाते. अशा काही गोष्टी मनात तशात राहिल्या तर मात्र त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. अशावेळी तुम्ही व्यक्त होणे गरजेचे असते. तुमच्या ओळखीच्या समुदायात नाही. पण तुम्हाला एखादा असा हिलिंग ग्रुप मिळाला तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपले मत व्यक्त करु शकता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हलके वाटू शकते. तुम्ही नैराश्याने ग्रस्त नसलात तरी देखील मनातील काही गोष्टी वेळच्या वेळी काढून टाकणे गरजेचे असते. म्हणून शक्य असेल तेव्हा व्यक्त व्हायला शिका. त्यामुळे तुम्हाला नैराश्य येणार नाही.

चांगल्या गोष्टी बघा (Notice Good Things)

खूप वेळा नैराश्याने ग्रासले असेल तर चांगल्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा पुरता बदलून गेलेला असतो. आपल्याला काहीही करण्याची इच्छा होत नाही. सगळं जग हे नकारात्मक उर्जेने भरलेले आहे असे आपल्याला वाटत राहते. पण त्यातून बाहेर यायचे असेल तर चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे फारच गरजेचे आहे. एखादी चांगली बातमी, एखादा चांगला व्हिडिओ तुम्ही नक्कीच या काळात पाहिला तर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू लागतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी बघा आणि त्यातून काहीतरी चांगले करण्याचा विचार करा तुम्हाला नक्कीच त्यामुळे फायदा होईल. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. 7 प्रकारचे नैराश्य कोणते?

नैराश्याचे एकूण 7 प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे Major Depressive Disorder (MDD), Persistent Depressive Disorder (PDD) ,Bipolar Disorder,Postpartum Depression (PPD), Premenstrual Dysphoric Disorder (PMDD),Seasonal Affective Disorder (SAD), Atypical Depression

2. नैराश्यामुळे तुमच्या स्वभावात फरक पडतो का?

हो, नैराश्यामुळे एखादी व्यक्ती ही खूप चिडचिड्या स्वभावाच्या होतात. काही जण अगदीच शांत होऊन जातात. नैराश्य आल्यानंतर स्वभावात, वागण्यात फरक दिसून येतो. जर एखाद्यामध्ये तुम्हाला असा काही बदल दिसून आला असेल तर तुम्ही त्याच्याशी संवाद साधा आणि त्यांच्यामध्ये झालेला हा बदल टिपून त्यांना यातून बाहेर आणण्यासाठी मदत करा.

3. डिप्रेशनमध्ये काय होते?

डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्ती या वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. वर सांगितल्याप्रमाणे काही जण शांत होतात. काही जण चिडचिड करतात. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला जर त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसला नाही तर अशा व्यक्ती या काहीही करु शकतात. त्यामुळे नैराश्याची ही कडी लवकरात लवकर तोडून त्यातून बाहेर काढणेही गरजेचे असते.

Read More From Mental Health