Travel in India

या ठिकाणी साजरे करा या वर्षीचे ‘लॉंग वीकेंड’

Trupti Paradkar  |  Jan 29, 2020
या ठिकाणी साजरे करा या वर्षीचे ‘लॉंग वीकेंड’

लॉंग वीकेंड म्हणजे धम्माल मस्ती… या वर्षी बऱ्याच सुट्ट्या शनिवार आणि रविवारला जोडून आल्यामुळे तुम्हाला लॉंग वीकेंड मिळण्याची शक्यता जास्त आहे. या वर्षीच्या कॅलेंडरनुसार तुम्हाला जवळजवळ सात लाँग वीकेंड्स मिळू शकतात. सहाजिकच या मोठ्या सुट्ट्या वेकेशन प्लॅन करण्यासाठी अगदी बेस्ट आहेत. जर तुम्हाला तुमच्या नेहमीच्या कामातून ब्रेक हवा असेल किंवा तुम्हाला फिरायला आवडत असेल तर या सुट्ट्या मुळीच वाया घालवू नका. कारण भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही दोन ते चार दिवसांमध्ये फिरून येऊ शकता. आम्ही तुम्हाला या लॉंग विकेंडमध्ये वेकेशन प्लॅन करण्यासाठी काही डेस्टिनेशन सूचवत आहोत. ज्या माहितीची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

 

लॉंग वीकेंडला वेकेशन वर जाण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन – 

कुलू मनाली (Kulu manali)

हिमालयातील डोंगररांगामध्ये विमानाने जाणं तसं फार कठीण मुळीच नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादी शॉर्ट ट्रिप प्लॅन करायची असेल तर मनालीला जरूर जा. मुंबईच्या उकाड्यातून जरा दूर थंडगार विश्रांती घेण्यासाठी मनाली अगदी परफेक्ट आहे. संपूर्ण हिमाचल फिरायला नक्कीच काही दिवस लागतील मात्र फक्त मनाली तुम्ही दोन ते चार दिवसांत नक्कीच फिरून येऊ शकता. 

Instagram

केरळ (Kerala)

केरळला देवभूमी असं म्हटलं जातं. केरळ फिरण्यासाठी कमीत कमी आठवडाभराची सुट्टी गरजेची असली तरी केरळच्या काही शहरांमध्ये तुम्ही शॉर्ट टूर नक्कीच करू शकता. यासाठी कन्याकुमारी पासून कोचीन पर्यंतचं तुमचं एखादं आवडतं शहर निवडा आणि दोन-चार दिवस मस्त भटकून या. मात्र या ठिकाणी गेल्यावर केरळचे मसाले, केळ्याचे वेफर्स, सिल्कच्या साड्या यांची शॉपिंग करायला मुळीच विसरू नका

Instagram

गोवा (Goa)

दोन ते चार दिवस एखादा लॉंग वीकेंड घालवण्यासाठी गोवादेखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. गोव्यात अत्यंत कमी दरात तुम्हाला होम स्टे अथवा हॉटेलची सोय उपलब्ध होऊ शकते. शिवाय गोव्यात फिरण्यासाठी स्कुटर अथवा गाडी भाड्याने मिळते. ज्यामुळे दोन ते चार दिवस समुद्रकिनारी मुलांसोबत तुम्ही नक्कीच सुट्टीचा आनंद घेऊ शकता. शिवाय गोव्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे अगदी कमी बजेटमध्ये तुमची एक छान ट्रिप होऊ शकते.  

Instagram

पॉंडिचेरी (Pondicherry)

पॉंडिचेरी हे ठिकाण फ्रेंच आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. पॉंडिचेरीमध्ये असे अनेक आश्रम आहेत. जिथे तुम्ही अगदी कमी खर्चात राहू शकता. त्यामुळे या ठिकाणी अगदी दहा ते बारा हजारांमध्येही तुम्ही दोन-चार दिवस तुमच्या कुटुंबासोबत राहता येईल पॉंडेिचेरीमधील शांतता आणि स्वच्छता तुम्हाला एखाद्या फ्रेंच सिटीत गेल्याचा अनुभव देऊ शकते. त्यामुळे या सुट्टीत बॅग उचला आणि पॉंडिचेरीला जाण्याचा बेत आखा.

Instagram

जयपूर (Jaipur)

राजस्थानची राजधानी आणि ‘पिंक सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर दोन ते चार दिवसात  आणि कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. जयपूरमध्ये राजवाडे, प्राणीसंग्रहालय, म्युझियम, गार्डन, मंदिरं अशा अनेक ठिकाणांचा तुम्ही आनंद लुटू शकता. जयपूरमध्ये गेल्यावर राजमंदिर या प्रसिद्ध सिनेमागृहात चित्रपट पहायला मिळुच विसरू नका. आणि हो… जयपूरमधील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद जरूर घ्या.

Instagram

हम्पी (Humpi)

कर्नाटकमधील हम्पीदेखील छोट्या सुट्टीत जाण्यासाठी एक चांगलं पर्यटन स्थळ आहे. हम्पीला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे. जुनी स्मारकं, मंदिरांनी समृद्ध हम्पीत तुमचा वेळ कसा जाईल हे कळणारही नाही. या ठिकाणी स्वस्त दरात हॉटेल्स उपलब्ध असल्यामुळे कुटुंबासोबत दोन ते चार दिवस तुम्ही मस्त वेकशनचा आनंद घेऊ शकता.

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा – 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Places In Maharashtra In Marathi)

 

Read More From Travel in India