मनोरंजन

देवमाणूस पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Leenal Gawade  |  Nov 22, 2021
देवमाणूस येतोय परत

काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसतात. त्या संपल्यानंतरही अशी मालिका परत होणे नाही अशा प्रतिक्रियाही उमटतात.असेच झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेबद्दल झाले होते. ही मालिका संपून नव्या मालिकाही आल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली ही मालिका आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘देवमाणूस 2’ अशी ही मालिका असून चॅनेलने या मालिकेचा प्रोमो देखील पोस्ट केला आहे. पण देवमाणूस मालिका पुन्हा येणार म्हटल्यावर तुम्हाला डॉ. अजित कुमार देव दिसेल अशी अपेक्षा असेल तर असे मुळीच नाही कारण ही कथा दुसऱ्या रुपात पाहायला मिळणार ते पुढील काळात कळेल. अशी अपेक्षा आहे.

आलिया भट झाली ट्रोल, कारण ऐकून व्हाल हैराण

देवमाणूसची जागा घेईल तरी कोण?

डॉ. अजित कुमार देव  हे पात्र किरण गायकवाडने साकारले होते. डॉक्टर नसतानाही डॉक्टर असल्याचा आव आणून त्याने अनेकांना लुटले होते. सत्य घटनेवर आधारीत अशी ही कथा असल्यामुळे खूप जणांना या मालिकेने वेड लावले होते.  पण आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका नव्या स्वरुपात नव्या ढंगात भेटीला येणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला अजित कुमार देवचे क्लिनिक तो वाडा दिसतो. त्यानंतर त्याची पाटी पण ही पाटी काढून टाकण्यात येते. आता नेमकी कोणती कथा यामधून दाखवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. पण अद्याप या बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण आता या नव्या प्रोमोमुळेही खूप जणांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

शेवट झाला होता अर्धवट

देवमाणूस या मालिकेचा शेवट थोडा अर्धवटच होता. कारण ही मालिका संपण्याआधी डॉ.अजितकुमार देवला कोणतीही शिक्षा मिळाली नव्हती. तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता. त्यामुळे त्याला शिक्षा मिळालीच नाही असे म्हणायला हवे. त्यामुळे आता या नव्या भागात देवी सिंगला शिक्षा मिळेल की अन्य कोणाचा प्रवास दाखवण्यात येईल या बद्दल चर्चा होऊ लागली. देवमाणूस या मालिकेतील अनेक कलाकारांना खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण आता येत्या काहीच दिवसात ही मालिका पु्न्हा भेटीला येणार आहे.

ती परत येेतेय, अंतिम टप्प्यावर

सध्या झी मराठीवर अनेक मालिका नव्याने सुरु झाल्या आहेत. देवमाणूस या मालिकेचा  वेळ हा रात्रीचा होता. रात्रीच्या स्लॉटमधील मालिका ही मालिका होती. या जागी सध्या ती परत आलीये  ही मालिका सुरु आहे. पण या मालिकेमध्ये सध्या क्लायमॅक्स सुरु आहे. या मालिकेत खऱ्याचा उलगडा लवकरच होणार आहे. त्यामुळे कदाचित या मालिकेची जागी देवमाणूस घेईल असे दिसत आहे. 

आता या ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता आहे. 

अधिक वाचा

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ झाली एलिमिनेट

Read More From मनोरंजन