ADVERTISEMENT
home / बिग बॉस
स्नेहा झाली घराबाहेर

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ झाली एलिमिनेट

BB Marathi च्या घरातील स्पर्धा आता चुरशीची झाली आहे. पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये आता चढाओढ सुरु झाली आहे. या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडेल? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. कारण नॉमिनेशनमध्ये उत्कर्ष, मीरा, गायत्री, दादूस, सोनाली, स्नेहा, विशाल नॉमिनेट झाले होते. शनिवारी डेंजरझोनमध्ये उत्कर्ष, मीरा, गायत्री, दादूस आणि स्नेहा हे स्पर्धक राहिले होते. त्यामुळे खूप जणांना या आठवड्यात दादूस जाईल असे अनेकांना वाटले होते.पण सगळ्यांना धक्का बसला की, या खेळातून स्नेहा वाघ आऊट झाली आहे. जय-स्नेहामध्ये सुरु असलेली मैत्री पाहता स्नेहा थांबेल असे वाटल होते. पण स्नेहा या खेळातून इलिमिनेट झाली आहे. त्यामुळे आता स्नेहाचे ते हटके गुडमॉर्निंग पाहायला मिळणार नाही.

स्नेहाला बसला असेल याचा फटका

स्नेहा या घऱात आल्यानंतर तिची अनेक समीकरणं या घरात बदलली. काही आठवड्यानंतर या घरात जय-स्नेहाची मैत्री दिसून आली. जय-स्नेहाची मैत्री ही बाहेर दिसताना फारच वेगळी दिसते हे अनेकदा महेश मांजरेकरांनी चावडीवर स्नेहाची शाळा देखील घेतली आहे. पण तरीही स्नेहामध्ये बदल झाला नाही. एरव्ही अत्यंत समंजस असणारी स्नेहा जयच्या मागे मागे सतत दिसल्यामुळे तिच्यावर टीका देखील होत होती. पण बाहेरच्या गोष्टी तिला मांजरेकरांनी सांगूनही कळत नसल्यामुळे त्यांनीही या गोष्टी सांगणे बंद केले होते.  मैत्री आणि खेळात गल्लत केल्यामुळे अनेकदा स्नेहाचा खेळ या घरामध्ये बिघडताना दिसला आहे. त्याचा फटका या वेळी वोटिंगमध्ये झाला आहे असे दिसून आले आहे.

दादूसला मिळाली मतं

काही आठवड्यानंतर दादूस या खेळातून बाहेर होतील असे अनेकांना वाटले होते. या घरातील सर्वात सिनिअर असा चेहरा सध्या दादूस आहेत. जय आणि टीमच्या मागे मागे करणारे दादूस आता खेळात दिसू लागले आहेत. पण दादूस यांचाही खेळ काही वेळा टीममुळे बदलताना दिसला आहे. त्याचा फटका त्यांना बसेल असे देखील अनेकांना वाटले आहे. पण तरीदेखील या खेळात ते अजून टिकून आहेत. दादूस यांची समीकरणं घरात पाहता ते अजून टिकतील अशी अपेक्षा आहे. पण आता हा खेळ अधिक चुरशीचा होणार आहे.

Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे पुन्हा घेणार का एंट्री

ADVERTISEMENT

उत्कर्षला मिळाले शाब्दिक फटके

उत्कर्ष या घरातील सगळ्यात हुशार असा स्पर्धक आहे. तो या घरात डोक्याने खेळताना दिसतो. आपले काम करुन घेण्यासाठी तो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून तो सतत वार करताना दिसतो. हाताखाली जयला घेऊन तो सतत वार करताना दिसतो. त्यामुळे उत्कर्षला या आठवड्यात दरवेळी काहीना काही शाब्दिक फटके मिळताना दिसतात. गेला आठवडा हा खूपच चुरशीचा झाला. कारण या आठवड्यात अगदी इलिमिनेशन टास्कपासून टशन झालेली पाहायला मिळाली. टीम ए ला पराजय अजिबात सहन झालेला दिसला नाही. त्यामुळेच या घरात त्यांनी खेळामध्ये चीटिंग आणि आपले नियम लावताना तो दिसला आहे. पण काही का असेना त्यामुळे हा आठवडा हा खूपच चुरशीचा झाला.

आता या आठवड्याचे नॉमिनेशनचे टास्क आणि कॅप्टन्सी कशी रंगेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi:आणखी एका वाईल्ड कार्ड एंट्रीची एक्झिट, नीथा शेट्टी बाहेर

22 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT