Fitness

सुटलेल्या पोटाचा घेर सांगतो तुमच्या शरीरातील कमतरता

Leenal Gawade  |  Nov 24, 2020
सुटलेल्या पोटाचा घेर सांगतो तुमच्या शरीरातील कमतरता

तुमचं पोट सुटलंय? तुमच्या पोटाचा घेर कशापद्धतीने वाढला आहे. त्यावरुन तुमच्या शरीरात कशाची कमतरता आहे किंवा तुमच्या शरीरासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे हे ओळखता येते. तुम्ही कधी आरशात पोट निरखून पाहिलं असेल तर तुम्हाला याचा अंदाज अगदी लगेचच येईल. तुमचं पोट कशापद्धतीने सुटलयं यावरुन नेमकं काय कळतं आणि तुम्ही त्याची काळजी कशी घ्यायला हवी ते आता जाणून घेऊया.

पोट सुटले असेल तर हे 3 व्यायामप्रकार आठवड्याभरात करतील चमत्कार

अल्कोहल बेली (Alcohol Belly)

Instagram

पोट सुटण्याचा हा पहिला प्रकार तुम्हाला नावावरुन लक्षात आलाच असेल. जर तुम्ही दारुचे सेवन करत असाल तर तुमच्या पोटाचा घेर हा अशा पद्धतीने गोलाकार वाढतो. अगदी छातीपासून खाली पोट सुटायला सुरुवात होते. या पोटाचा आकार गोलाकार दिसतो. वयोमानानुसार सुटलेले पोट आणि लहान वयात दारुमुळे सुटलेले पोट यामध्ये नक्कीच फरक आहे. दारुच्या सतत सेवनामुळे असे पोट सुटले असेल तर ते आत जाणं फारचं कठीण असतं.जर तुम्ही ही दारुचे सेवन करत असाल आणि तुमचे फार कमी वयातच पोट सुटले असेल तर तुम्ही आताच ही सवय सोडून द्या. त्याऐवजी चांगला आहार घ्या. त्यामुळे तुमच्या पोट पुन्हा पूर्ववत होईल. पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. 

मॉमी बेली (Mommy Belly)

Instagram

आई होणे हे दुसऱ्या जन्मापेक्षा कमी नसते. 9 महिने बाळाचे पोटात संगोपन करताना महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यापैकी एक बदल म्हणजे अशा पद्धतीने पोट सुटणे. डिलीव्हरीनंतर महिलांचे पोट हे अशापद्धतीने सुटते. पोट वरुन आणि ओटी पोटाकडून सुटताना मध्ये एक खड्डा तयार होतो. यालाच मॉमी बेली असे म्हणतात. डिलीव्हरीच्या काही काळानंतर तुम्हाला काही करता येत नाही. पण नित्यनेमाने योग्य आहार आणि व्यायाम केला तर हे सुटलेले पोट आत जाऊ शकते.

या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट

स्ट्रेस्ड बेली ( Stressed Belly)

Instagram

तणावामुळेही पोटाचा घेर सुटू शकतो. तुम्ही कितीही चांगले खात असाल पण सतत तणावाखाली असाल तरीही तुमचे पोट सुटू शकते. स्ट्रेस्ड बेली ही साधारण मॉमी बेलीप्रमाणाचे असते. पण त्याचा आकार थोडा कमी असतो. हा ताण कामाचाच नाही तर कौंटुबिक, प्रेमामध्ये असा कसलाही असू  शकतो. जर तुमचे पोट अशापद्धतीने सुटले असेल तर  तुम्ही तुमच्यावरील तणाव कमी करण्यासाठी योग किंवा व्यायामात स्वत:ला  झोकून द्या. तुमच्या शरीराची नीट काळजी घ्या.

हार्मोनल बेली (Hormonal Belly)

Instagram

मानवी शरीरात हार्मोन बदलाचा त्रास सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो. महिलांना हार्मोन्स बदलाचा त्रास जास्त होतो. महिलांमध्ये हार्मोन्स बदलले की, त्यांना PCOS  अर्थात पिरेड्संदर्भात त्रास होऊ लागतात. असे म्हणतात की महिलांमध्ये पुरुष हार्मोन्स वाढले की हार्मोनल बेली वाढते. हार्मोनल बेली वाढली की, ओटीपोटाकडील भाग थोडासा वरच्या पोटाकडील भाग वाढत राहतो. हार्मोनल बेली ही तुम्हाला डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानिशी आहारात बदल करता येईल. 

ब्लोटेड बेली ( Bloted Belly)

Instagram

चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे ब्लोटेड बेलीचा त्रास होतो. ब्लोटेड बेली ही साधारणपणे अल्कोहल बेलीसारखी दिसते. पण जर तुम्ही दारु पित नसाल  तर तुमच्या आहारात मैदा, कोल्ड्रींक असे काही फास्ट फुड जास्त आहे हे लक्षात येते. तुम्ही तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करत असाल तर तुम्ही आतापासूनच तुमच्या आहारातून या पदार्थांना काढू टाका. योग्य व्यायाम करा तुमचे पोट कमी होईल. 

आजच आरशात तुमचे पोट कशापद्धतीने वाढले आहे पाहा आणि वेळीच तुमच्य आरोग्याची योग्य काळजी घ्या.

पोट जड झाल्यासारखे वाटत असेल तर प्या हे पाचक ड्रिंक्स

Read More From Fitness