Festive

सणासुदीसाठी हे सिल्कचे दुपट्टे तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवेच

Trupti Paradkar  |  Sep 30, 2021
different types of silk Dupattas Your Festive Wardrobe Needs

सिल्क आणि महिलांचं एक अतूट नातं आहे. ज्यामुळे प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये सिल्कची साडी अथवा ड्रेस असतोच. जसं तुम्ही सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन करता अगदी तसंच तुम्ही काही सिल्कच्या दुपट्टा म्हणजेच ओढणीचंही कलेक्शन करू शकता. कारण सिल्कचे दुपट्टे तुम्हाला एक छान क्लासिक लुक देतात. शिवाय कोणत्याही ड्रेस, एथनिक लेंगा अथव कुर्तीवर तुम्ही ते मिक्समॅच करू शकता. यासाठी जाणून घ्या सणासुदीसाठी कोणते सिल्कचे दुपट्टे तुमच्याजवळ असावेत. 

फेस्टिव्ह सीझनसाठी खास सिल्क दुपट्टा कलेक्शन

एखादा साधा ड्रेस अथवा कुर्ती जर तुम्ही सिल्कच्या ओढणीसोबत कॅरी केला तर तुमचा साधा ड्रेसही भारी वाटू लागतो. शिवाय तुम्ही हे दुपट्टे कोणत्याही एथनिक लुकसोबत मिक्समॅच करू शकता. 

पैठणी दुपट्टा

पैठणी म्हणजे साड्यांची महाराणी… सणासुदीला परफेक्ट महाराष्ट्रीयन लुकसाठी पैठणीसारखी दुसरी कोणतीच साडी असू शकत नाही. कारण पैठणी साडी नेसल्यावर एक समृद्ध आणि राजेशाही लुक मिळतो. पण जर तुम्हाला यंदा सणाला पैठणी नेसायचा कंटाळा आला असेल तर पैठणीचा दुपट्टा खरेदी करा. आजकाल बाजारात विविध प्रकारचे पैठणी दुपट्टे विकत मिळतात. ज्या तुम्ही एखाद्या पारंपरिक लेंगा, ड्रेस अथवा कुर्तीसोबत मिक्समॅच करू शकता. सोबत गळ्यात पारंपरिक साज आणि नाकात नथ घाला ज्यामुळे तुमचा हा शृगांर पैठणी साडी नेसल्याप्रमाणेच खास दिसेल.

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी (Everything About Maharashtrian Paithani Saree In Marathi)

बनारसी दुपट्टा

बनारसी साडीची बातच न्यारी आहे. कारण महाराष्ट्रात जशी पैठणी लोकप्रिय आहे तसाच उत्तर भारतीयांमध्ये बनारसी साडीला मान आहे. लग्नकार्य अथवा सणासुदीला बनारसी साडीचा थाटच वेगळा दिसतो. पण बनारसी साडी वजनाला थोडी जड असते.आता यात लाईटवेट प्रकार आलेले असले तरी मग अशा वेळी साडीपेक्षा बनारसी दुपट्टा तुमच्या जास्त सोयीचा ठरू शकतो. यासाठी यंदा सणासुदीच्या एथनिक लुकसाठी बनारसी दुपट्टाचा जरूर विचार करा.

चंदेरी दुपट्टा

चंदेरी दुपट्टयाची खासियत ही की यामध्ये तुम्हाला कॉटनसिल्कचे विविध प्रकार पाहायला मिळतात. शिवाय वजनाला अतिशय हलके असल्यामुळे या ओढण्या सांभाळणं कठीण जात नाही. एखाद्या खास कार्यक्रमासाठी क्लासिक लुक हवा असेल तर चंदेरी दुपट्टा बेस्ट आहे. ऑफिसमधील दिवाळी पार्टी अथवा सामाजिक कार्यक्रमासाठी तुम्ही असे एलिंगट लुकचे चंदेरी दुपट्टे नक्कीच निवडण्यास हरकत नाही.

पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

खण दुपट्टा

खणाची साडी आणि इतर एक्सेसरीजचा सध्या ट्रेड आहेच. त्यामुळे एक छान सिल्क मटेरिअल खणाचा दुपट्टा सणासुदीसाठी खरेदी करायलाच हवा. खणामध्ये खूप सुंदर रंग आजकाल बाजारात मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही रंगाच्या पारंपरिक ड्रेस अथवा कुर्तीसोबत हे सुंदर काठाचे खणाचे दुपट्टे मॅच करू शकता. अशा पेहरावासोबत पायात मस्त पारंपरिक चपला अथवा मोजडी कॅरी करा ज्यामुळे तुम्ही आणखी छान दिसाल.

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

भागलपुरी सिल्क दुपट्टा

भागलपुरी सिल्कचे वैशिष्ठ्य हे की या सिल्कच्या साड्या अथवा दुपट्टा लवकर खराब होत नाहीत. वर्षानूवर्ष तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे दुपट्टे तसेच राहू शकतात. शिवाय यात वापरण्यात येणारं सूत नैसर्गिक असल्यामुळे ते पर्यावरणाला अनुकूल असतं. जर तुम्ही पर्यावरण प्रेमी असाल तर यंदा भागलपुरी सिल्कचा दुपट्टा स्वतःसाठी जरूर खरेदी करा. विशेष म्हणजे तुम्ही तो स्टोलप्रमाणे एखाद्या कुर्तीवर कॅरी करू शकता. 

Read More From Festive