मनोरंजन

जेव्हा नागराज मंजुळे म्हणतात, “जयंती झालीच पाहिजे!”

Dipali Naphade  |  Nov 10, 2021
jayanti movie

मराठी सिनेसृष्टीत ज्यांचं नाव आज अभिमानानं घेतलं जातं असे दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे नेहमीच कलेमार्फत वेगवेगळया सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. “फँड्री”, “सैराट”, “नाळ” तसेच “पावसाचा निबंध” या त्यांच्या अफलातून कलाकृतींना प्रेक्षकवर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी आज सकाळी सर्वत्र चर्चित असलेला मराठी चित्रपट “जयंती” चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत जयंतीच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुकवर जयंतीचे “बॅज” लावून तयार केलेले स्वतःचे पोस्टर व्हायरल करणं, ताल धरायला लावणाऱ्या या सिनेमाच्या गाण्यांचे रिल्स बनवून ते व्हायरल करणारे तरुणवर्ग आणि प्रसारमाध्यमांमधल्या चर्चा अशा प्रकारे वेगवेगळया मार्गांनी आगामी मराठी चित्रपट “जयंती” गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याचं उत्सुकता वाढवत आहे. दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” सिनेमा येत्या 12 नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा – मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर

तितिक्षा तावडेचे मराठी चित्रपटात पदार्पण

मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल  12 लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे.  सिनेमाच्या 2 गाण्यांना देखील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. “जयंती” सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता “ऋतुराज वानखेडे” आणि अभिनेत्री “तितिक्षा तावडे” मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत, तर त्याचप्रमाणे  सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत. कलेचे जाणकार नागराज मंजुळे यांनी खुद्द जयंतीबद्दल केलेल्या कौतुकामुळे मराठी सिनेरसिकांसाठी आता चित्रपट निवडीच्या यादीत जयंती अव्वल असेल यात तिळमात्र शंका नाही.

अधिक वाचा – आयुष्य जगा… का दिला अजिंक्य राऊतने दिला फॅन्सला सल्ला

जयंती चित्रपटाला बसला आहे ‘अंतिम’चा फटका 

वैश्विक महामारीमुळे जग थांबले असताना चित्रपटसृष्टीलादेखील  बऱ्याच काळापुरता विराम लागला होता पण आता परिस्थिती पूर्ववत येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. 26 नोव्हेंबर ला येणाऱ्या “अंतिम” या बॉलिवूड चित्रपटामुळे त्याच तारखेला येणाऱ्या “जयंती” सिनेमाला मात्र याचा फटका बसला असता. जर जयंतीने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असती तर “गोदावरी” हा मराठी चित्रपट आहे आणि एक पाऊल मागे टाकले तर “झिम्मा” हा मराठी चित्रपट वाटेवर आहे. बॉलिवूड जिथे मराठी चित्रपटांचा विचार न करता सरसकट निर्णय घेतय तिथे जयंती च्या निर्मात्यांनी चित्रपटांच्या शर्यतीचा फटका बाकी मराठी चित्रपटांना बसू नये यासाठी आपल्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख आता 12 नोव्हेंबर ठरविण्यात आली आहे. अखेर आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर जारी झालेल्या नव्या पोस्टरद्वारे दिसणारा अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे यांची नवी कोरी जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” हा दर्जेदार मराठी सिनेमा येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आणि दिवाळीच्या आसपास हा चित्रपट येत असून थिएटरदेखील उघडणार असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे आता पाहावे लागणार आहे.

अधिक वाचा – “अंतिम” च्या प्रदर्शन तारखेमुळे होणार मराठी चित्रपटाची गळचेपी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन