नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी जसे अंतर कारणीभूत असते. अगदी त्याचप्रमाणे नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी खूप जवळीकताही कारणीभूत ठरते. जोडीदाराने सतत तुमच्यासोबत असायला हवे ही इच्छा काही वाईट नाही. पण अति प्रेम आणि अति सहवासदेखील तुमच्या भांडणाचे कारण ठरु शकतो. जर सतत जवळ असूनही तुमच्या नात्यामध्ये दुरावा येतोय असे तुम्हाला वाटत असेल तर हे नाते टिकवण्यासाठी आताच काही गोष्टी करायला घ्या. त्यामुळे तुमची एकमेकांबद्दलची आवड अजिबात कमी होणार नाही. इतकेच नाही तर तुमचे प्रेमही एकमेकांसोबत तसेच टिकून राहील. चला जाणून घेऊया नात्यात अंतर आणणे म्हणजे नेमकं काय
#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती
एकमेकांना द्या वेळ
एकमेकांना वेळ देणे म्हणजे सतत कायम सोबत राहणे असे अजिबात नाही. कारण कधी कधी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून स्वत:चा असा एक वेळ असणेही गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचा असा एक वेळ मिळाला की, स्वत:ला काय करायचे आहे काय नाही या गोष्टी कळतात. रिलेशनशीपमध्ये असताना तुम्ही सतत एकमेकांसोबत असल्यामुळे बरेचदा आपल्या आवडीनिवडी या बदलू लागतात. पण असे करण्याची काहीच गरज नसते. आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपला असा वेळ प्रत्येकाला हवा असतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की करा ज्यामुळे तुम्ही एकमेकांपासून भविष्यात दुरावले जाणार नाही.
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात
फिरायला जा
जर तुम्हाला थोडे अंतर ठेवायचे असेल तर काहीतरी वेगळे करा. जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर एकट्याचा अस प्लॅन बनवा. कारण तुम्ही एकटयाने बाहेर जाल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे तुमच्या आयुष्यातील अस्तित्व लक्षात येईल. कधीकधी सतत आपल्या प्रेमाच्या व्यक्तींसोबत गेल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने करत नाही. फिरण्याचे सोडून आपण बऱ्याच अशा गोष्टी करतो ज्यामुळे बाहेर फिरण्याचा खरा आनंद घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तेव्हा फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला जोडीदाराला अंतर देता येईल आणि तिलाही तुमची ओढ वाटेल.
कंटाळा येऊ देऊ नका
प्रेमात असल्यावर सगळ्या गोष्टी गुलाबी दिसू लागतात. पण सतत एकमेकांसोबत राहणे हे देखील कंटाळा आणणारे असते. थोडासा डोक्यावर जोर द्या. जोडीदारासोबत सतत राहून तुम्हालाही काही खास गोष्टी करता येत नसेल तर लक्षात घ्या की, तुम्ही जोडीदारासोबत खूप जास्त वेळ घालवत आहात. ज्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवरही होऊ शकतो. सतत तीच गोष्ट केल्याचा कंटाळा येतो आणि आयुष्यातील थ्रील निघून जातं त्यामुळे तुम्हीच थोडी निर्बंध घालून घ्या. कंटाळा येईपर्यंत एखादी गोष्ट मुळीच करु नका.
जर तुम्ही नात्यात असताना योग्य पद्धतीने अंतर दिले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या नात्याला आलेली मरगळ निघून जाईल. एकमेकांबद्दल असलेली ओढही तुम्हाला पुन्हा तशीच वाटू लागेल.
रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप
( अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना काही वर्ष निघून गेल्यानंतर नक्कीच काही जणांना एकमेकांसोबत राहण्याची इतकी सवय झालेली असते की, कधीकधी आपण काय करतो याचा देखील कंटाळा येऊ लागतो. अशावेळी तुम्ही या गोष्टी करायला हव्यात )
Read More From Love
(70+ Best) Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Dipali Naphade
120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Trupti Paradkar