सौंदर्य

DIY : घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार करा कुंकू

Trupti Paradkar  |  Jul 6, 2020
DIY : घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार करा कुंकू

भारतीयांमध्ये ‘कुंकू’ या सौदर्य साधनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. कुंकू हे महत्वाचं ‘सौभाग्य लेणं’ असल्यामुळे विशेषतः विवाहीत महिला कुंकू लावतात. महिलांनी कपाळ आणि केसांच्या मध्यभागी म्हणजेच भांगेमध्ये कुंकू लावण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आजकालच्या आधूनिक जीवनशैलीत कुंकवाची जागा टिकली या सौंदर्यसाधनाने घेतली आहे. मात्र असं असली तरी लग्न, सणासुदीला आणि अनेक धार्मिक विधींसाठी कुंकू आवर्जून वापरलं जातं. सणासुदीच्या दिवसांना सध्या सुरुवात होत आहे त्यामुळे पूजाविधींसाठी घरात कुंकवाची गरज सर्वांनाच भासणार. मात्र कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे बाजारातील तयार कुंकू घेणं सध्या आरोग्यासाठी हितकारक नाही. शिवाय बाजारात मिळणाऱ्या कुंकवामध्ये केमिकल्सदेखील मिसळलेली असण्याची शक्यता असते. यासाठीच जाणून घ्या नैसर्गिक पद्धतीने घरीच कुंकू कसं तयार करावं. 

भारतीय महिला महिला कुंकू का लावतात

भारतीय महिलांमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी कपाळावर कुंकू लावण्याची पद्धत आहे. कुंकू लावण्यामुळे महिलांचा चेहरा उठावदार दिसू लागतो. जितकं मोठं आणि ठसठसीत कुंकू तितका चेहरा आकर्षक वाटतो. कुंकू सौंदर्याप्रमाणेच सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. यासाठी लग्नानंतर हळदी कुंकू वाटण्याची पदधत आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही कुंकू महिलांसाठी फायदेशीर आहे. कुंकवामुळे ताण दूर होतो, एकाग्रता वाढते म्हणून कुंकू महिलांच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी वरदान ठरू शकतं. म्हणूनच प्रत्येक भारतीय घरात कुंकू असतंच.

सौंदर्यासौबत कुंकवाचे शरीरावर होणारे फायदे अवश्य जाणून घ्या –

कुंकवामध्ये हळद, चुना आणि पारा वापरला जातो. पाऱ्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय या तिघांच्या मिश्रणामुळे शरीरावरचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. मन शांत होते आणि सेक्सची इच्छा वाढते यासाठीच विवाहित महिला कुंकू, सिंदूर लावलात जातं. कपाळ आणि केसांच्या भांगात कुंकवाचा स्पर्श झाल्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि शरीरातील चक्र सक्रिय होतात. ज्यामुळे शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मात्र बाजारात मिळणाऱ्या कुंकवामध्ये आजकाल लेड ऑक्साईड, सिन्थेटिक डाय आणि सल्फेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्यामुळे कुंकवाचा रंग ठळक होतो. मात्र याचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता आहे. यासाठी घरीच नैसर्गिक पद्धतीने कुंकू तयार करा आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारा. कुंकू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला तुमच्या घरातच मिळू शकतं. 

घरीच कुंकू तयार कसे करावे –

साहित्य –

एक कप हळद, एक कप चूना अथवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड, गुलाबपाणी, एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट

कसे तयार कराल घरच्या घरी कुंकू –

एका भांड्यामध्ये हळद आणि चुना अथवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड एकत्र मिसळा. त्यात गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट मिसळून मिश्रण एकजीव करा. मिश्रण एकजीव करताना त्याचा रंग बदलू लागतो. नारिंगी रंगाचे मिश्रण हळू हळू लाल गडद होऊ लागते. कुंकू सुकल्यावर त्याची पावडर एका डबीत भरून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला घरीच तयार केलेले कुंकू वापरता येईल. जर तुम्हाला लाल रंगाचे कुंकू हवे असेल तर गरजेपुरते कुंकू तयार करा. कारण ते फार काळ ठेवल्यामुळे पुन्हा हलक्या रंगाचे दिसू लागेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला ‘हळद’

या कारणासाठी लग्नात नववधूच्या हातावर काढली जाते मेंदी

नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम (Bridal Mehndi Designs In Marathi)

Read More From सौंदर्य