Acne

सावधान ! ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

Harshada Shirsekar  |  Jan 4, 2020
सावधान ! ‘या’ 5 गोष्टी चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

नितळ, तजेलदार आणि सुंदर चेहऱ्यासाठी लोक असंख्य उपाय करतात. पण म्हणून काहीही अघोरी उपाय करून चेहऱ्याचं नुकसान करून घेऊ नका. चेहरा सुंदर करण्याच्या नादात होणाऱ्या दुष्परिणामांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. चेहऱ्याची त्वचा शरीराच्या त्वचेपेक्षा अतिशय संवेदनशील असते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ओलावा असतो, ज्यावर कित्येक केमिकलयुक्त उत्पादनांमुळे वाईट परिणाम होतो. यामुळे शक्यतो चेहऱ्यासाठी नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांचा वापर करावा. महत्त्वाचे म्हणजे कोणाच्याही सांगण्यावरून चेहऱ्यावर काहीही लावू नये. खाली नमूद करण्यात आलेल्या पाच गोष्टी चेहऱ्यासाठी अजिबातच वापरू नये.

1. गरम पाणी
चेहऱ्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे चांगलं असते. पण थेट गरम पाण्यानं चेहरा धुणे हानिकारक ठरू शकतं. साधारणतः हिवाळ्यात लोक गरम पाण्यानंच चेहरा स्वच्छ करतात. पण यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ओलावा कमी होतो. गरम पाण्यामुळे तुमचा चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा ताणली देखील जाते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. कोमट पाण्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

2. लिंबूचा रस
लिंबूचा रस किंवा लिंबू पाणी आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे. पण चेहऱ्यावर लिंबू चोळणे किंवा लिंबूचा रस चेहऱ्यावर लावणं सौंदर्यवर्धक ठरत नाही. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असतं, जे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक पूर्णतः नाहीशी होते. याव्यतिरिक्त चेहऱ्याचा पोत देखील खराब होतो. लिंबू रसाच्या वापरामुळे चेहऱ्यावर काळे डाग देखील पडतात. चेहऱ्याला खाजही येते.

(वाचा : सजना है मुझे! ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान)

3. टूथपेस्ट
बहुतांश महिला वर्ग चेहऱ्यावरील मुरुमं कमी करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतात. पण यामुळे मुरुमे कमी होत नाहीत, हे सत्य जाणून घ्या. या उलट टूथपेस्ट मेलानिनचं उत्पादन वाढवतं, ज्यामुळे चेहरा काळा पडतो. सोबत मुरुमांची जागेवर काळे डाग येतात. टूथपेस्ट त्वचेचा ग्लो खराब करतात आणि चेहऱ्यावर जळजळ देखील होते.

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

4.जुने सनस्क्रीन लोशन
कित्येक महिला घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा पोहायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशनचा वापर करतात. पण घरात पडून असलेलं,  कधीही न वापरलेलं सनस्क्रीन लोशन चेहऱ्यावर लावू नये. कारण वापरात नसलेले सनस्क्रीन लवकरच खराब होते. जुन्या सनस्क्रीनचा वापर केल्यास नुकसानच होईल. जुने सनस्क्रीन लोशन वापरल्यानं चेहऱ्यावर मुरुमे येतात, त्यानंतर डाग देखील दिसून येतात आणि चेहऱ्यावरील चमकही कमी होते.

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

5.वॅक्स
शरीराच्या त्वचेवरील केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करतात. पण चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करू नये. चेहऱ्याची त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे चेहऱ्यावर वॅक्स लावल्यास नुकसान होते. बहुतांश महिलांच्या चेहऱ्यावरही केसांचं प्रमाण अधिक असते, हे केस काढण्यासाठी काही जण वॅक्सचा वापर करतात. चेहरा खराब होऊ नये, अशी इच्छा असल्यास चेहऱ्यावर वॅक्स लावणं आताच थांबवा. वॅक्समुळे चेहऱ्यावरील त्वचा लाल होते, जळजळही होते. चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होते.

हे देखील वाचा :
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From Acne