आरोग्य

ओमिक्रॉन कोविड प्रकाराची लक्षणे दिसल्यास चाचणीला उशीर करू नका: डॉक्टरांनी दिला इशारा

Dipali Naphade  |  Dec 4, 2021
omicron

संपूर्ण जग गेली दोन वर्षे महामारीचा सामना करत होते. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा असतानाच कोविड-19 च्या नव्या प्रकाराने पुन्हा एका जगभरात चिंतेचे वातावर निर्माण केले आहे. आता, दक्षिण आफ्रिकेत एक नवीन प्रकार B.1.1529 शोधला गेला आहे जो आतापर्यंत सापडलेल्या प्रकारांपैकी सर्वात गंभीर असा प्रकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराला ओमिक्रॉन असे नाव दिले आहे. ज्यांना या नवीन प्रकाराची लागण झाली आहे, त्यांना अशक्तपणा, घसा खाजवणे आणि अगदी सौम्य स्नायू दुखी यासारखी त्रासदायक लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचणी करून घ्या. वेळीच निदान झाल्यास उपचार करणं सोपं होतं, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. ओमिक्रॉन प्रकार हा सध्या जगभरात चिंतेचा विषय झाला आहे. सध्या उपलब्ध डेटावरून B.1.1.529 हा  अत्यंत संसर्गजन्य आहे. नवीन ओमिक्रॉन कोविडच्या धोक्यामुळे 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या नवीन प्रवासी नियमांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक विमानतळांनी नवीन निर्बंध लादले आहेत.

अधिक वाचा – दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठी टिप्स

संसर्गजन्य आजार

Omicron varient

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा संसर्गजन्य आजार आहे आणि डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त गंभीर आजार होऊ शकतो. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला गेला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याला ‘चिंतेचे प्रकार’ असे म्हटले आहे. हा विषाणू संपूर्ण देशात वेगाने पाय रोवू लागला आहे. सुदैवाने, भारतात अद्याप या प्रकाराची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. ज्यांना या प्रकाराची लागण दिसून आली आहे त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी नसताना थकवा येणे, घसा खवखवणे, अंगदुखी, स्नायूचे दुखणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. या रूग्णांना रूग्णालयात दाखल करून उपचार दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

अधिक वाचा – कोविड वॅक्सिन घेतल्यावर का येतात हातातून वेदना, जाणून घ्या कारण

तर पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिकचे सल्लागार पँथॉलॉजिस्ट डॉ. निरंजन नाईक म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या दृष्टीने, कोविड-19 विरुद्ध चाचणी करणे आणि चाचणीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. प्रवासापूर्वी आणि नंतरच्या चाचण्या अनिवार्य आहेत. सध्याची RT-PCR चाचणी कोणता प्रकार ओळखला गेला आहे हे सिध्द करत नाही. तथापि, पीसीआर किट उत्पादक या समस्येवर काम करत आहेत आणि किट उत्पादकांनी त्यांचे निकाल प्रकाशित केल्यावर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ शकू. या प्रकाराने स्पाइक रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन साइटवर अनेक उत्परिवर्तन दर्शवले असल्याने, या प्रकाराविरूद्ध काही लसी कुचकामी असण्याची शक्यता आहे. परंतु हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरेसा डेटा नाही. त्याचा प्रसार रोखण्यासाठी या प्रकाराचा वेळेवर शोध घेणे आवश्यक आहे. खोकला, घसा खवखवणे, थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक वाचा – कोविड – 19 आणि इतर तापांमधील फरक नक्की काय, घ्या जाणून

अजूनही कोरोनामधून मुक्ती मिळालेली नाही आणि त्यामुळे आता या नव्या व्हेरियंटमुळे अधिक घाबरायला झाले आहे. पण हे नक्की काय आहे आणि काय काळजी घ्यायची आहे याची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानुसार आपणच आपल्या जीवाची काळजी करायला हवी. तुम्हीही हा लेख नक्की वाचा आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागा. 

अधिक वाचा – जाणून घ्या कोरोनाची लक्षणे इत्यंभूत (Corona Symptoms In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य