लाईफस्टाईल

मुंबईतील या स्टेशनांना अशी पडली नावं.. जाणून घ्या त्या मागची गोष्ट

Leenal Gawade  |  Oct 1, 2019
मुंबईतील या स्टेशनांना अशी पडली नावं.. जाणून घ्या त्या मागची गोष्ट

नावात काय असं कितीही म्हटलं तरी नावातच सगळं काही आहे बरं का! किमान काही नावांमध्ये तरी काही तरी गोष्ट असते. मुंबईतील स्टेशनांचा विचार केला तर स्टेशनांना नाव कशी पडली असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? कारण या नावांमागेही एक गोष्ट आहे अशी गोष्ट जी तुम्हाला माहीत असायला हवी. आज अशाच काही स्टेशनांच्या नावामागचा इतिहास आपण जाणून घेऊया.

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

कुर्ला ( Kurla)

Instagram

सेंट्रल रेल्वेवरील कुर्ला हे महत्वाचे ठिकाण असून कुर्ला या स्टेशनला नाव कसे पडले असा तुम्ही विचार करत असाल तर या ठिकाणी आधी भरपूर खेकडे मिळत असतं. खेकडयांना ‘कुर्ली’ असे देखील म्हटले जाते.त्यामुळे कुर्ली मिळण्याचे हे ठिकाण म्हणून त्याला कुर्ली किंवा कुर्ल्या असे म्हटले जाते. पुढे त्याचे नाव कुर्ला असे करण्यात आले. अगदी त्या दिवसापासून या ठिकाणाचे नाव ‘कुर्ला’ असे आहे.

चर्चगेट स्टेशन (Chruchgate station)

Instagram

पश्चिम रेल्वेवरील सुरु होणारे पहिले महत्वाचे स्टेशन म्हणजे ‘चर्चगेट’. या स्टेशनला देखील इतिहास आहे. चर्चगेटचे याव या ठिकाणी असणाऱ्या चर्चवरुन ठेवण्यात आले आहे. 1860 दरम्यान येथील एका चर्चचे गेट होते. या स्टेशनवरील गेट हे चर्चच्या तीन गेट पैकी एक आहे.आजही फ्लोरा फाऊंटन येथे आपल्याला हे गेट पाहायला मिळते. येथील चर्च आता राहिले नाही. पण या चर्चवरुन या स्टेशनला नाव मिळाले.

माटुंगा (Matunga)

Instagram

सेंट्रल रेल्वेवरील माटुंगा हे देखील महत्वाचे स्टेशन आहे. दादर आधी येणारे हे स्टेशन आणि त्याचे नावही अगदी युनिक आहे. माटुंगा हा शब्द मराठी असून मतंग म्हणजेच हत्ती असा त्याचा अर्थ होतो. असे म्हणतात की, 12 व्या शतकात या राज भीमदेवाचे सैन्य या ठिकाणी होते. त्यावेळी देशावर ब्रिटीश राज होते. साधारण 1835 मध्ये या ठिकाणी सगळे उद्धवस्त करण्यात आले. पण आजही त्या काळातील काही गोष्टी अजूनही आहेत. 

सौंदर्य आणि आरोग्यासाठी ठरतं कॅस्टर ऑईल वरदान

विरार (Virar)

Instagram

पश्चिम रेल्वेवरील गर्दीचे स्टेशन आता फारच गजबजलेले असते. या स्टेशनच्या नावामागेही एक इतिहास आहे. आता तुम्हाला माहीत असेल तर फार वर्षापूर्वी विरारला एकविरा देवीचे मंदिर होते. एकविरा देवीवरुनच विरार असे या परीसराला नाव पडले. पोर्तुगीजांनी त्यांच्या काळात हे मंदिर पाडून टाकले. पण हे परीसर याच नावाने ओळखले जाऊ लागले. या परीराला एकविरा तीर्थ असेही म्हटले जाते. 

शीव (Sion)

Instagram

मध्य रेल्वेवरील हे आणखी एक स्टेशन असून मराठीत याला शीव आणि इंग्रजीमध्ये त्याला सायन असे म्हटले जाते. शीव शब्द उच्चारणे इंग्रजांना कठीण होते. म्हणून त्यांनी त्याला सायन असे म्हणणे सुरु केले. सायन हा शब्दाचा अर्थ सीमा असा होय. या ठिकाणी गाव वसले त्यांनी या गावाची हद्द ठरवली. त्यानंतर हा परीसर शीव म्हणून ओळखला जाऊ लागला. 

आता अशा सगळ्याच स्टेशनांचा काहीतरी इतिहास आहे आणि त्यामागे काहीतरी गोष्ट आहे. तुम्हालाही स्टेशनची अशी काही नावे माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

Read More From लाईफस्टाईल