Acne

अॅस्पिरिनच्या वापरामुळे खरंच होतात का पिंपल्स कमी

Leenal Gawade  |  Mar 11, 2021
अॅस्पिरिनच्या वापरामुळे खरंच होतात का पिंपल्स कमी

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कोणालाही नकोसे असतात. हे पिंपल्स घालवण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करतो. ते फोडण्यापासून ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रिटमेंट करण्यापर्यंत आपण सगळे काही करतो. काही जणांसाठी घरगुती उपाय ही काम करतात आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील तर खूप जण अॅस्पिरिन लावण्याचा सल्ला देखील देतात. पण अॅस्पिरिनच्या वापरामुळे पिंपल्स खरंच कमी होतात का? जर उत्तर असेल हो तर त्यामागील कारणं काय? आणि जर याचे उत्तर असेल नाही तर नेमकां याचा वापर का करायला नको हे जाणून घेऊया.

अॅस्पिरिननमध्ये काय असते?

Instagram

अॅस्पिरिनमध्ये  नावाची गोळी ही डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी दिली जाते. ही गोळी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावी लागत नाही. ही गोळी अगदी सहज कोणत्याही दुकानात मिळते. पण याचा योग्य डोस घेणेही गरजेचे आहे. याचे अति सेवन शरीरासाठी चांगले नाही. पण पिंपल्सवर हे अॅस्पिरिननमध्ये  हे कशी काम करते असा प्रश्न पडला असेल तर त्वचेसाठी आवश्यक असलेले सॅलिसिलिक अॅसिड यामध्ये असते. जे पिंपल्सा सुकवण्याचे काम करते.पिंपल्सच्या आजुबाजूला असलेला लालसरपणा, सूज कमी करुन त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याचे काम ही अॅस्पिरिन करते.त्यामुळेच याचा वापर पिंपल्ससाठी केला जातो. 

तुमच्याही स्तनांजवळ येतात पिंपल्स ही आहेत कारणं

पिंपल्सवर असे वापरा अॅस्पिरिन

Instagram

प्रवासात पिंपल्स येण्याची १० कारणे

जास्तही करु नका वापर

एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा कोणत्याही गोष्टीसाठी वाईट असतो. त्यामुळे तुम्ही अॅस्पिरिनचा वापर फार जपून करा. कारण नसताना त्याचा वापर करु नका. फक्त पिंपल्स आलेत त्या ठिकाणीच तुम्ही ते लावा. संपूर्ण चेहऱ्याला लावण्याची चुकी करु नका. जर तुम्हाला याच्या वापरामुळे त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करणे टाळा. म्हणजे तुम्हाला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत. कारण कधी कधी याच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी पडू शकते आणि त्याला भेगाही पडू शकतात. त्यामुळे अॅस्पिरिनरिनचा अति वापर करणे टाळा.
अॅस्पिरिनमध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड नक्कीच चांगले आहे. पण त्याचा वापर करताना तुम्ही थोडी काळजी नक्कीच घ्या. 

तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?

Read More From Acne