Fitness

जेवणासाठी वापरत असलेल्या तेलाचा नेमका तुमच्या आरोग्यावर काय होतो परिणाम

Leenal Gawade  |  Feb 24, 2020
जेवणासाठी वापरत असलेल्या तेलाचा नेमका तुमच्या आरोग्यावर काय होतो परिणाम

हल्ली बाजारात इतक्या वेगळ्या प्रकारचे तेल मिळतात की, त्यांचे फायदे जाणून घेऊन आपण त्यांचा आहारात समावेश करतो. राईस ब्रॅन ऑईल, ऑलिव्ह ऑईल, सूर्यफुलाचे तेल, शेंगदाणा तेल , सोयाबीन तेल, मोहरीचे तेल असे जेवणासाठीच्या तेलाचे विविध पर्याय सध्या बाजारात आहे. प्रत्येक तेलाचे फायदे पाहूनच तुम्ही त्या तेलाची निवड करता. पण प्रत्यक्षात तुमच्या तेलाच्या निवडीवर तुमचे आरोग्य अवलंबून आहेत का ते आपण आज जाणून घेऊयात

लघवी रोखून धरण्याची तुम्हालाही आहे का सवय ? मग एकदा वाचाच

देशातील तेलाचा वापर

shutterstock

आपल्या देशात तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. अगदी फोडणीपासून ते पोळीपर्यंत अनेक जण तेलाचा वापर करतात. आता हे तेल अगदी राईसब्रॅन ऑईलपासून ते मोहरीच्या तेलापर्यंतचे असते. त्यामुळे काही अभ्यासातून एक गोष्ट जी प्रकर्षाने समाेर आली आहे ती म्हणजे भारत हा असा देश आहे जो सर्वाधिक तेलाचा वापर करते. त्यामुळे त्यापासून होणारे त्रास भारतात अधिक आहे. 

तेलामध्ये असतो का फरक?

shutterstoc

आता तुम्ही म्हणाल की, आम्ही अमूक एक तेल वापरतो ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी आहे.त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्हाला हे सांगायला आवडेल की, आपण सगळे रिफाई्ंड तेलाच वापर करतो. तेल रिफाईंड केल्यामुळे त्यातील अनावश्यक घटक कमी होतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर केला तरी तुम्हाला त्याचे नुकसान होत नाही, असे एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही किंवा इतर कंपन्या तेलांमध्ये भेदभाव करत असल्या तरी प्रत्यक्षात रिफाईंड तेलामध्ये तसा काही फरक नसतो हे शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. हा आता हा बदल तुम्हाला तेलांच्या चवींमध्ये हमखास जाणवेल. फक्त तेल तपासून घेताना त्यामधील फॅटची मात्रा तपासायची आहे. कोणत्याही तेलात फॅट हे 2% पेक्षा जास्त असता कामा नये.

जंताच्या त्रासावर करा घरगुती आणि सोपे उपाय

तेलाचा वापर करा जपून

shutterstock

आता तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करा हे जरी आम्ही सांगितले असले तरी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे,फॅट वाढणे, वजन वाढणे, हृदयविकाराचा त्रास होणे असे त्रास आपण तेलामुळे होतात हे ऐकले आहे ते अगदी खरे आहे. याचे कारण असे की, तेल कोणतेही वापरले तरी ते वापरण्याचे प्रमाणही योग्य असणे फारच आवश्यक असते. तुमचे जेवण तेलामुळे अधिक चमचमीत होते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्याचा वापर अगदी मापात करायचा आहे. दोन ते तीन मोठे चमचे दिवसाला तुमच्या आहारात तेल आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही त्यानुसार तुमच्या जेवणात याचा वापर करा. असं म्हणतात कच्चं तेल शरीरासाठी चांगलं असतं. तेल गरम झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर त्यातील घटक प्रसरण पावतात. मग ते अगदी कोणतंही तेल असो. तुम्हाला त्यातील फॅटचा त्रास होणारच आहे. 

तर तुम्ही तेल कोणतेही वापरा तुमच्या आरोग्यावर त्याचा फारसा दुष्परिणाम होत नाही. फक्त तुम्हाला तुमचे तेल मापून वापरायचे आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा कोणताही त्रास होणार नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Fitness