आरोग्य

पिरेड्समध्ये वाढतं का वजन,जाणून घ्या तथ्य

Leenal Gawade  |  Dec 2, 2021
पिरेड्समध्ये खरंच वाढतं का वजन

पिरेड्स आले की, अगदी नकोसे होते. पिरेड्स येण्याआधी आणि ते आल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. खूप जणांना पिरेड्समध्ये शरीर जड झाल्यासारखे वाटते. खूप जणांची शरीरयष्टी पिरेड्समध्ये हमखास बदलते. तुम्हालाही पिरेड्सदरम्यान तुम्ही जाड झालात असे वाटत असेल तर तुम्हाला यामध्ये काय तथ्य आहे ते देखील जाणून घ्यायला हवे. पिरेड्स येण्यापूर्वी तुम्ही तुमचे वजन तपासून पाहा आणि पिरेड्स आल्यानंतर. जर तु्‌म्हाला तुमच्या वजनात फरक जाणवून आला असेल तर त्यामागील कारणे आणि काय करायला हवे ते जाणून घेऊया. मासिक पाळीत शरीराला व्यायाम मिळून मासिक पाळीत धावणे किती महत्वाचे ते देखील जाणून घ्या.

ब्लोटींग

पिरेड्सच्या आधी पोट फुगलेले असते. खूप जणांना पाळी येण्याआधी हा बदल हमखास जाणवू लागतो. पोट भरल्यासारखे फुलल्यासारखे वाटतात. त्यामुळे आपले पोट सुटले की काय असे वाटू लागते. पण हा त्रास सगळ्यांना होतो असे नाही. खूप जणांना हा त्रास होतो. पण ही गोष्ट एकदम सामान्य आहे. पिरेड्स येण्याच्या काही दिवस आधीपासून पोट अशापद्धतीने ब्लोटींग व्हायला सुरुवात होते. त्यामुळे होतं असं की, कित्येकांना कपडे खूप घट्ट बसू लागतात. कंबरेचा घेर वाढल्यासारखे वाटू लागते. पण त्यामध्ये काही तथ्य नाही. प्रत्येकानुसार यामध्ये बदल होत राहतो. 

स्तनाग्रे मोठी दिसणे

खूप जणांना मासिक पाळी येण्याआधी स्तनाग्रे मोठी दिसण्याचा त्रास होतो. आहे त्या आकारापेक्षा ती जास्त वाढलेली किंवा सुजलेली दिसतात. खूप जणांना स्तनाग्रे दुखण्याचा देखील त्रास या दिवसात होतो. तुम्हालाही असे काही होत असेल तर ते अगदी सर्वसामान्य आहे. ज्यांच्या शरीराला अशा प्रकारची सूज चढते अशांची स्तनाग्रे अचानक मोठी दिसू लागतात. रोज घालत असलेली ब्रा देखील अशावेळी थोडी तोकडीच वाटते. ती पाठीच्या मासंल भागात घुसल्यासारखी होते. त्यामुळे हे लक्षण सर्वसामान्य आहे याचा तुमच्या वजन वाढीशी काहीही संबंध नाही. 

शरीर मांसल वाटणे

पिरेड्सदरम्यान होणारी पोटदुखी

स्लिम ट्रिम म्हणजे एकदम टोन्ड बॉडी सगळ्यांना आवडते. पण नेमकं मासिक पाळी येण्याआधी काही जणांचे शरीर एकदम थुलथुलीत होते. विशेषत: मांड्यांचा आकार हा अधिक वेगळा आणि जाड वाटू लागतो. जांघामध्ये खूप मांस झाले असे वाटू लागते. काही जणांना शरीरात असा काही बदल झाला की, आपल्याला मासिक पाळी येणार हे कळते. त्यामुळे शरीरातील मसलचे असे वाढणे एकदम साहजिक आहे. तुम्ही नक्कीच याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. पिरेड्स झाल्यानंतर ते सुरळीत होते.

कपडे गच्च बसणे

खरंतर कपड्यांची फिटिंग चुकली की, वजन वाढले असे खूप जणांना वाटते. रोजच्या साईजपेक्षा जर तुम्हाला पिरेड्सच्या दिवसात मोठे कपडे लागत असतील तर तुमच्या शरीराला या दिवसात सूज आली असे समजावे. त्यामुळे कपड्यांची फिटिंग टाईट झाली तरी देखील तुमचे वजन वाढले असे नाही. 

वजन वाढण्याची प्रक्रिया अशी एका दिवसात होत नाही. तर ते हळुहळू वाढत असते. त्यामुळे फक्त पिरेड्समध्ये वजन वाढणे हे तितके खरे नाही. पण या दिवसात होणाऱ्या क्रेव्हिंग्स टाळल्या तर नक्कीच तुमचे वजन वाढणार नाही. 

अधिक वाचा

व्हजायना निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी करणे टाळा

मासिक पाळीच्या दरम्यान घालू नका हे कपडे

Read More From आरोग्य