Diet

बटाटा खरंच वाढवतो का वजन?, जाणून घ्या सत्य

Leenal Gawade  |  Aug 2, 2022
बटाटा वाढवतो का वजन?

 बटाटा (Potato) हा असा पदार्थ आहे जो अगदी कोणत्याही रेसिपीमध्ये चांगला फिट होतो. चिकन असो वा भाजी… रस्सा असो वा चाट सगळ्यात बटाट्याचे अगदी अनन्यसाधारण असे महत्व आहे. काही जण अशीही आहेत ज्यांना बटाट्याशिवाय अजिबात करमत नाही त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा हा लागतोच लागतो. पण बटाटा म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि असे पदार्थ वजन वाढवतात असे आपल्याला वाटते. त्यामुळे स्थुलपणाशी( Weight Gain) निगडीत एखादी उपमा द्यायची असेल तर लगेच आपण अरे काय बटाट्यासारखा झालायंस असे म्हणतो. इतकेच नाही तर एखादा व्यक्ती संथ असेल तरी देखील त्याला डोक्यात बटाटे भरलेत का? असे सांगून हिणवले जाते.  चविष्ट असा बटाटा बाकी काही असू दे पण वजन वाढवतो अशा भितीने अनेक जण खात नाहीत. पण खरंच बटाटा वजन वाढवतो का? जाणून घेऊया या मागील सत्य 

बटाटा आहे फायबरचा साठा

बटाट्याचे सेवन

बटाट्यामध्ये सगळ्यात जास्त फायबर आणि स्टार्च असतो. हा पिष्ठमय पदार्थ असला तरी देखील तो थोडासा खाल्ला तरी देखील पोट भरल्यासारखे वाटते. म्हणूनच अनेक स्नॅक्स आयटममध्येही बटाट्याचा समावेश केला जातो. कारण त्यामुळे पटकन पोट भरण्यास मदत मिळते. आपल्याकडील उपवासाच्या भाजीमध्येही बटाट्याचा समावेश केला जातो. कारण त्यामुळे इतका वेळ केलेला उपवास आणि लागलेली भूक शमण्यास मदत होते. शिवाय शरीराला आलेला थकवा ही निघून जातो. त्यामुळे बटाटा हा कुठेही नुकसान करतो असे दिसून येत नाही. 

वजन वाढवत नाही तर…

आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बटाटा हा वजन वाढवत नाही तर बटाटा हा वजन कमी करतो. बसला ना धक्का…. हो हे अगदी खरं आहे. अनेकदा डाएटमध्ये उकडलेल्या बटाट्याचा समावेश कऱण्यास सांगितला जातो. तळलेल्य बटाट्यापेक्षा उकडलेला बटाटा हा अधिक चांगला असतो. ज्यावेळी आपण बटाटा खातो त्यावेळी दुसरे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. एखादा उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा तुम्ही खाल्ला तरी देखील तुमचे पोट भरुन जाते. त्यामुळे अरबट चरबट खायची काहीही इच्छा होत नाही. 

वजन कमी करण्यासाठी असे करा बटाट्याचे सेवन

उकडलेला बटाटा

आता तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बटाट्याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. योग्य वेळी बटाटा खाल्ला तर तो तुम्हाला उर्जा देण्याचे काम करेल आणि तुमचे वजनही वाढणार नाही. 

  1. सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही बटाटा खाल्ला तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. त्यामुळे तुमचे पोट जास्तीत जास्त काळासाठी भरले जाते. 
  2. संध्याकाळची अचानक भूक लागली असेल तर अशावेळीही तुम्ही उकडलेला बटाटा खाल्ला तरी देखील पोट भरु शकते. 
  3. खूप जण जीमला जाण्याआधी थोडेसे खातात. अशावेळी जर क्वीक बाईट म्हणून काही हवे असेल तर तुम्ही मस्त उकडलेला बटाटा त्यावर थोडे सैंधव मीठ लावून खाल्ले तर तुम्हाला ते चवीलाही चांगले लागेल 

आता बिनधास्त आणि प्रमाणात खा उकडलेला बटाटा… होईल फायदा 

Read More From Diet