अनेक प्रयत्न करुन झाले पण कशातही यश नाही. मी अशा काय चुका केल्या आहेत की, मला कोणत्याही कामात यश मिळत नाही? एखाद्या नव्या गोष्टीत कुठे यश मिळणार असे वाटते तितक्यात इतकी नकारात्मक उर्जा ग्रासते की, काय करावे असे कळत नाही. खूप जणांना आयुष्यात पटकन यश मिळत नाही. स्ट्रगल हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. तर काही जणांना यश अगदी सहज मिळते आणि टिकते सुद्धा. दुसऱ्यांचे असे यश पाहिले की, आपण यशस्वी का नाही याचा विचार आपण करु लागतो. या प्रश्नांनी आपल्याला ग्रासले की, आपोआपच आपण नैराश्याच्या गर्तेत स्वत:ला ढकलायला सुरुवात करतो. सतत येणाऱ्या अपयशाने खचून गेलाय? मग आजचा हा विषय तुम्हाला त्यातून नक्कीच बाहेर काढण्यास मदत करेल.
अपयशाचे यशामध्ये रुपांतर करण्यासाठी
अपयशाचे यशात रुपांतर करणे हे आपल्याच हातात आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतल्यानंतर त्याचे पुढे चांगलेच होईल असा विचार करुन मार्गक्रमण करा. अनेकदा तुम्हाला इतर अनुभवी सल्ला देण्यासाठी येतील. त्यांचे अनुभव नक्कीच ऐका. पण त्यात तुम्हाला काय वाटते हे देखील असू दया. काही गोष्टी करताना त्यातून मिळणारे यश समोरच्याला दिसत नाही. पण तुम्हाला त्याची जाणीव असते. असा ठाम विश्वास तुमचा तुमच्यावर असेल तर त्या अपयशाचे यश कसे होईल याचा विचार करा.
थोडा धीर धरा
कोणत्याही कामात लगेच दुसऱ्या क्षणाला यश मिळेल असे अजिबात सांगता येत नाही. अशावेळी धीर हा महत्वाचा असतो. आज पैशांची चणचण आहे. उद्या या उद्योगामुळे किंवा कामामुळे ती लगेच दूर होईल. मग मी श्रीमंत होईन अशी स्वप्नच घातकी असतात. श्रीमंत पदावर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत लागते. त्या पायरीवर टिकून राहणे देखील गरजेचे असते. त्यामुळे धीर धरा. चांगले करत राहा. तुम्ही फळाची अपेक्षा आतापासूनच केली तर ते यश कितीही मिळाले तरी देखील ते तुम्हाला कमीच वाटते.
प्रयत्नांची कास सोडू नका
खूप जण एखाद्या कामात यश मिळत नाही असे दिसल्यावर प्रयत्न करणे सोडून देतात. त्यामुळे होते असे की, नकारात्मक उर्जा तुम्हाला ग्रासते. आपण इतके करुनही काहीही होत नाही हा विचारच सगळ्यात जास्त घातकी असतो. कारण त्यामुळेच तुम्ही करत असलेले प्रयत्न सोडून देता. जे तुमच्या यशाच्या आड येत असते. त्यामुळे प्रयत्न करणे अजिबात सोडू नका. जो पर्यंत तुम्हाला अपयश मिळते असे वाटते ज्याचे रुपांतर यशात होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा.
इतरांचा विचार करणे टाळा
अनेकदा आपण इतरांचा खूप विचार करतो. दुसरे काय म्हणतील. आपल्याला यश मिळाले नाही म्हणजे ते आपल्याला काहीही करण्यास सक्षम नाही असे समजतील हा विचारच खरा तर तुम्हाला अपयश देत असतो. आपण काय करतो. त्याचा फायदा-तोटा हा फक्त आपल्यालाच होत असतो. दुसऱ्यांचा विचार करुन आपल्याला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचा विचार करणे टाळा आणि आपण काय करु शकतो याचा विचार करा.
नुकसान होणारच
फायदा होणे हे आपल्या हातात असले तरी देखील आपल्याला कायम सगळ्या गोष्टींचा फायदा होईल असे सांगता येत नाही. कधी कधी आपल्याला नुकसानही होऊ शकते. हे नुकसानही तुमच्या यशासाठी फारच फायद्याचे असते.10 रुपये मिळाले आणि 20 रुपयांचे नुकसान झाले तरी काहीही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला कदाचित 30 रुपये मिळतील. त्यामुळे काळजी करु नका. काम करत राहा.
आता अपयशाच्या भीतीने काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करा आणि या गोष्टींचा नक्की विचार करा.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade