नुशरत भरूचाने खूपच कमी वेळात बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या नुशरत मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. नुशरत सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सध्या मालदिवमध्ये असलेल्या नुशरतने आपले अनेक बिकिनी फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे सर्व व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत आहेत. ‘ड्रीमगर्ल’ आणि ‘प्यार का पंचनामा’ सारख्या वेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली नुशरतने फारच कमी वेळात आपला जम बसवला आहे. नुशरतने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटो आणि व्हिडिओजवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.
प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे
निळ्याशार पाण्यामध्ये आनंद घेत आहे नुशरत
नुशरतने आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये नुशरत दगडावर बसून आपले केस बाजूला घेत आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तिच्या या फोटोजमध्ये तिची टोन्ड बॉडी दिसून येत आहे. त्याशिवाय नुशरतने केलेले सुंदर टॅटूही दिसून येत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये पूलमध्येच ब्रेकफास्ट करताना नुशरत दिसून येत आहे. एकंदरीतच नुशरत आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने यावेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तर अगदी लहान मुलाप्रमाणे पाण्यात उडी मारून मजा करताना दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये नुशरतने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून तिच्या बॉडीला ती परफेक्ट उठून दिसत आहे. नुशरतची फिगर परफेक्ट असल्याने तिचा हा लुक अप्रतिम दिसत आहे. तिच्या या लुकमुळे ती आपल्या चाहत्यांची धडकन नक्कीच वाढवली आहे. तिने खूपच वेगवेगळ्या बिकिनी लुकमध्ये हे फोटो काढले आहेत. शिवाय या बिकिनी लुकमध्ये ती अतिशय कम्फर्टेबल असल्याचंही पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तिने हे फोटो काढले असून निसर्गसौंदर्य आणि तिचं सौंदर्य असे दोन्ही जुळून आल्याचं पाहायला मिळत असल्याचंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे. नुशरतच्या चेहऱ्यावरील आनंद हा या व्हिडिओ आणि फोटोजमधून दिसून येत आहे.
‘तारक मेहता’मधील अभिनेत्री प्रिया अहुजाच्या घरी आला नवा पाहुणा, शेअर केला फोटो
तुर्रम खान नवा चित्रपट
नुशरतने आतापर्यंत जास्त चित्रपट केले नसले तरीही तिने जितके चित्रपट केले आहेत त्यामध्ये स्वतःची वेगळी अशी छाप सोडली आहे. नुकताच आयुषमान खुराणाबरोबर केलेला ड्रीमगर्लमधील छोटी भूमिका असूनही नुशरतने त्याला योग्य न्याय दिला आहे. लवकरच तिचा तुर्रम खान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये नुशरत अभिनेता राजकुमार रावबरोबर दिसणार आहे. नुशरतने आतापर्यंत निवडलेले चित्रपट हे हिटच झाले आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची सुरूवात होण्यापूर्वी नुशरत सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यामुळेच ती सध्या मालदिवला मजा करत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर आणि सतत पाण्यामध्ये नुशरत आपला एक वेगळा अंदाज आपल्या चाहत्यांना दाखवत आहे. तसंच तिच्या या फोटोज आणि व्हिडिओजना तिचे चाहते खूपच चांगला प्रतिसाद देत असून तिला खूपच कमेंट्स येत आहेत. अतिशय ग्लॅमरस आणि हॉट असे हे फोटो आहेत. शिवाय नुशरत यामध्ये खूपच सुंदर दिसत असून ती आपल्या सुट्टीचाही अगदी मनापासून आनंद घेताना दिसत आहे.
दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला…
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade