अनेकदा चांगलं,आवडीचे पदार्थ खाण्याच्या नादात आपण खूप खातो आणि आपलं पोट गच्च होऊन जातं. अशावेळी झटपट आराम मिळवण्यासाठी आपण बरेच काही करतो. हा त्रास आपल्याला लाईफस्टाईलमुळेही होते. काहीजणांच्या ऑफिसच्या वेळा या वेगळ्या असतात. अनेकांना रात्रीच्या नियमित वेळेपेक्षा जास्त उशीर होतो. तुमचेही जेवण असेच उशीरा होत असेल आणि त्यामुळे तुम्हाला पोट गच्च होण्याचा त्रास होत असेल तर मग तुम्ही काही पाचक ड्रिंक्सची सवय लावून घ्यायला हवी. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकेल आणि तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहील. जाणून घेऊया असेच सोपे आणि झटपट होणारे पाचक ड्रिंक्स
पोट सुटले असेल तर हे 3 व्यायामप्रकार आठवड्याभरात करतील चमत्कार
पुदिना,लिंबू पाणी
तुमची पचनसंस्थान चांगले करण्याचे काम पुदिना आणि लिंबू दोन्ही करते. जर तुम्ही नॉनव्हेज किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले असतील. तुम्हाला सतत करपट ढेकर येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे पाणी करुन प्यायला हवे. याच्या सेवनामुळे तुमच्या पोटातील गॅस, करपट ढेकर कमी होतात. तुम्हाला आराम मिळतो.
असे तयार करा हे पाचक ड्रिंक : एका भांड्यात पाणी,लिंबाचा रस, पुदिन्याचे पाणी, थोडं काळ मीठ, साखर एकत्र करा. (यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या चवीनुसार घ्यायची आहे.) सगळे मिश्रण एकत्र करुन तुम्हाला उकळायला घ्यायचे आहे. पाणी उकळल्यानंतर हे पाणी गाळून प्या. ग्लासभर पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही हे पाचक ड्रिंक रोज करुन प्यायला काहीच हरकत नाही.
सब्जा आणि लिंबूचे पाणी
पोटातील आग शमवण्यासाठी सब्जा आणि लिंबाचे पाणी एकदम परफेक्ट आहे. रोज रात्री जेवणानंतर तुम्ही हे पाणी रोज घेऊ शकता. याची रेसिपी ही अगदी सोपी आहे. एका ग्लासामध्ये सब्जा साधाऱण एक चमचाभर सब्जा भिजत घाला. सब्जा फुगल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला. तयार पाणी जेवणानंतर प्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. सब्जा आणि लिंबू पचनाला मदत करुन तुम्हाला आाराम देतात. सब्जा सोबत तुमच्याकडे चिआ सीड्स असतील तर तुम्ही त्याचाही उपयोग करु शकता. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळेल.
पिरेड्सच्या दिवसांमध्ये दुखतं पोट, जाणवतो थकवा मग हे नक्की करा
जिऱ्याचे पाणी
अरबट चरबट खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पोट फुगल्यासारखे किंवा पोटात गॅस असल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचे सेवनही करु शकता. जिऱ्याचे पाणी बनवणेही फार सोपे आहे.
एका भांड्यात एक ग्लासभर पाणी गरम करा. पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची एक चमचाभर पूड घ्या. पाण्यामध्ये जिऱ्याचा अर्क चांगला उतरु द्या. मग हे पाणी तुम्ही पिऊ शकता. जिऱ्याचे गरम पाणीही तुम्ही अगदी रोज प्रत्येक जेवणानंतर पिऊ शकता तुम्हाला आराम मिळेल.
आता जर तुम्हाला पचन किंवा पोटासंदर्भात कोणतेही विकार जसे मूळव्याधावरील घरगुती उपाचार म्हणून तुम्ही घरच्या घरी असे पाचक ड्रिंक्स पिऊ शकता. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.