Fitness

मांड्यावर मांड्या घासण्याचा तुम्हाला होतो का त्रास, मग वाचा

Leenal Gawade  |  May 23, 2019
मांड्यावर मांड्या घासण्याचा तुम्हाला होतो का त्रास, मग वाचा

मांड्यांना मांड्या घासण्याचा त्रास अनेकांना होतो. विशेषत: उन्हाळ्यात ज्यावेळी तुम्ही लहान कपडे घालता. मांडी व्यायाम पाय एकमेकांच्या विरूद्ध घासतात. त्यामुळे तुमचा तो भाग लाल होतो. अनेकांना मांड्यांवर मांड्या घासण्याचा इतका त्रास होतो की, त्यांना तिथे जखमा होतात. तो भाग अधिक काळा दिसू लागतो. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर तुम्ही आताच काळजी घ्या म्हणजे तुमच्या मांड्या एकमेकांना घासल्या जाणार नाही. मग करायची सुरुवात

कशामुळे घासल्या जातात मांड्या?

खूप घाम- जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर हा त्रास हमखास होणारच. घाम आल्यानंतर तुमच्या मांड्यामध्ये हा घाम साचून राहिला तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होतो. घामामध्ये असलेल्या क्षारामुळे ज्यावेळी तुमच्या मांड्या घासल्या जातात. तसा तो भाग अधिक लाल दिसू लागतो.

तुम्हाला हवेत का? *सेक्सी थाईज मग तुम्ही हा व्यायाम करायला हवा

मांड्यावरील अतिरिक्त मांस

जर तुमच्या मांड्यांकडील भाग अती स्थूल असेल तर  त्याचा देखील त्रास तुम्हाला होऊ शकतो. चालताना मांड्या घासल्या जाण्याचा त्रास त्यांना सर्वाधिक होतो.मांड्या जास्त घासल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी जखमा देखील होतात.असे नाही की स्थूलच व्यक्तिंना याचा त्रास होतो. पण बारीक व्यक्तिंनाही याचा त्रास होऊ शकतो.

हाताची चरबी कशी कमी करावी हे देखील वाचा

अशी घ्याल काळजी

जागा ठेवा कोरडी :

तुम्ही पूर्णवेळ बाहेर जाणार असाल तर तुम्ही तुमच्या मांड्या स्वच्छ ठेवायला हव्यात. आताच्या वातावरणाचा विचार केला तर तुम्हाला मांड्यांमध्ये घाम येणे अगदीच स्वाभाविक आहे. म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर आंघोळीनंतर तुमच्या मांड्या कोरड्या करा. घाईघाईने कपडे घातल्यानंतर जर त्या भागात पाणी राहिले तर त्याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ शकतो. सोबत एक पातळ सुती कपडा ठेवा. जर तुम्हाला मांड्यांना घाम आल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही लगेचच सुती कपड्याने घाम टिपून घ्या. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही

cellulite मुळे शॉर्ट कपडे घालणे टाळता, मग वाचा घरगुती इलाज

व्हॅसलीन:

मांडी घासण्यावर दुसरा उत्तम इलाज आहे तो म्हणजे व्हॅसलीन जेली. जर तुम्हाला मांड्या घासण्याचा त्रास अगदी खूपच असेल तर तुम्ही तुमच्या मांड्या जिथे घासल्या जातात. तिथे व्हॅसलीन जेली लावा. शिवाय जर तुम्हाला मांड्या घासण्याचा त्रास झाला असेल आणि तुमची मांडी जळजळत असेल तर तुम्ही नंतरही व्हॅसलीन जेली लावू शकता. तुम्हाला लगेच आराम पडेल.

बेबी पावडर:

घरातून बाहेर पडताना तुमच्या बॅगमध्ये बेबी पावडर ठेवाच. बेबी पावडरने तुम्हाला लगेचच आराम मिळतो. शिवाय बेबी पावडर लावल्यानंतर तेथील त्वचा गुळगुळीत होते आणि तुमच्या मांड्या एकमेकांना घासत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या  मांड्यांना बेबी पावडर नक्की लावा.

लिप बाम:

प्रत्येकीच्या बॅगमध्ये एक लिप बाम तर असतोच. जर तुमच्याकडे लिप बाम नसेल तर तुम्ही लगेचच त्या ठिकाणी लिप बाम लावू शकता कारण लिप बाममुळे तुम्हाला लगेचच थंडावा मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला मांड्यांमध्ये जळजळ जाणवली तर तुम्ही हा प्रयोग लगेच करु शकता.
चांगल्या कपड्यांची निवड- तुम्ही आत कोणते कपडे घालता हे देखील फार महत्वाचे असते. स्कर्ट किंवा ड्रेसमध्ये तुम्ही बॉय शॉर्ट इनरवेअर घालणे टाळा. त्यापेक्षा तुम्ही त्यावर थोड्या मोठ्या टाईट्स वापरा. कारण त्या टाईटस तुम्हाला मांड्या घासण्यापासून वाचवू शकतील.

परफेक्ट फिगरसाठी करा परफेक्ट डाएट

(फोटो सौजन्य- shutterstock)

Read More From Fitness