आरोग्य

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

Leenal Gawade  |  Nov 17, 2021
डोळ्यांची सूज घालवण्यासाठी सोपे उपाय

 डोळे सुंदर आणि आकर्षक दिसावे असे सगळ्यांना वाटते. पण अपुरी झोप आणि सतत मोबाईलच्या वापरामुळे हल्ली खूप जणांचे डोळे अनाकर्षक झाले आहेत. खूप जणांच्या डोळ्याखाली तर मासांचा जणू गोळाच असल्यासारखा वाटतो. त्यामुळे डोळे हे अजिबात चांगले दिसत नाही. तुमच्याही डोळ्याला अशीच सूज आली असेल तर तुम्हाला काही सोपे उपाय करुन डोळ्यांची सूज घालवता येईल जाणून घेऊया असे काही सोपे उपाय ज्यामुळे डोळे सुंदर दिसतील. या शिवाय डोळ्यांचा पफीनेस घालवण्यासाठी त्वरीत उपायही नक्की करुन पाहा.

 बर्फाचा शेक

खूप जणांना स्क्रिन टाईम हल्ली चांगलाच वाढलेला आहे. सतत काहीतरी पाहत राहायचे म्हणजे डोळ्यासमोर फोन आलाच. शिवाय कामांसाठी लॅपटॉप आला. नाही म्हटले तरी कामासाठी आपण लॅपटॉपसमोर बसणे अजिबात टाळू शकत नाही. त्यामुळे साहजिकच डोळ्यांना त्रास होण्यास सुुरुवात होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे आणि त्यानंतर डोळे सुजणे असे त्रास होऊ लागतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही बर्फ एका कापडात बांधून त्याचा छान मसाज करा. डोळ्यांखाली अगदी हळुवार हाताने तुम्हाला हा मसाज करायचा आहे. किमान दोन मिनिटे तुम्ही हा शेक दिल्यामुळे डोळ्यांना चांगला आराम मिळतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुम्ही हे करा. तुम्हाला नक्कीच फरक झालेला जाणवेल.

डोळ्यांचा मसाज

डोळ्यांचा मसाज

डोळ्यांना आलेली सूज ही तुमची अर्धवट झोप आणि तणाव दर्शवते. तणावमुक्त होण्यासाठी तुम्हाला डोळ्यांचा मसाज करणे फारच फायद्याचे ठरते. डोळ्यांचा मसाज करण्यासाठी कोणतेही चांगले मसाज ऑईल घेऊन बोटांच्या साहाय्याने गोलाकार डोळ्यांना मसाज करा. त्यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने डोळ्यांचा मसाज करायचा असेल तर तुम्हाला युट्युबमध्ये अनेक व्हिडिओ दिसतील हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करतील. डोळ्यांचा अगदी दोन मिनिटे मसाज केल्यामुळेही तुम्हाला खूप आराम मिळेल.

डोळ्यांचा योगा

डोळ्यांचे आजार आणि माहिती असणे फारच गरजेचे असते. डोळ्यांशी निगडीतही योग असतात. तुम्ही काही व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला डोळ्यांचा योग व्हिडिओ मिळेल. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांचा अनेक हालचाली दाखवल्या जातात. डोळ्यांचा हा योगा केल्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या शरीरात बदल घडवण्यासाठी योग हा थोडा वेळ घेत असला तरी देखील त्याचे परिणाम हे चांगले टिकतात. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास डोळ्यांचा योग करावा. साधारणपणे डोळ्यांच्या योगमध्ये डोळे मिटणे, डोळ्यांची उघडझाप, डोळे गोलाकार फिरवणे असे प्रकार येतात. त्यामुळे डोळे चांगले राहतात.

आता नक्कीच अशापद्धतीने डोळ्यांची काळजी घेतली तर डोळ्यांची सूज कमी होईल आणि डोळे अधिक चांगले दिसण्यास मदत होईल. या शिवाय डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय करुनही डोळ्यांची काळजी घेता येईल

Read More From आरोग्य