DIY लाईफ हॅक्स

मेथीच्या ताज्या पानांपासून बनवा घरीच कसूरी मेथी

Dipali Naphade  |  Jan 25, 2021
मेथीच्या ताज्या पानांपासून बनवा घरीच कसूरी मेथी

आपल्याकडे भारतीय जेवण हे जगभरात प्रसिद्ध आहे ते त्यामध्ये वापरण्यात येत असलेल्या मसाल्यामुळे. यातील एक महत्त्वपूर्ण मसाला म्हणजे कसूरी मेथी. विशेषतः पंजाबी भाज्यांमध्ये कसूरी मेथीचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. याचा वापर केल्यानंतर त्याचा येणारा सुगंध आणि यामुळे भाजीला येणारी चवही अप्रतिम असते. पनीरची भाजी असो वा घरातील साधी टॉमेटोची भाजी, कोणत्याही भाजीमध्ये कसूरी मेथी घातली की, मग त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही मनाला भावेल असेच असते. साधारणतः लोक बाजारामधून कसूरी मेथी विकत आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही कसूरी मेथी तयार करू शकता. घरच्या घरी शुद्ध आणि ताजी मेथी आणून तुम्ही कसूरी मेथी तयार करू शकता. हे कसे तयार करायचे हे आम्ही तुम्हाला सांगतो.

आहारात अति गरम मसाला वापरणे आरोग्यासाठी धोक्याचे

कशी तयार करावी कसूरी मेथी

Instagram

स्टेप 1 – कसूरी मेथी बनविण्यासाठी सर्वात पहिले मेथीची ताजी पाने काढा आणि मग ही पाने मिठाच्या पाण्यात साधारण दहा मिनिट्स तुम्ही भिजवून ठेवा. त्यानंतर ही पानं नीट धुऊन घ्या.  एका मोठ्या टॉवेलमध्ये मेथीची पानं सुकवून घ्या. त्यासाठी तुम्ही मेथीची पाने थोडा वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.

स्टेप 2 – त्यानंतर मेथीची पानं कापून घ्या. एखाद्या पेपरमध्ये अथवा मोठ्या आकाराच्या टिश्यू पेपरमध्ये पानं पसरवा आणि तीन दिवस अशीच पानं सुकू द्या. लक्षात ठेवा की, पानं सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेऊ नका

स्टेप 3 – पाने सुकू द्या कारण सावलीमध्ये  पाने सुकल्यावर याचा रंग आणि पाने याचा सुगंध चांगला राहतो. तुम्ही पंख्याखालीही पाने सुकवू शकता. पंख्याखाली सुकायला साधारण दोन दिवस लागतात. यानंतर पाने कुरकुरीत होण्यासाठी साधारण एक तास उन्हात ठेवा

स्टेप 4 – पाने व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही एका चाळणीमधून ही पाने चाळून घ्या.  जेणेकरून त्यावर कोणतीही धूळ असेल तर ती निघून जाईल. आता मायक्रोवेव्हमध्ये ही पाने ठेवा आणि साधारण 30 सेकंदसाठी गरम करा. नंतर पाने थंड होऊ द्या

स्टेप 5 – घरच्या  घरी कसूरी मेथी तयार आहे. तुम्ही ही पानं हातांनी कुस्करून एका टाईट कंटेनरमध्ये भरून ठेऊ शकता. झिपलॉक बॅगमध्येही ही कसूरी मेथी ठेऊ शकता.

DIY: हिवाळ्यात केसगळतीची असेल समस्या तर घरीच बनवा मेथी दाण्याचं तेल

मायक्रोवेव्हमध्ये कशी बनवाल कसूरी मेथी

Instagram

Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi

कसूरी मेथी कशी कराल स्टोअर

कसूरी मेथी एका स्वच्छ काचेच्या जारमध्ये तुम्ही ठेवा. तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये साधारण सहा महिने ही स्टोअर करून ठेऊ शकता. तसंच याचा वापर तुम्ही सहा महिने करू शकता.  त्यानंतर याचा रंग बदलू लागतो आणि याचा स्वादही खराब होतो. लक्षात ठेवा की, सुकलेली ही पाने दमटपणापासून दूर ठेवा आणि याचा वापर करा. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता.

Read More From DIY लाईफ हॅक्स