Jewellery

ट्रेंडिंग असणारी ब्रेसलेट मंगळसूत्र, नेहमीच्या वापरासाठी सोपी

Dipali Naphade  |  Sep 15, 2020
ट्रेंडिंग असणारी ब्रेसलेट मंगळसूत्र, नेहमीच्या वापरासाठी सोपी

लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालणं ही आपली परंपरा मानली जाते. पण आजकाल बऱ्याचदा धावपळीच्या आयुष्यात आणि वाढत्या चोरीचकारीमुळे मोठं मंगळसूत्र घालणं शक्य नसतं किंवा महिलांना गळ्यात मंगळसूत्र सगळ्या कपड्यांवर घालणं सूट होत नाही असं वाटतं. त्यामुळे आता बदलत्या ट्रेंडनुसार ब्रेसलेट मंगळसूत्र घालताना आता बऱ्याच महिला दिसतात. मुळात हे ब्रेसलेटप्रमाणे असल्यामुळे कोणत्याही कपड्यांवर उठून आणि आकर्षक दिसतं आणि बऱ्याचदा पटकन एखाद्याच्या डोळ्यातही भरत नाही. तसंच तुमच्या हातात असल्यामुळे सुरक्षितही राहतं. आता ट्रेंडनुसार महिला मंगळसूत्र ब्रेसलेट अथवा रिंग्ज स्वरूपात घालताना दिसून येतात. त्यामुळे याचे आता वेगवेगळे डिझाईन्स यायला सुरूवात झाली आहे. अगदी सामान्य महिलांना आणि विशेषतः ऑफिसला जाणाऱ्या महिलांना हे ब्रेसलेट मंगळसूत्र जास्त पसंतीला येत असल्याचे दिसून येत आहे. सर्वात पहिल्यांदा हा ट्रेंड सुरू केला तो बॉलीवूडमधील फॅशन आयकॉन शिल्पा शेट्टीने. तेव्हापासून ही फॅशन ट्रेंडिंग असून आता याचा जास्तच उपयोग होऊ लागला आहे.

शिल्पा शेट्टीने सुरू केला ट्रेंड

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत नेहमीच टॉप लिस्टमध्ये असते. शिल्पा शेट्टी नेहमी आपल्या हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालते. कोणत्याही आऊटफिटसह हे ब्रेसलेट कॅरी करता येत असल्यामुळे हे घालणं सोपं होतं आणि परंपराही सांभाळली जाते असं शिल्पाचं म्हणणं आहे. शॉर्ट ड्रेस असो वा ट्राऊजर्स असो कोणत्याही आऊटफिटसह शिल्पा हे मंगळसूत्र घालताना नेहमी दिसून आली आहे. 

ट्रेंडी डिझाईन

बाजारामध्ये मंगळसूत्रांचे वेगवेगळे ट्रेंडी डिझाईन्स आणि रिंग्ज पाहायला मिळतात. पण तुम्हाला काही नवीन हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्रेसलेट मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता. तुम्ही मंगळसूत्रांच्या डिझाईन्सचे रिंग्जदेखील वापरू शकता. पण हल्ली महिलांना मंगळसूत्र ब्रेसलेट जास्त प्रमाणात आवडत आहे. अशा प्रकारची साधी आणि सुंदर ब्रेसलेट मंगळसूत्र तुम्ही नक्की वापरू शकता. 

अबब! बॉलीवूडच्या स्टार्सच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

अक्षरवाले मंगळसूत्र

मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाचे पहिले अक्षर घालूनही डिझाईन बनवून घेऊ शकता. अशा स्वरूपाच्या मंगळसूत्रांना जास्त मागणी आहे. तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र घालायला आवडत नसेल आणि परंपराही जपायची असेल तर तुम्ही अशा स्वरूपाचे जोडीदाराच्या पहिल्या अक्षराचे स्टायलिश डिझाईनचे ब्रेसलेट बनवून घालू शकता. यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं तसं डिझाईन बनवून घेऊ शकता. 

मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन्स

स्टायलिश डिझाईन

आजकाल मुली लग्नानंतर जास्त काळ मंगळसूत्र गळ्यात घालून ठेवत नाहीत. ऑफिसला जाताना किंवा एखाद्या आऊटफिटवर मंगळसूत्र मॅच करत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. बऱ्याचदा घरातील ताणामुळे महिलांना मंगळसूत्र घालावंही लागतं. त्यामुळे अशा वेळी अशा स्वरूपाची स्टायलिश डिझाईनची ब्रेसलेट मंगळसूत्रं तुम्हाला उपयोगी पडतात. जी तुम्ही परंपरा सांभाळण्यासह हातात व्यवस्थित कॅरी करू शकता. तसंच याची डिझाईन्स अतिशय नाजूक असतात आणि त्याशिवाय ही मंगळसूत्र सांभाळणंही अधिक सोपं असतं. यामध्ये काळ्या  मण्यांसह सोनं आणि हिरे असे कॉम्बिनेशनही तुम्हाला मिळू शकते. त्याशिवाय तुम्हाला हवं तसं स्टायलिश डिझाईन तुम्हाला तुमच्या सोनाराकडून घडवून घेता येतं. तसंच अगदी खोटी मंगळसूत्रही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला बाजारात मिळतात. म्हणजे तुम्ही नेहमी वेगवेगळ्या डिझाईन्सचं मंगळसूत्र घालून वावरू शकता. पेहरावाप्रमाणे तुम्ही डिझाईन्स निवडून त्याचा वापर करून घेऊ शकता. 

मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Mahashtrian Mangalsutra Designs)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Jewellery