घरात काही गोष्टी बिनसू लागल्या की, आपण लगेचच एखाद्याचा सल्ला घेतो. हा सल्ला ज्योतिषशास्त्र आणि वास्तुचा असतो. घरात काहीही कारण नसताना कलह होणे, अचानक पैशांच्या अडचणी निर्माण होणे असे अनेक त्रास होऊ लागले की, आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोणतेही बदल करायला तयार असतो. घरात कोणते प्राणी ठेवावेत आणि ठेवू नये, कोणत्या प्राण्याचा फायदा हा तुम्हाला होतो हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. हत्ती हे भगवान गणेशाशी निगडीत आहे हे आपण कायम जाणतो. हत्ती (Elephant Statue) हा प्राणी कितीही अजस्त्र आणि भयावह असला तरी तो तितकाच मवाळ आणि प्रेमळ असतो हे आपण अनेकदा पाहिले असेल. हत्ती या वास्तुशास्त्रात आणि फेंगशुईशास्त्रात एक वेगळे स्थान आहे. घरात हत्ती ठेवणे का चांगले असते आणि कोणत्या कारणासाठी तो ठेवावा ते जाणून घेऊया.
अधिक वाचा: जुलै महिन्यात शनिचा मकर राशीत प्रवेश, धनलाभासाठी अचूक उपाय
हत्ती मानले जाते शुभ
हत्ती शुभ आहे की नाही हे कोणालाही विचारण्याआधी तुम्ही थोडा हिंदू आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की, या दोन्ही धर्मात त्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिंदू धर्मात हत्ती हे देवी लक्ष्मी, देवांचा देव इंद्र याचे वाहन म्हणून हत्तीला मान आहे. त्यामुळे हत्ती हे भरभराटीसाठी अनेक ठिकाणी ठेवण्यात येतो. फेंगशुईमध्ये हत्तीची प्रत्यक्ष मूर्ती नाही पण एखादे पेटिंग जरी लावले तरी देखील ते फारच शुभ मानले जाते.
यश आणि कीर्तिसाठी
आयुष्यात यश कोणाला नको असते. मेहनतीला यश यावे अशी अनेकांची इच्छा असते. अशावेळी जर घरात तुम्ही सोंडवर केलेली प्रसन्न हत्तीची मूर्ती आणली तर तुम्हाला यश मिळण्यास नक्कीच मदत मिळते. घरातील मोकळ्या ठिकाणी हत्तीची मूर्ती आणून ठेवा. तुम्हाला नक्कीच तुमच्या कामात यश मिळण्यास मदत मिळेल.
व्यवसायात यश मिळण्यासाठी
एखादा नवा व्यवसाय किंवा काम करण्याचा विचार करत असाल तर अशावेळी तुम्ही ज्या दिवशी कामाची सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही तुमच्या टेबलावर आणून एका छोट्याशा हत्तीची मूर्ती ठेवा. त्याची पूजा करा. खरंतर खूप ठिकाणी चांदीची मूर्ती आणा असे सांगितले जाते. पण ते शक्य नसेल तर तुम्ही जी उपलब्ध मूर्ती असेल ती आणली तरी देखील चालू शकते.
प्रेम वाढण्यासाठी
खूप जोडप्यांमध्ये प्रेम तर असते. पण काही गोष्टीमध्ये त्यांचे काही केल्या पटतन नाही. एकमेकांच्या मनाविरुद्ध कऱण्याचा विचारच येतो. अशावेळी जोडप्यामध्ये प्रेम वाढू दयायचे असेल तर त्यासाठी हत्तीची जोडी मूर्ती घरात आणून ठेवावी. त्यामुळे आपआपसात प्रेम वाढते.
सफलतेसाठी हत्ती
घरात काहीतरी नवे करायचे योजिले असेल. त्या कामात यश हवे असेल तर अशावेळी घरातील भिंतीवर तुम्ही हत्तीचे चित्र लावले तरी देखील चालू शकते. हत्तीचे हे चित्र खास असायला हवे. कारण यामध्ये हत्तीची सोंड ही वर उठवलेली असावी. त्यामुळे हमखास यश मिळते.
बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी
घरात लहान मुलं असतील तर अशावेळी हत्तीची मूर्ती ही फारच फायद्याची असते. मुलांच्या बौद्धिक वाढीला चालना देण्याचे काम करते. इतकेच नाही तर लहान मुलांची एकग्रता वाढवण्यासाठीही हत्ती खूपच फायद्याचा ठरतो. करिअर संबंधी काही तक्रारी असतील तर अशा तक्रारी दूर करण्याचे काम देखील हत्ती करतो. घरात लहान मुलं असतील तर अशांनी अगदी हमखास हत्तीची मूर्ती घरात ठेवावी.
आता तुम्हालाही या पैकी काही फायदे हवे असतील तर घरात हत्तीची मूर्ती अगदी हमखास ठेवायला हवी.