Bridal Hair Styles

साखरपुड्यात करता येतील अशा क्युट हेअरस्टाईल

Leenal Gawade  |  Jun 17, 2021
साखरपुड्यात करता येतील अशा क्युट हेअरस्टाईल

पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. कोव्हिडमुळे अनेकांना लग्नसमारंभ जरी कमीत कमी लोकांमध्ये आटोपायचे असले तरी लग्नसमारंभातील जोश हा कमी झालेला नाही. कारण लग्नासारखे कार्यक्रम हे आयुष्यातून एकदाच होतात. त्यातच साखरपुड्यासारखा समारंभ हा लग्नापेक्षा थोडा छोटेखानी असला तरी यामध्ये लग्नाइतकी लगबग होत नाही. त्यामुळे छान नटता मुरडता येेते. याच साखरपुड्यासाठी तुम्ही काही लुक फायनल केला नसेल तर आज काही सोप्या हेअरस्टाईल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या हेअरस्टाईल क्युट आणि लेटेस्ट अशा आहेत ज्यामुळे तुमचे फोटो येतील एकदम परफेरक्ट. तुम्ही ब्राईड असाल किंवा ब्राईड्समेड या सगळ्यांसाठीच ही हेअरस्टाईल फार उत्तम आहे.

तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी (Preparation For The Bride In Marathi)

लुझ ब्रेड्स विथ कर्ल

Instagram

साखरपुड्यात बरेचदा आपण इंडो वेस्टर्न कपड्यांना अधिक पसंती देतो. खूप जण या खास समारंभासाठी एखादा लेहंगी किंवा छान डिझायनर साडी निवडतात. अशावेळी तुम्हाला अशी लुझ ब्रेड्स विथ कर्ल ही हेअरस्टाईल छान उठून दिसेल. केसांच्या क्राऊन भागामध्ये अशा पद्धतीने लुझ वेणी घालून ती मागे पिनअप केली जाते. त्याला थोडे अधिक चांगला लुक येण्यासाठी त्या जागी ब्रोचेस लावण्यात येतात. सध्या ट्रेंडमध्ये काही फ्लॉवर पॅटर्न आहेत जे यामध्ये खूपच उठून दिसतात. तुमचे केस लांब असतील किंवा हायलाईट केलेले असतील तर या लुकमध्ये कर्ल अधिक सुंदर दिसतात. या हेअरस्टाईलमुळे तुम्ही चार चौघात उठून दिसता. 

 

केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

कर्ल विथ फ्लॉवर गार्डन

Instagram

सध्या तुम्ही सगळीकडे अशा प्रकारची हेअरस्टाईल अगदी हमखास पाहिली असेल. लेहंगा घातला असेल तर अशी हेअरस्टाईल ही फारच उठून दिसते. वरच्या हेअरस्टाईलमध्ये थोडासा बदल यामध्ये केेलेला असतो तो असा की, यामध्ये सोडलेल्या केसांवर अशापद्धतीने लावली जातात की, त्यामुळे केसांवर गार्डन आहे असेच वाटते. तुमचे केस लहान असले तरी देखील केसांच्या सप्लिमेंट लावून अशाप्रकारे ही हेअरस्टाईल केली जाते. जी फारच सुंदर दिसते.

 

केसांचा गुंता सोडविण्यासाठी 5 सोप्या टिप्स, केस नाही तुटणार

पफ अॅण्ड कर्ल

Instagram

आता जर तुम्हाला या वरच्या दोन्ही हेअरस्टाईलप्रमाणे लुक नको असेल. थोडा सोबर आणि लाईट असा मेकअप करायचा असेल तरी देखील तुम्ही पफ आणि कर्ल अशी हेअरस्टाईल निवडू शकता. यामध्ये तुमच्या क्राऊन भागावर एक पफ तयार केला जातो. याला अधिक चांगला दिसण्यासाठी याचे क्रिम्पिंग केले जाते. त्यानंतर मागच्या केसांचा लुझ कर्ल केले जाते. या केसांवर कोणत्याही हेअर अॅसेसरीज लावल्या जात नाहीच त्यामुळे हा लुक एकदम प्लेन असा असतो. पण तरीही हा लुक चांगला उठून दिसतो.

जास्मिन हेअर

Instagram

जर तुम्हाला अल्लादिन नावाचे कार्टुन आठवत असेल तर तुम्हाला जास्मिन हे सुंदर पात्र अगदी नक्कीच आठवणार. ही हेअरस्टाईल साडी किंवा लेहंगा अशा कशावरही चांगली दिसते. ही हेअरस्टाईल म्हणजे एक प्रकारची लुझ वेणी म्हणायला काहीच हरकत नाही. फक्त यामध्ये केसांच्या तीन पेढ्या केल्या जात नाही तर केसांना अंतर अंतर ठेवून बांधले जाते हा केसांचा फुगा दिसतो. जो खूप छान दिसतो. त्यावर काही हेअर अॅसेसरीजही लावता येतात.

फ्लॉवर लुक ब्रेड

Instagram

वेणींचे कित्येक प्रकार आपल्याला माहीत असतील पण आता अशाप्रकारच्या वेणी घातल्या जात नाही. हल्ली वेणीचे असे काही प्रकार केले जातात जे साडी आणि लेहंग्यावर खूप छान उठून दिसतात. अशा हेअरस्टाईल सध्या खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे ज्या तुम्ही योग्य स्टायलिस्ट कडून करुन घ्या. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. 


आता या अशा काही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करु शकता. तुम्ही नक्कीच वेगळे दिसाल.

Read More From Bridal Hair Styles