भविष्य

नजर लागणे म्हणजे नेमकं काय, याबाबतचा विज्ञानाचा पैलू आणि त्यावरील उपाय

Aaditi Datar  |  Apr 20, 2020
नजर लागणे म्हणजे नेमकं काय, याबाबतचा विज्ञानाचा पैलू आणि त्यावरील उपाय

तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की, काहीवेळा एखाद्या व्यक्तीला लगेच नजर लागल्याचं बोललं जातं. वाईट नजरेचा परिणाम हा फक्त लोकांच्या करियर किंवा व्यवसायावरच होतो असं नाहीतर त्यांच्या आर्थिक स्थितीवरही होत असतो. परिणामी त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ज्या व्यक्तीला नजर लागते. त्या व्यक्तीला आजारी असल्यासारखं वाटू लागतं. तसंच त्या व्यक्तीला अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो.

का लागते वाईट नजर

संसारात तीन तऱ्हेच्या उर्जा असल्याचं म्हटलं जातं. ज्यामध्ये एक आहे सकारात्मक, दुसरी नकारात्मक आणि तिसरी विरोधात्मक. या उर्जा व्यक्तीच्या विचार, व्यवहार आणि त्या व्यक्तीद्वारे वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून बनतात. लोकांच्या घरी आणि शरीरात मुख्यतः सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा असतात. जेव्हा व्यक्तीकडे असलेल्या नकारात्मक उर्जेचा तिच्या आरोग्यावर, विचारांवर आणि कामावर परिणाम होतो. तेव्हा त्याला नजर लागणे असं म्हटलं जातं.

Shutterstock

नजर लागण्याचा दुसरा पैलू

पण तुम्हाला माहीत आहे का, याचा दुसरा पैलूही आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, आपल्या आसपास खूप बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. हे ज्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी आहे, त्यावर लगेच हल्ला करतात आणि ती व्यक्ती इंफेक्शनच्या विळख्यात सापडते. याचे मुख्य कारण तणावही असू शकते. जेव्हा व्यक्ती आसपासच्या नकारत्मकतेला स्वतःकडे खेचून घेते तेव्हा त्या व्यक्तीला थकवा जाणवू लागतो. परिणामी ती व्यक्तीला जास्त अशक्त झाल्यासारखं वाटू लागतं आणि फ्लू किंवा तापाच्या विळख्यात ती व्यक्ती सापडते.

विज्ञान काय सांगतं?

Canva

काही लोकं नजर लागणं वगैरे यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि याला अंधविश्वास मानतात. पण नजर लागणं हे कल्पित नसून एक विज्ञानाची क्रिया आहे. विज्ञान सांगतं की, शरीरामध्ये विद्युत तरंग असतात. या विद्युत तरंगांमध्ये कोणतीही बाधा निर्माण झाल्यास शरीराला आजारांचा विळखा पडतो.

नजर लागण्यापासून बचावासाठी असे करा उपाय

– वारंवार आजारी पडण्याची स्थिती असल्यास तुम्ही नजरबट्टू म्हणजेच इव्हील आयने स्वतःचा बचाव करू शकता. जे बाजारात आजकाल आरामात मिळतं. 

– काळा धागा हाताला किंवा पायाला बांधू शकता. विज्ञानात काळ्या रंगाला उष्णता शोषणारा रंग मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही काळा धागा बांधल्यास किंवा काळा टीळा लावल्यास हा काळा रंग तुमच्या शरीरामध्ये वाईट नजरेला प्रवेश करणापासून रोखतो आणि स्वतः शोषून घेतो. त्यामुळे व्यक्तीला वाईट नजर लागत नाही. 

अंधश्रद्धा म्हणून नाही तर या कारणांसाठी घातला जातो काळा दोरा

– घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन निघा. बाहेर पडताना गूळ खाल्ल्याने डोक्यात नकारात्मक विचार येत नाहीत. 

– लक्षात घ्या आपल्या आसपासच्या वातावरणाचा आपल्यावर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे आसपासचं वातावरण नेहमी सकारात्मक असाव आणि नकारात्मक उर्जेच्या संपर्कात येणं टाळा. यासाठी तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरात भरपूर झाडं लावा. 

– तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, नकारात्मक उर्जेपासून बचावासाठी तुळशीची पानं खूपच मदत करतात. रोज तुळशीची दोन पानं खाल्ल्यास तुमचं हर तऱ्हेच्या बॅक्टेरियापासून रक्षण होईल आणि तणावही कमी होईल.

बाळाला काळा धागा बांधणं ठरू शकतं, बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक

मग पुढच्या वेळी नजर लागली असं वाटल्यास वरील उपाय नक्की करून पाहा. 

हेही वाचा –

ही प्रचलित भूतं कधी तुमच्या वाट्याला आली आहेत का?

Read More From भविष्य