सौंदर्य

नाकाचा शेप सुधारण्यासाठी करा हे व्यायाम प्रकार

Trupti Paradkar  |  Apr 8, 2022
नाकाचा शेप सुधारण्यासाठी करा हे व्यायाम प्रकार

चाफेकळी नाकामुळे सौंदर्यात अधिकच भर पडते. चेहरा परफेक्ट दिसण्यासाठी नाकाचा शेपपण परफेक्ट असायला हवा. लांब केस, टपोरे डोळे तसंच चाफेकळी नाक सौंदर्यात खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण नाक हा चेहऱ्याच्या केंद्रभागी असतं. सहाजिकच नाकाच्या शेपवरून तुमचा चेहरा आकर्षक दिसत असतो. प्रत्येकाच्या नाकाचा आकार निरनिराळा असू शकतो. नाकाला शेप देण्यासाठी अनेक सौंदर्यवती प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. पण जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने नाक शेपमध्ये आणायचं असेल तर या काही टिप्स नक्कीच फायद्याच्या आहेत. 

नाकाला मालिश करा

वयामानानुसार कधी कधी तुमच्या शरीरातील हाडं आणि मांसपेशींमध्ये बदल होतो.  लहान मुलांचं शरीर मजबूत आणि सुडौल होण्यासाठी त्यांना मालिश केलं जातं. हाडं आणि मांसपेशी मजबूत करण्याचा हा सोपा मार्ग असतो. नाकाला चांगला शेप येण्यासाठीदेखील तुम्ही नाकाला मालिश करू शकता. नाकाला मालिश केलं तर नाक तरतरीत दिसेल. यासाठी नाकाला तेल अथवा क्रिम लावा आणि मालिश करा. जर तुम्हाला सायनस अथवा मायग्रेनचा त्रास असेल तर नाकाला मालिश केलं तर तो त्रासही कमी होतो. 

नाक दोन्ही बाजूने दाबा

नाकाला शेप मिळण्यासाठी नाक दोन्ही बाजून दाबा. या व्यायामाने तुमच्या नाकाला छान शेप मिळेल. हाताच्या बोटांनी तुम्ही नाक दाबू शकता. मात्र लक्षात ठेवा जास्त वेळ नाक दाबून ठेवू नका. कारण यामुळे तुमचा श्वास रोखला जाईल. यासोबतच तुम्ही नाक वर-खाली करू शकता. दररोज नाक वरखाली केल्यामुळे तुमच्या नाकाचा छान शेप बिघडणार नाही.

श्वसनाचे व्यायाम करा 

श्वसनाचे व्यायाम आरोग्यासाठी उत्तम असतात. पण श्वसनाचे व्यायाम केल्याने तुमच्या नाकाला चांगला शेपदेखील मिळतो. यासाठी अनुलोम विलोम करताना जसं आपण एका हाताच्या बोटाने एक नाकपुडी दाबून दुसरीने श्वास घेतो आणि दुसरीकडून श्वास घेत पहिल्या नाकपुडीतून सोडतो तसे करा. ज्यामुळे नाकाला छान आकार मिळण्यास मदत होईल. 

नाक डावीकडून उजवीकडे वळवा 

नाकाला व्यायाम देण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे नाक डावीकडून उजवीकडे अथवा उजवी कडून डावीकडे वळवणे. या व्यायामामुळे नाकातील स्नायू शिथिल होतात आणि त्यांना मजबुती मिळते. पण याचा अर्थ नाक मुरडणे असा होत नाही. शिवाय नाक वळवताना चेहऱ्याचे हावभाव बदलू नका नाहीतर चेहऱ्याच्या स्नायूंवर याचा दुष्पपरिणाम होईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From सौंदर्य