आरोग्य

होळीसाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स, तज्ज्ञांचे मत

Dipali Naphade  |  Mar 25, 2021
होळीसाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स, तज्ज्ञांचे मत

होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्यासारख्या शहरी माणसांसाठी आपल्या आप्तेष्टांसोबत आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांसोबत हा रंगांचा सण साजरा करणे हे आनंद व्यक्त करण्याचे आणि अनुभवण्याचे अजून एक निमित्त असते. पण बदलत्या काळानुसार होळीचा चेहराही बदलला आहे. एके काळी हा सण फुले आणि नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा, त्या जागी आता चकाकणारे रासायनिक रंग आले, पाण्याचे फुगे आणि पाण्याच्या फॅन्सी पिचकाऱ्या आल्या आहेत. आणि साहजिकच हे घटक डोळ्यांसाठी इजा निर्माण करतात. पण होळीच्या या काळात डोळ्यांची विशेष काळजी कशी घ्यायची याच्या महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत क्लिनिकल सर्व्हिसेस, डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल, मुंबईच्या डॉक्टर वंदना जैन यांनी. चला तर मग या होळीला घेऊया डोळ्यांची नीट काळजी. 

होळीसाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स :

Instagram

पश्चातापापेक्षा प्रतिबंध हितकारक असे म्हटले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून खास टिप्स तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. या टिप्सचा नक्की तुम्ही या होळीसाठी काळजी घेताना वापर करा. 

रंगपंचमी माहिती आणि महत्त्व (Rangpanchami Information in Marathi)

डोळ्यांना इजा झाल्यास :

Shutterstock

होळी आणि धुलिवंदन या दोन्ही दिवसांचे महत्व आहे वेगळे, जाणून घ्या इतिहास

होळीदरम्यान होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या खालीलप्रमाणे :

होळीच्या या कालावधीत नेत्रविकार तज्ज्ञांनाही डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. 

यापैकी बऱ्याच इजा अशा आहेत, ज्यामुळे तात्पुरते अंधत्व येऊ शकते किंवा काही वेळा कायमस्वरुपी अंधत्वदेखील येऊ शकते. डोळ्यात रंग गेले, हलकीशी जळजळ झाली आणि डोळे लालसर झाले तर डोळ्यावर पाणी मारल्यावर या समस्या निघून जातात. पण खूप जळजळ होत असेल, वेदना होत असतील आणि दृष्टीदोष निर्माण झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. 

अनेकांना असे वाटते की, कॉन्टॅक्ट लेन्सेस होळीसाठी सुरक्षित पर्याय आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, तुमच्या डोळ्यात जाणारा प्रत्येक रंग ते शोषून घेत असतात आणि तो एका ठिकाणी साकळतो. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोसेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि धुळवड किंवा रंगपंचमी खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे. चष्मे वापरणाऱ्या व्यक्तींना तर खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांनी चष्मा घातला तरी चष्म्याच्या फ्रेमच्या खाचाखोचांमध्ये रंग अडकून बसतात. रिमलेस चष्मे सहज तुटू शकतात. त्यामुळे चष्मा घालणे शक्यतो टाळावे. 

नैसर्गिक रंग हा सुरक्षित पर्याय आहे. बेसन आणि हळदीच्या मिश्रणाने पिवळा किंवा गुलमोहराने नारिंगी, पाण्यात भिजवलेल्या बिटाने गुलाबी रंग, लाल रंगासाठी जास्वंदाचा वापर केला तरी तेवढीच मजा येते! यंदाच्या होळीमध्ये तुमच्या डोळ्यांनाही रंगांचा सोहळा अनुभवू दे!

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश (Rang Panchami Quotes In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य