Festive

ट्रॅडिशनल लूकसाठी खास ड्रेस आयडियाज हव्या असतील तर ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना नक्की फॉलो करा.

Sneha Ranjankar  |  Nov 21, 2018
ट्रॅडिशनल लूकसाठी खास  ड्रेस आयडियाज हव्या असतील तर ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना नक्की फॉलो करा.

 

लग्नाच्या हंगाम असो वा कोणताही कार्यक्रम आपला ट्रॅडिशनल वॉडरोब नेहमीच सज्ज असायला हवा नाही का? म्हणजे ऐनवेळची धावपळ टाळता येते. त्यामुळे तुमच्या वॉ़डरोबमध्ये नेहमीच टी-शर्टस्, शॉर्ट्स, स्कर्टस् यासारख्या कॅज्युअल्ससह सुंदर ट्रॅडीशनल ड्रेसेस ही असायलाच हवेत. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनमधल्या काही अभिनेत्रींचे डोळ्याचं पारणं फेडणारे सूट डिझाईन्स दाखवणार आहोत.

काजोलचा रेड हॉट एम्ब्रॉयडरी सूट

बॉलीवूड अॅक्ट्रेस काजोलचा हा रेड हॉट प्लाजो सूट खरंच किती सुंदर आहे नाही? हा सूट निःशंकपणे तुम्ही कुठल्याही फंक्शनला घालू शकता. विशेष म्हणजे या प्लाजो सूटची खासियत अशी आहे की, त्यावर एम्ब्रॉडरीसोबतच प्रिंटही आहे. काजोलचा हा आऊटफीट डिझायनर अनिता डोंगरे हीने डिझाईन केला आहे. त्याचबरोबर काजोलने घातलेले कानातले पूर्व-पश्चिम ब्रॅंडचे आहेत. तर बांगड्या सिल्वरस्ट्रीक स्टोअरच्या असून स्टाइलिंग राधिका मेहरा हीने केलं आहे.

डेझी शाह स्टाइलिश आउटफीट

डेझी शाहचा हे आउटफिट डिझाइन केलं आहे डिझायनर हेली शाह हीने. अशा पध्दतीचा प्लाजो सूट डे फंक्शनसाठी परफेक्ट आहे. ज्यामुळे उकाड्याचा त्रासही जाणवत नाही.

दिया मिर्जाचा रेड स्टाइलिश पॅन्ट सूट

अभिनेत्री दिया मिर्झाने घातलेला हा ट्रॅडिशनल सूट त्याच्या लाल रंगामुळे उठावदार दिसतोय. देवनागरीने डिझाइन केलेली ही फ्रॉक स्टाइल सुंदर कुर्ती आणि त्यासोबतची रेड एम्ब्रॉयडरी केलेली पॅन्ट यामुळे ह्या सूटला हटके लूक आलाय. जर तुम्ही फेस्टीवलसाठी काही हलकंफुलकं ट्राय करणार असाल तर हे डिझाइन नक्कीच योग्य आहे. यावर तुम्ही फक्त दियासारख्या स्टेटमेंट ईयररिंग्स घातल्या तरी झक्कास दिसाल. दियाने घातलेल्या या ईयररिंग्स महेश नूतनदास यांनी डिझाइन केलेल्या असून जूतीज ईरासोल्सच्या आहेत.

लोलोचा सिंपल आणि सोबर ट्रॅडिशनल सूट

बॉलीवूड अॅक्ट्रेस लोलो म्हणजेच करिश्मा कपूरचा हा ट्रॅडिशनल सूट पांढऱ्या रंगाचा जरी असला तरी खूपच सिंपल आणि सोबर आहे नाही का?  जर तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी हा सूट घातला तर गर्दीत नक्कीच उठून दिसाल. डिझायनर अनिता डोंगरेने डिझाइन केलेला हा सूट फक्त करिश्मालाच नाही तर तुम्हालाही शोभून दिसेल. या फोटोत करिश्माने घातलेली ज्वेलरी एक्झोटीकची असून स्टाइलिंग इशा अमीनने केलं आहे.

अनुष्का शर्माचा ब्लॅक ट्रॅडिशनल सूट

या फोटोत अनुष्काचा ही नजाकत भरी अदा बघून विराट कोहलीचं काय तर आपण ही क्लीनबोल्ड होऊ. त्यावर असलेली नाजूकशी गोल्डन एम्ब्रॉयडरी ह्या सूटला चारचांद लावत आहे. हा सूट प्रसिध्द डिझायनर सब्यसाचीने डिजाइन केला असून मोजडी फिजग्लोबेटच्या आहेत. अनुष्काचं स्टाइलिंग आलिया अलरुफाई आणि श्रद्धा लखानी यांनी केलं आहे.

शमिता शेट्टीचा ट्रॅडिशनल सूट

Image Source : Instagram

जर हा रंग तुमच्या आवडीचा असेल तर मग हा सूट तुमच्या पसंतीस नक्की उतरेल. असे सूट तुम्ही कोणत्याही फेस्टीवल किंवा फंक्शन्सना नक्कीच घालू शकता. हा एम्ब्रॉयडरी केलेला सूट रारस्टूडिओने डिजाइन केला असून मोजडी पेस्टल सॅंडपॉपच्या आहेत.

काजोलचा पीच ट्रॅडिशनल सूट

बॉलीवूड अॅक्ट्रेस काजोलचा आधीचा रेड हॉट लूक आपण पाहीला. आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तिचा आणखी एक स्टाइलिश सूट. या सूटची एम्ब्रॉयडरी खुपच सुरेख असून रंगही उठावदार आहे. त्यासोबत तिने जो प्लाजो घातलाय. त्यामुळे सूटला एक स्टाइलिश लूक आला आहे. हा सूट मंदिरा विर्कने डिझाइन केला असून काजोलने घातलेली ज्वेलरी राब्ता बाई राहूल याची आहे. तिचं स्टाइलिंग राधिका मेहराने केलं आहे. मैत्रिणींनो हा लूक तुमच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळं ऑप्शन ट्राय करण्यासाठी नक्कीच चांगला आहे.

सोनमचा प्रिंटेड ट्रॅडिशनल सूट

बॉलीवूडची स्टाइल आणि फॅशन ‘दिवा’ सोनम कपूरचा हा प्लाजो सूट तसा पहायला गेलं तर सिंपल प्रिंटेड आहे. पण तो त्या प्रिंटमुळेच भारी दिसतोय… कारण हे आहे पारंपारिक गुजराती पटोला प्रिंट. गुलाबी रंग आणि ह्या प्रिंटच कॉम्बीनेशन नक्कीच हटके आहे. हे आउटफिट साक्षी किन्नी हीने डिझाइन केलं आहे तर ज्वेलरी  इनायत ज्वेल्सची आहे. सोनमचं स्टाइलिंग मात्र इतर कोणी नाही, तर खुद्द तिची बहिणी रिया कपूरने केलंय.

करिश्मा कपूरचा अस्सल फेस्टीव्ह ट्रॅडिशनल सूट

बॉलीवूड अॅक्ट्रेस करिश्मा कपूरचा हा ब्लू चूडीदार सूट फक्त आणि फक्त फेस्टिवल्ससाठीच बनला आहे. ह्या सूटची खासियत म्हणजे हा सूट आणि त्याला साजेशी ज्वेलरी दोन्ही सब्यसाचीने डिझाइन केलेली आहे. करिश्माचं स्टाइलिंग ईशा अमीनने केलं आहे.

Read More From Festive