बॉलीवूड

अक्षय कुमारने ‘या’ चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक

Trupti Paradkar  |  Sep 8, 2020
अक्षय कुमारने ‘या’ चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक

अक्षय कुमार अॅक्शन स्टंट स्वतःच करत असल्यामुळे आणि त्याच्या अनेक चित्रपटांचे नाव खिलाडी या शब्दाने सुरू होत असल्यामुळे त्याला बॉलीवूडचा खिलाडी असं म्हटलं जातं. तो एक ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहे. एवढंच नाही तर अक्षय त्याच्या मेहनतीमुळे आज बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. तो एक अॅक्शन हिरो असला तरी त्याने काही चित्रपटांमध्ये चक्क व्हिलनची भूमिकाही साकारली आहे. अक्षयच्या नकारात्मक भूमिकांनाही प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. यासाठी जाणून घेऊ या अक्षयने साकारलेल्या या अफलातून खलनायिकी भूमिका

खिलाडी 420 –

अक्षयने त्याच्या करिअरमध्ये साकारलेली पहिली खलनायकाची भूमिका होती. अॅक्शन हिरो अशी इमेज असूनही या चित्रपटाला आणि त्याच्या नकारात्मक भूमिकेला चाहत्यांनी भरघोस प्रेम दिलं. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री महिमा चौधरी हिने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. 

instagram

अजनबी –

खिलाडी 420 ला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे लगेच पुढच्या वर्षी म्हणजे 2001 साली अक्षयने अजनबी या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षयसोबत बॉबी देओल, करिना कपूर आणि बिपाशा बासू यांनी काम केलं होतं. या चित्रपटात अक्षय आणि बिपाशा या जोडीने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रंचड आवडली होती. ज्यासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कारही मिळाला होता. अजनबी चित्रपट अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता.  

वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा –

अक्षयचा हा चित्रपट 2003 साली दिग्दर्शित झाला होता. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झालेल्या वंन अपॉन ए टाईम इन मुंबईचा सिक्वल होता. या चित्रपटात अक्षयने एका प्रसिद्ध डॉनची भूमिका साकारली होती. अक्षयसोबत या चित्रपटात इम्रान खान आणि सोनाक्षी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

instagram

ब्लू –

या चित्रपटात संजय दत्त, अक्षय कुमार, जायद खान, लारा दत्ता आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. 2009 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये अक्षयने कतरिनासोबत नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅंथनी डिझूजा याने केले होते. या चित्रपटातही अक्षयच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलंच पसंत केलं होतं. 

 

 

8 बाय 10 तस्वीर –

अक्षय कुमारने  2009  साली या एका रहस्यमय थ्रिलर चित्रपटात काम केलं होते. ज्यामध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारली होती. यामध्ये त्याच्यासोबत आयशा टाकिया, शर्मिला टागोर, जावेद जाफरी, अनंत महादेवन, गिरिश कर्नाड यांच्या मुख्य भूमिका होता. नागेश कुकनूर दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत अक्षय होता. याच त्याने जय आणि जीत अशा दोन जुळ्या भावांच्या भूमिका साकारल्या होत्या. ज्यामधील एक व्हिलन असतो हे चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येतं. 

2.0 –

अक्षयने साकारलेला हा सर्वात मोठा आणि बलाढ्य खलनायक होता. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये त्याने एक भयंकर दिसणाऱ्या खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सुपरस्टार रजनी कांत यांची मुख्य भूमिका होती. मात्र अक्षयच्या लुक आणि भूमिकेलाही तितकीच लोकप्रियता मिळाली होती. 

instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अभिनयासाठी ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी सोडली हातातली नोकरी

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

Read More From बॉलीवूड