Dating

रिलेशनशिपमध्ये असताना फ्लर्ट करणं योग्य की अयोग्य

Aaditi Datar  |  Feb 3, 2020
रिलेशनशिपमध्ये असताना फ्लर्ट करणं योग्य की अयोग्य

नाती ही खूप नाजूक धाग्याने विणलेली असतात. त्यामुळे अनेक कपल्समध्ये इतर व्यक्तीला जास्त महत्त्व दिल्यास किंवा जवळीक केलेली वाटल्यास असुरक्षितता वाटते. अशावेळी तुम्हाला कोणी विचारलं की, रिलेशनमध्ये असताना फ्लर्ट करणं योग्य की अयोग्य तर तुम्ही काय उत्तर द्याल. पण बरेचदा अनेकजण नकळतपणे फ्लर्ट करतात. फ्लर्टिंग एक अशी गोष्ट आहे जी नव्या नात्याला जन्म देऊ शकते. अशावेळी याचा विचार करायला हवा की, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि फ्लर्टिंग केलं तर ते तुमच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचं मानलं जातं पण असं मानणं योग्य की अयोग्य आहे, चला जाणून घेऊया.

फ्लर्टिंग म्हणजे चीटिंग

फ्लर्टिंगला चीटिंगशी जोडणं नेहमीच योग्य नाही. पण आकर्षण हा मानवी स्वभाव आहे. अशावेळी ते कोणाबद्दल वाटणं साहजिक आहे. पण एवढं मात्र नक्की की, फ्लर्टिंगची एक सीमा असली पाहिजे. हसणं, मस्करी करणं किंवा चिडवणं हे ठीक आहे. याबद्दल कदाचित तुमचा पार्टनर तुम्हाला काही म्हणणार नाही पण फ्लर्टिंग करत असलेल्या व्यक्तीशी तासंतास बोलणं, फिरायला जाणं हे प्रोब्लमॅटिक आहे. जर याबाबत तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं नसेल किंवा तो याबाबत कंफर्टेबल नसेल तर हे गंभीर वळण घेऊ शकतं. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या भावनांचा सन्मान करा आणि त्या व्यक्तीपासून वेळीच दूर व्हा.

Canava

जळवण्यासाठी फ्लर्टिंग

यापेक्षा वाईट काहीच नाही. फक्त हे जाणून घेण्यासाठी की, तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही. दुसऱ्या व्यक्तीसोबत फ्लर्ट करणं चुकीचं आहे. असं करून तुम्ही तुमच्या भावनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करता आणि तुमच्या नात्यात कटूता आणता. ज्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्या भावनाही दुखावता आणि विश्वासालाही तडा जाऊ शकतो.

तुमचा पार्टनर वयाने मोठा आहे का, मग उपयोगी पडतील या टीप्स

पार्टनरची फ्लर्टिंगसाठी परवानगी

हे वाचल्यावर थोडं विचित्र वाटेल पण आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला विचारून कोण फ्लर्ट करतं. पण जर तुमचं नात मजबूत आणि प्रेम अतूट असेल फ्लर्टिंगबाबत असं विचारणं विचित्र वाटणार नाही. पण अशा परिस्थितीतही फ्लर्टिंगची सीमा कायम ठेवा आणि नात्यात मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका.

Canava

जाणून घ्या कुठे थांबावं

फ्लर्ट करत आहात, परवानगीने करत आहात, मजेसाठी करत आहात जे काही कारण असो. कुठे थांबायचं हे माहीत हवं. तुम्ही नात्यात असताना फ्लर्ट करत आहात आणि या दरम्यन जर समोरच्या व्यक्तीच्या तुमच्याबाबतच्या अपेक्षा वाढल्यास ते भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत वेळीच थांबा आणि गैरसमज दूर करा.

शेवटी प्रत्येक नात्यात महत्त्वाची आहे ती विश्वास आणि प्रेम. जेव्हा या गोष्टींना तडा जातो तेव्हा ते नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे क्षणिक फ्लर्टिंगपेक्षा आपलं नातं दृढ राहावं याकडे लक्ष द्या.

#MyStory: त्याच्याकडे पुन्हा जाणं माझी सर्वात मोठी चूक होती

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From Dating