Care

पार्लर सारखा प्रोफेशनल हेअर वॉश घरीच करा या पद्धतीने

Vaidehi Raje  |  Apr 28, 2022
Salon Like Hair Wash At Home

केस व्यवस्थित व नियमितपणे धुणे ही केसांची निगा राखण्याची पहिली पायरी आहे आणि आपण सर्वजण आठवड्यातून किमान दोनदा केस धुवायला हवेत. पण आपण जेव्हा घरी केस धुतो तेव्हा केस नॉर्मल दिसतात पण जेव्हा आपण पार्लर किंवा सलॉनमध्ये हेअर वॉश घेतो तेव्हा आपले केसांना एक वेगळीच चमक येते आणि फ्रेश लूक मिळतो. कारण घरी केस धुणे आणि सलॉनमध्ये केस धुणे यात मोठा फरक आहे. सलॉन हेअर वॉश खूपच आरामदायी आहे आणि त्यानंतर केस खूप मऊ आणि छान दिसतात,जे घरी केस धुतल्यावर दिसत नाहीत. पण प्रत्येक वेळी आपण सलॉनमध्ये हेअर वॉश घेऊ शकत नाही कारण ते एक खर्चिक प्रकरण आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील प्रोफेशनल हेअर वॉश करू शकता. सलॉनसारखा प्रोफेशनल हेअर वॉश हवा असेल तर या टिप्स फॉलो करा. 

योग्य उत्पादन वापरा

तुम्ही तुमच्या केसांवर कोणते उत्पादन वापरत आहात याने मोठा फरक पडतो. बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर मिळतात. परंतु कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी तुम्ही तुमची टाळू आणि तुमच्या केसांच्या प्रकार जाणून घेऊन त्याप्रमाणेच उत्पादने निवडा. जेव्हा तुम्ही योग्य उत्पादन निवडता तेव्हा ते तुमचे केस अधिक मऊ आणि चमकदार बनतात.

पाण्याचे तापमान कमी असावे 

जेव्हा तुम्ही तुमचे केस धुता तेव्हा पाण्याचे योग्य तापमान असणे फार महत्वाचे आहे. केस धुण्यासाठी खूप गरम किंवा खूप पाणी थंड नाही कोमट पाणी वापरायला हवे. कारण खूप गरम पाण्यामुळे केसांचे नुकसान होते आणि अत्यंत थंड पाण्याने केस धुणे शक्य होत नाही. म्हणूनच पार्लरमध्ये कोमट पाण्याने केस धुतले जातात. केस शॅम्पू करण्यासाठी कोमट पाणी हे सर्वोत्तम आहे. कोमट पाणी क्यूटिकल उघडण्यास आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. तसेच आपले केस धुवून झाल्यानंतर सहन होईल इतपत थंड पाण्याने एकदा केस नक्की धुवावेत म्हणजे टाळूचे ओपन झालेले पोअर्स बंद होतील. 

Salon Like Hair Wash At Home

रगडू नका; हळूवारपणे मालिश करा

जेव्हा तुम्ही शॅम्पूने केस धुवत असाल तेव्हा शॅम्पू व्यवस्थितपणे लावणे देखील खूप महत्वाचे आहे. केस धुताना प्रमाणापेक्षा जास्त शॅम्पू घेऊ नका आणि डोक्याच्या वरच्या भागापासून सुरुवात करून आपल्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा. लक्षात ठेवा तुमचे केस ओले असताना ते तिप्पट कमकुवत असतात त्यामुळे केसांच्या मुळांशी बोटांनी हळूवारपणे मसाज करा. केस ओले असताना टाळू खसाखसा घासू नका. अशाने तुमचे भरपूर केस गळतील. 

डबल क्लिंझिंग करा 

प्रोफेशनल हेअर वॉश आणि घरच्या हेअर वॉश मध्ये मुख्य फरक म्हणजे ते डबल क्लिंझिंग पद्धत वापरतात. म्हणजे पहिल्यांदा केस धुताना बिल्ड-अप निघून जाते आणि दुसऱ्यांदा शॅम्पू केल्याने टाळू स्वच्छ होते.

Salon Like Hair Wash At Home

आवर्जून कंडिशनर वापरा 

केस स्वच्छ धुताना शॅम्पूनंतर एकदा कंडिशनर वापरा. पण टाळूवर कंडिशनर लावू नका. फक्त तुमच्या केसांच्या लेन्थला कंडिशनर लावा. 2-3 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर केस स्वच्छ धुवा.

शेवटी केस स्वच्छ धुवा 

जर तुमच्या केसांमध्ये कोणतेही उत्पादन राहिले तर ते निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. म्हणून केसांमध्ये बिल्ड-अप तयार होणे किंवा निस्तेजपणा टाळण्यासाठी शेवटी केस व्यवस्थित धुवा. केस धुवून झाल्यावर मायक्रोफायबर टॉवेल केसांभोवती गुंडाळा. केस खसाखसा पुसू नका व शेवटी केसांवर हेअर सीरम लावा. ते ओल्या केसांवर केसांच्या लेन्थपासून केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. टाळूला सिरम लावू नका. यामुळे केस मऊ व चमकदार दिसतात आणि केसांमधील गुंता देखील हळुवार सोडवता येतो. 

अशा प्रकारे तुम्ही घरीच पार्लरसारखा हेअर वॉश घेऊ शकता. 

Photo Credit – unsplash

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care