त्वचेची काळजी

फाऊंडेशन लावताना या चुका केल्यामुळे चेहऱ्यावर येतील पिंपल्स

Trupti Paradkar  |  Oct 30, 2020
फाऊंडेशन लावताना या चुका केल्यामुळे चेहऱ्यावर येतील पिंपल्स

मेकअप करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करता ती म्हणजे तुमचा पूर्ण चेहरा फाऊंडेशन आणि कन्सिलरने कव्हर करता. अनेक फाऊंडेशन फुल कव्हरेज देतात यासाठीच वापरले जातात. मात्र असं फाऊंडेशनने पूर्ण त्वचा ब्लॉक करणं मुळीच योग्य नाही त्यामुळे आतातरी यापुढे ही चुक करू नका. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, धुळ, प्रदूषण, हॉर्मोनल असंतुलन याप्रमाणेच तुमचे फाऊंडेशनही तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. यासाठीच चेहऱ्यावरील एक्ने अथवा पिंपल्स दूर ठेवण्यासाठी फाऊंडेशन लावताना या चुका करणं जाणिवपूर्वक टाळा.

खूप जुनं फाऊंडेशन वापरणे –

तुम्हाला पटलं नाही तरी हे एक सत्य आहे. तुम्ही कितीही बेस्ट फाऊंडेशन विकत घेतलं तरी ते लाईफटाईम टिकू शकत नाही. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक ब्युटी प्रॉडक्टला एक एक्सपायरी डेट असते. प्रत्येक प्रॉडक्टनुसार त्याची एक्सपायरी डेट निरनिराळी असू  शकते. फाऊंडेशन साधारणपणे एक ते दीड वर्ष टिकू शकते. त्यानंतर त्याचा रंग, टेक्चर, सुंगध आणि परिणाम बदलू लागतो. असं जुनं झालेलं फाऊंडेशन वापरण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात.

प्रायमर न लावता फाऊंडेशन वापरणे –

प्रायमरमुळे फाऊंडेशनचा तुमच्या त्वचेशी थेट संबध येत नाही. फाऊंडेशन आणि त्वचेमध्ये प्रायमरचा सुरक्षित थर कायम असतो. फाऊंडेशन लावताना नेहमी प्रायमर लावणं गरजेंचं आहे. कारण बऱ्याचदा तुमच्या फाऊंडेशनमध्ये फुल कव्हरेज मिळण्यासाठी केमिकल्सचा वापर केलेला असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. प्रायमर या केमिकल्सपासून तुमच्या त्वचेला दूर ठेवतं. मात्र प्रायमर लावल्यास फाऊंडेशन तुमच्या त्वचेत मुरतं आणि त्वचेचं नुकसान होतं.

हात न धुता फाऊंडेशन लावणे –

लिक्विड फाऊंडेशन लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. ज्यामध्ये ब्रश, मेकअप स्पॉंज( ब्युटी ब्लेंडर) अथवा सरळ हाताची बोटे यांचा समावेश होतो. अनेक महिला फाऊंडेशन लावण्यासाठी हाताच्या बोटांचा वापर करण्याला पसंती देतात. कारण त्यामुळे नैसर्गिक लुक मिळण्याची जास्त शक्यता असते. पण घाणेरड्या, न धुतलेल्या हाताने फाऊंडेशन लावणं मुळीच योग्य नाही. तुम्ही हात धुतले तरी तुमच्या हातावर किती जीव जंतू आहेत हे डोळ्यांना पटकन  दिसत नाही. त्यामुळे तुमच्या हातामधून हे जीवजंतू थेट तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेत प्रवेश करू शकतात. यासाठीच मेकअप धुताना हात निर्जंतूक करा अथवा मेकअप ब्रश, ब्युटी ब्लेंडरने फाऊंडेशन लावा. 

Shutterstock

मेकअप टुल्स नियमित न धुणे

मेकअप करण्यासाठी मेकअप ब्रश, ब्युटी ब्लेंडरचा वापर करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. पण त्यासाठी वेळच्या वेळी मेकअप टुल्स स्वच्छ आणि निर्जंतूक करणे आवश्यक आहे. नियमित वापरलेल्या आणि बराच दिवस ठेवून दिलेल्या मेकअप टुल्सवर धुळ, माती, मेकअप प्रॉडक्टचे कण अडकुन बसतात. मेकअप करताना ते तुमच्या तुमच्या त्वचेत जाऊ शकतात. यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी तुमचा फाऊंडेशन ब्रश नियमित स्वच्छ करा.

फाऊंडेशनवर अती प्रमाणात पावडर लावणे

जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर फाऊंडेशन सेट करण्यासाठी तुम्ही सेटिंग पावडरचा वापर करता. मात्र फाऊंडेशनवर खूप सेटिंग पावडर लावल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स येण्याची जास्त शक्यता असते. 


जर तुम्ही या पाच चुका फाऊंडेशन लावताना केल्या नाही तर तुम्ही मेकअप करूनही तुमच्या त्वचेची योग्य निगा राखू शकता. 

त्याचप्रमाणे फाऊंडेशन लावण्यासाठी तुम्ही जर योग्य टुल्स वापरले आणि ते वेळीच निर्जंतूक केले तर तुमच्या त्वचेचं नुकसान नक्कीच टाळता येऊ शकतं. यासाठी मायग्लॅमचे हे मेकअप ब्रश नक्कीच ट्राय करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)

DIY : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी लागणारं सोल्युशन असं करा स्वतःच तयार

या फेस्टिव्ह सीझनसाठी आयशॅडोचा गोल्डन रंग आहे पुरेसा, असा करा वापर

Read More From त्वचेची काळजी