Vastu

घरात लावली घोड्याची नाल तर येईल भरभराट (Ghodyachi Naal For Home According To Vastu)

Leenal Gawade  |  Jan 20, 2021
घोड्याची नाल

वास्तूत काय असायला हवे काय नाही, हे वास्तू शास्त्रामध्ये अगदी इत्यंभूत सांगितले आहे. जर एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल तर तो दोष निवारणासाठी वास्तूमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायला दिल्या जातात. दिशा आणि वास्तूचा अभ्यास करुन याबाबतीत मार्गदर्शन केले जाते. घोड्याची नाल ही देखील फारच पवित्र मानली जाते. घरात आनंद आणण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी घोड्याची नाल घरात असावी असे म्हणतात. तुम्ही कधी घोड्याची नाल फायद्याची कशी या विषयी काही ऐकले आहे का? तुम्ही ही माहिती कधीही वाचली नसेल तर जाणून घ्या घोड्याची नाल कशी असते फायदेशीर

घोड्याची नाल म्हणजे काय? (What Is Ghodyachi Naal)

Instagram

अश्व अर्थात घोडा. हा एक चपळ प्राणी आहे. मानवाच्या उत्क्रांतीप्रमाणेच घोड्याचा वापर हा फार पुरातन काळापासून वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. घोडा हा प्राणी कामसू आणि उमद्या स्वभावाचा आहे. पूर्वीपासून त्याचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जात आहे. अगदी युद्धापासून सामान वाहून नेण्यापर्यंत घोडा हा प्राणी फारच कामाचा आहे. इतकी सगळं काम करताना त्याच्या चपळ पायांना कशाचीही इजा होऊ नये. म्हणूनच त्याच्या पायांना इंग्रजी U आकारामध्ये एक धातू लावला जातो. त्याला ‘नाल’ असे म्हणतात. घोड्याच्या पायाला ही नाल ठोकून लावली जाते. ही नाल लावताना घोड्याला दुखापत होते, असे जरी वाटत असले तरी घोड्यासाठी ती एखाद्या मजबूत चपलेप्रमाणेच काम करते. धावताना किंवा पळताना घोड्याच्या पायाला काटे किंवा दगड लागत नाही.याच कारणासाठी ही नाल लावली जाते. घोड्याची नाल ही जशी जुनी होते तशी ती निघू लागते. ती पडली की, मग घोड्याला नवी नाल लावली जाते. घोडा साधारण मोठा झाला की, त्याला ही नाल लावण्यात येते.

घोड्याची नाल आणते भरभराट (Benefits Of Ghodyachi Naal According Vastu)

घोड्याची नाल घरात लावल्याने अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार जाणून घ्या घोड्याच्या नालचे फायदे 

संपत्तीत वाढ

अचल संपत्ती हवी असेल तर घरात घोड्याची नाल लावण्यास सांगितली जाते. काळ्या घोड्याची नाल ही त्यासाठी फारच फायदेशीर मानली जाते. घोड्याची नाल एखाद्या लाल कपड्यात गुंडाळून ती लॉकर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी सोनं ठेवता त्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्याची वृद्धी होते असे म्हणतात. तुमच्याकडे ही संपत्ती टिकून राहण्यासाठी घोड्याची नाल फारच लाभदायक असते. घोड्याची नाल घरात अशा ठिकाणी ठेवल्यामुळे त्याची वृद्धी होते. अनेकदा पैशांची सतत कमतरता भासणाऱ्यांना आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशा दोघांनाही घोड्याची नाल कपाटात ठेवण्यास सांगितली जाते. त्यामुळे पैसा स्थिर राहतो. तो कोणत्याही चुकीच्या मार्गाने घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे तुमच्या चल -अचल संपत्तीत वाढ होते.

अन्न धान्याची कमतरता नाही

Instagram

घराची भरभराट ही नुसती पैसा अडकाने होत नाही. तर घरात अन्नधान्य आणि दुधदुभते पण असावे यासाठीही घोड्याची नाल फारच फायदेशीर असते. घोड्याची नाल एका लाल कपड्यात गुंडाळून ती धान्यांच्या डब्यात किंवा स्वयंपाक घरात ठेवल्याने अन्न धान्याची कमतरता कधीही कोणाला जाणवत नाही असे म्हणतात. घरातील पैसा अडकासोबत अन्नधान्याची भरभराट व्हावी यासाठीही घरात घोड्याची नाल ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही अन्नधान्याची कधीच कमतरता पडू नये असे वाट असेल तर घोड्याची नाल आणून ती कपड्यात बांधून धान्यांच्या डब्यात ठेवा.

नकारात्मक उर्जा ठेवते दूर

अनेकदा नकारात्मक उर्जेचा त्रास प्रगती खुंटवण्यास कारणीभूत ठरतो. जर तुम्हालाही तुमची प्रगती खुटंल्यासारखी वाटत असेल आणि नकारात्मक उर्जेमुळे हा त्रास होत असेल असे वाटत असेल तर तुम्ही घोड्याची नाल लावायला हवी. घोड्याची नाल लावल्यामुळे नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यास मदत होते. घोड्याची नाल घरात योग्य मार्गदर्शनानंतर लावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नकारात्मक उर्जा दूर करुन तुमचे आयुष्य सकारात्मक उर्जा आणण्याचे काम करते.

नजर दोषापासून ठेवते दूर

नजरेची बाधा अनेकांना होते. नजरेची बाधा तुम्हाला होत असेल तर तुम्हाला नजरदोषापासून दूर ठेवण्याचे कामही घोड्याची नाल करते. अनेकदा नवीन घर, नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची पूजा केली जाते. गाडीला काळी बाहुली लावली जाते. अगदी त्याचप्रमाणे नजर दोषापासून दूर ठेवण्यासाठी घोड्याची नाल लावली जाते. घोड्याची नाल नजरदोषासाठी कुठे लावायला हवी हे देखील माहीत करुन घ्या. कारण वेगवेगळ्या लाभासाठी घोड्याची नाल कुठे ठेवावी हे देखील सांगितले जाते. त्याचे पालन केले तर त्याचा फायदा नक्की होतो.

शनीचा होत नाही त्रास

Instagram

शनी दोषापासून दूर ठेवण्यासही घोड्याची नाल फारच फायदेशीर असते. घोड्याची नाल ही लोखंडाची असते. लोह हा शनीचा धातू आहे आणि काळा हा शनीचा आवडीचा रंग आहे. शनीच्या प्रकोपासून दूर राहायचे असेल तर काळ्या रंगाच्या घोड्याच्या पायाची नाल घेऊन ती नाल घरामध्ये लावून ठेवा. घोड्याची नाल तुम्ही घरात स्थापित केली तर शनीची बांधा होत नाही.शनीच्या प्रकोपापासून तुमची सुटका होते. अनेक जण शनीची बाधा होऊ नये म्हणून घासलेल्या घोड्याच्या नालची अंगठी करुन घालतात. त्यामुळेही शनीची बाधा दूर होते. एखाद्याला शनीची बाधा असेल तर तुम्ही अगदी हमखास योग्य सल्ल्याने घरात घोड्याची नाल आणून ठेवा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

घर सुरक्षित राहतं

घराची सुरक्षितता हवी असेल आणि घरात कायम आनंदी वातावरण राहावे असे वाटत असेल तर तुम्ही घरात घोड्याची नाल लावायलाच हवी. घोड्याची नाल जर तुम्ही दरवाजाबाहेर घोड्याची नाल लावा. घोड्याची नाल लावल्यामुळे घर सुरक्षित राहते. घरात आनंदाचे वातावरण राहते. घरात आनंद आणि भरभराट टिकून राहिल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा कायम राहते. घरात अगदी कोणतीही नकारात्मक उर्जा आली तरी देखील त्याला दूर ठेवण्यासाठी घोड्याची नाल मदत करते.

उद्योगधंद्यात प्रगती

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठीही घोड्याची नाल ही फारच फायद्याची आहे. घोड्याची नाल जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावली तर तुमच्या उद्योगधंद्यात वृद्धी होते. घोड्याची नाल कामाच्या ठिकाणी लावल्यामुळे उद्योगधंद्यात प्रगती होते. घोड्याची नाल ही काळ्या रंगाची असावी. त्यामुळे याचा फायदा अधिक होतो. जर तुमचा उद्योग नवा असेल किंवा तुम्हाला उद्योगात जम बसवायचा असेल तर तुम्ही घोड्याची नाल लावायला हवी.

शत्रूंपासून करते बचाव

अनेकांना शत्रूंची बाधा असते. ही शत्रूंची बाधा प्रगतीसाठी हानिकारक असते. जर तुम्हालाही शत्रूंची बाधा असेल तर तुम्ही तुमचा बचाव करण्यासाठी घोड्याची नाल लावण्यास सांगितले जाते. घोड्याची नाल ही अनेकदा घराबाहेप लावण्यास सांगिंतली जाते. घोड्याची नाल घराबाहेर किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी शत्रूंची बाधा होते असे वाटत असेल तिथे योग्य ठिकाणी तुम्ही ही घोड्याची नाल लावा. तुमचे शत्रूंपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल. 

घरी या ठिकाणी लावावी घोड्याची नाल (Places To Keep Ghodyachi Naal)

Instagram

घोड्याची नाल कशापद्दतीने लाभदायक आहे हे जाणून घेतल्यानंतर घरी ती नेमकी कुठे लावायला हवी हे देखील जाणून घ्या. या काही टिप्स असल्या तरीदेखील तुम्ही योग्य सल्ला घेतल्याशिवाय घोड्याची नाल लावू नका. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. घोड्याची नाळ कशी मिळवावी?

घोड्याची नाल ही नवीन आणून चालत नाही. घोड्याने वापरुन ती झिजवली आणि त्याच्या पायातून ती आपोआप पडली की, मगच त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करता येतो. त्यामुळे ज्या ठिकाणी घोड्यांचा पागा ज्या ठिकाणी आहे तेथूनच तुम्ही पडलेली नाल आणा आणि मग त्याचा वापर करा.

2. खरी घोड्याची नाळ कुठे मिळते?

वास्तू शास्त्रकार अनेकदा घोड्याची नाल लावण्यास सांगतात. त्यामुळे हल्ली सगळीकडे घोड्याची नाल मिळते. पण खरी घोड्याची नाल ही त्यासाठी आवश्यक असते. घोड्याची खरी नाव ही केवळ पाग्यात मिळू शकते. ज्या ठिकाणी घोडे ठेवले जातात अशा ठिकाणी घोड्याची खरी खुरी आणि वापरलेली नाल तुम्हाल मिळू शकेल. वापरलेली नालही थोडी चपटी काळवंडलेली असते.

3. वास्तूशास्त्रकाराला नाल लावताना दिशा विचारणे आवश्यक असते का?

घोड्याची नाल ही फारच लाभदायक असली तरी ती तुम्हाला कोणत्या कारणासाठी लावायची आहे त्यानुसार त्याची दिशा ठरवली जाते. घोड्याची नाल लावताना जर तुम्ही योग्य सल्ला घेतला तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे घोड्याची नाल लावताना एकदा तरी याचा सल्ला घ्या.

घोड्याची नाल कशी लाभदायक आहे हे जाणून घेतल्यानंतर योग्य सल्ल्यानिशी घरात भरभराट आणा.

Read More From Vastu