बॉलीवूड

पुन्हा एकदा एकत्र येणार गोविंदा आणि रविनाची सुपरहिट जोडी

Trupti Paradkar  |  Jul 4, 2021
पुन्हा एकदा एकत्र येणार गोविंदा आणि रविनाची सुपरहिट जोडी

नव्वदचा काळ असा होता जेव्हा सगळीकडे गोविंदाची जादू पसरली होती. गोविंदा एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत असते आणि त्याचे सर्व चित्रपट तुफान हिट होत असत. विशेष म्हणजे तो ज्या अभिनेत्रीसोबत चित्रपटात काम करेल त्या अभिनेत्रीसोबत त्याची जोडीदेखील हिट होत असते. गोविंदासोबत अनेक अभिनेत्रींची जोडी आजवर हिट झाली आहे. पण सर्वात जास्त गाजली ती जोडी म्हणजे गोविंदा आणि रविना टंडन ही जोडी… या जोडीवर प्रेक्षकांना भरभरून प्रेम केलं. त्याचं एखादं गाणं असो वा संपूर्ण चित्रपट आजही लोक त्यांना एकत्र पाहण्यासाठी वेडे होतात. लवकरच पुन्हा एकदा ही सुपरहिट जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. रविना टंडनने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर या अर्थाची एक पोस्ट शेअर केली आहे. 

रविनाने शेअर केले फोटो

रविना टंडनने तिच्या सोशल मीडियावर गोविंदा आणि तिचा फोटो अपलोड केला आहे. हा फोटो सेल्फी अशून त्यासोबत तिने कॅप्शन दिली आहे की, ” दी ग्रैंड रियुनिअन, पुन्हा एकदा आम्ही एकत्र येत आहोत. का, कुठे आणि कधी… लवकरच यत आहोत ” यासोबतच तिने #Kisidiscomeinjayein हे हॅशटॅग टॅग केलं आहे. रविनाने शेअर केलेल्या या फोटोला आणि पोस्टला प्रेक्षकांनी व्हायरल केलं आहे. इन्स्टाग्रामवर या फोटोवर लाईक्स आणि कंमेट्स मिळत आहेत. बॉलीवूडचे इतर कलाकार आणि प्रेक्षक असे सर्वच गोविंदा आणि रविनाला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. एका युझरने तर यावर अरे वा ! क्या बात है तर एकाने आम्ही यासाठी आता मुळीच वाट पाहू शकत नाही अशा अर्थाच्या कंमेट केल्या आहेत. 

असा गाजवला होता नव्वदचा काळ

नव्वदचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यांना या रियुनिअनचे महत्त्व नक्कीच समजले असेल. लोक या जोडीला पाहण्यासाठी चित्रपटगृहात तुफान गर्दी करत असत. आजवर गोविंदा आणि रविनाच्या जोडीने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. ज्यामध्ये दुल्हे राजा, परदेसी बाबू, आंटी नं 1, बडे मियॉ छोटे मियॉ. राजाजी अशा चित्रपटांचा समावेश आहेत. आता मात्र दोघेही बॉलीवूडमध्ये जास्त काम करताना दिसत नाहीत. गोविंदा कधी कधी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावतो. मात्र त्याची लोकप्रियता इतकी आहे की आजही त्याच्यासाठी एखादं सुपरहिट गाणं रिक्रिएट केलं जातं. रविना टंडन लग्न, मुलं, संसार, सामाजिक कार्य यामध्ये चांगलीच व्यस्त आहे. मात्र सध्या ती ‘अरण्यन’ मधून डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. यासोबतच ती कन्नड स्टार यश आणि अभिनेता संजय दत्तसोबत बहुभाषी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ मध्ये असणार  आहे. आता रविनाने ही पोस्ट शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये  चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. कारण या पोस्टमध्ये रविनाने गोविंदासोबत ती कधी, कुठे एकत्र येणार हे सांगितलेलं नाही. ते दोघं एखाद्या चित्रपट अथवा वेबसिरिजमध्ये एकत्र येणार की एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये किसी डिस्को मे जाए हे सुपरहिट गाणं रिक्रिएट करणार याचा काहीच अंदाज यातून लावता येत नाही आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

अभिनेत्री सुरभी हांडे दिसणार देवी सप्तश्रृंगीच्या भूमिकेत

रणवीर सिंहच्या या लुकची सगळीकडे चर्चा, आता केलाय असा अवतार

Read More From बॉलीवूड