Recipes

#गुढीपाडवा: या दिवशी असा सेट करा मस्त साधा-सोपा मराठमोळा मेन्यू

Leenal Gawade  |  Mar 21, 2020
#गुढीपाडवा: या दिवशी असा सेट करा मस्त साधा-सोपा मराठमोळा मेन्यू

मराठी नववर्ष म्हणजे आपला गुढीपाडवा. गुढीपाडव्याची महती मराठी बांधवांमध्ये जास्त असल्याने तयारी सगळ्यांचाच घरी सुरु झाली असेल. गोंड्यांचे हार, गुढी उभारण्याची तयारी, दारासमोर रांगोळी आणि नव्या कपड्यांची खरेदी हे सगळं झालंच असेल. प्रत्येक जण हा सण आपआपल्या घरी साजरा करतात. सकाळी छान शोभायात्रा काढली जाते, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि दुपारी मस्त मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला जातो. महाराष्ट्रीयन जेवण काय असते याचा चमचमीत अनुभव तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी येतो. सध्याचे दिवस पाहता घराबाहेरुन काही मागवणं आणि खूप काही करणं अजिबात शक्य नाही. घरच्या घरी श्रीखंड कसा तयार करायचा हे आम्ही तुमच्यासोबत शेअर केले आहेच. पण आता अगदी झटपट आणि साधा- सोपा मराठमोळा मेन्यू कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया.

गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

महाराष्ट्रीयन पानात असतात हे खास पदार्थ

Instagram

आता गुढीपाडवा हा सण मराठमोळा आहे म्हटल्यावर मेन्यूसुद्धा अगदी खास आणि मराठमोळा असतो. म्हणजे वरण-भात, सुकी आणि रस्सा भाजी, उसळ, पुरी किंवा पोळी,  तळणीचा पदार्थ, गोड असं सगळं आपण पानात वाढतो.

असा तयार कसा सोपा मेन्यू

Instagram

आपल्या सगळयांनाच किचनमध्ये खूप वेळ घालवायला आवडत नाही आता हा सोपा मेन्यू ठरवायचा कसा  

पोळी की पुरी:

जर तुम्ही घरी रोजच पोळी करत असाल तर आज सणाच्या दिवशी तुम्ही पुरीचा बेत करा. पुऱ्या करणे फारच सोपे असते. म्हणजे तुम्हाला गोल गोल पुऱ्या लाटण्याचा कंटाळा असेल तर एकच मोठी पोळी लाटा आणि त्यावर पटापटा वाटी किंवा पेल्याने शिक्के पाडा. अशा पुऱ्या करणे फारच सोपे असते. त्यामुळे एक दिवस तुम्हाला पुऱ्या करण्यात काहीच हरकत नाही. 

करा भाजीची तयारी:

 आता तुम्हाला पुढची महत्वाची तयारी करायची आहे ती म्हणजे भाजीची. पुरीसोबत तुम्हाला बटाट्याची भाजी आणि एखादी उसळ करायला फारच सोपे जाईल. बटाटा सगळ्याचांच आवडीचा त्यामुळे तुम्ही अगदी आरामात पिवळ्या बटाट्याची म्हणजे उकडलेल्या बटाट्याची मस्त फोडणी देऊन भाजी करु शकता. ही भाजी मस्त लागते. आता तुम्हाला एखादी उसळ करायची असेल. तर चण्याची, पांढऱ्या वाटाण्याची, काळ्या वाटाण्याची अशी मस्त चमचमीत उसळ करु शकता. आता तुमची भाजी, पुरी तयार आहे. यासोबतच तुम्ही जास्तीचा कांदा, टोम्ॅटो, काकडी चिरा म्हणजे तुमची कोशिंबीरही तयार.

आता वेळ वरण भाताची:

मस्त चमचमीत वरण, भात त्यावर साजूक तूप वा.. अजून आयुष्यात काय नवीन हवं. जर तुम्हाला भाताचा कुकर लावता येत असेल तर सगळ्यात बेस्ट मस्त भात, डाळ शिजायला एकत्र ठेवा. आता तुम्हाला वेळ वाचवायची असेल तर डाळ शिजवताना त्यामध्ये हळद, मसाला, टोमॅटो, खोबरं घालता येईल अशी डाळ केली तर तुम्हाला वेगळी फोडणी घालावी लागत नाही. जर तुम्हाला डाळीला फोडली द्यायची असेल तर तुम्ही त्याची तयारीही करुन ठेवा. 

तळणीचे पदार्थ:

आता काहींना कोथिंबीर वडी, अळू वडी असे पदार्थ खाण्याची काही जणांना सवय असते. त्यामुळे जर तुम्हाला हे पदार्थ करायचे असतील. तर तुम्हाला पुरीचे तेल तापवतानाच ते करायचे आहे. कारण त्यामुळे तुम्हाला पुन्हा गॅस लावावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही याचे योग्य नियोजन करा. आता तुम्हाला काहीच करायचे नसेल तर तुम्ही याचवेळी छान पापड तळू शकता. 

 

गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

आता तुमचे सगळे पदार्थ तयार झाले आहेत. मस्त पान वाढायला घ्या. पानात मस्त कोशिंबीर, लोणचं, पापड, वरण-भात, पुरी- भाजी वाढा. तुमचा गुढीपाडवा मेन्यू तयार आणि हा सोबत श्रीखंड आणि गोड वाढायला विसरु नका. 

तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Recipes