Recipes

सोप्या पद्धतीने बनवा मकरसंक्रांतीला खुसखुशीत गुळाची पोळी

Dipali Naphade  |  Jan 5, 2021
सोप्या पद्धतीने बनवा मकरसंक्रांतीला खुसखुशीत गुळाची पोळी

मकरसंक्रांत म्हटली की तीळ आणि गुळाचे वेगवेगळे पदार्थ आपोआपच डोळ्यासमोर यायला लागतात आणि मग त्याचे स्वादही आठवू लागतात. परंपरेनुसार घरात मकर संक्रांतीच्या शुभेच्छासोबत बनते ती गुळाची पोळी. आई ही गुळाची पोळी बनवायला लागली की आपोआपच त्याच्या खमंग वासाने पाय स्वयंपाकघराकडे वळतात आणि मनात एकदा तरी विचार येतोच की, ही गुळाची पोळी अशी खुसखुशीत आपल्याला बनवता येईल का? तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. गुळाची पोळी बनवणं तसं तर किचकट काम आहे असं वाटतं. पण अगदी सोप्या पद्धतीनेही आपल्याला गुळाची पोळी नक्कीच बनवता येते. गुळाच्या पोळीसारखा खमंग आणि खुसखुशीत गोड पदार्थ नाही असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. पांढरे तीळ आणि भाजलेल्या गुळाचा खरपूस वास, गरम पोळीवर सोडलेली तुपाची धार…आहाहा…सुटलं ना तोंडाला पाणी. अशीच ही तोंडाला पाणी आणणाऱ्या गुळाच्या पोळीची रेसिपी घ्या जाणून. 

मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व

गुळाची पोळी संक्रांतीलाच का?

संक्रांतीच्या दरम्यान थंडी असते आणि गुळपोळी मध्ये वापरण्यात येणारे पांढरे तीळ, गूळ, शेंगदाणे हे सर्व पदार्थ शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे असतात. तसंच संक्रांत हा सण असतो आणि सणाला शरीरालाही फायदेशीर ठरणारा असा हा गुळपोळीचा नेवैद्य वर्षानुवर्षे दाखविण्यात येतो. वैज्ञानिक कारणामुळेच गुळाची पोळी संक्रांतीदरम्यान केली जाते. पुरणपोळी आपण करतोच. पण गुळाच्या पोळीची सर नक्कीच पुरणपोळीला येत नाही. कारण गुळाच्या पोळीचा खरपूसपणा हा अधिक चविष्ट लागतो आणि थंडीमध्ये गरमागरम गुळपोळी खाण्याची मजाच वेगळी आहे.

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड

गुळाच्या पोळीची रेसिपी

गुळाची पोळी म्हटलं की बऱ्याच  जणांना वाटतं की खूपच फापटपसारा करावा लागणार. पण असं अजिबात नाही. साधारण एक तासामध्ये तुम्ही ही गुळाची पोळी करू शकता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कशी गुळाची पोळी करायची याबाबतील ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. 

सारणासाठी लागणारे  साहित्य 

पारीसाठी साहित्य

कशी करावी गुळपोळी 

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रांतीला नक्की खिचडी का खातात, जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes