Care

केसांना निरोगी ठेवण्यासाठी वापरा सल्फेट-फ्री शँपू

Aaditi Datar  |  Dec 11, 2019
केसांना निरोगी ठेवण्यासाठी वापरा सल्फेट-फ्री शँपू

केस सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी आपण नेहमी उत्तमरित्या त्यांची देखभाल करतो. आपण आपापल्या केसांच्या गरजेनुसार शँपूची निवड करतो. जसं काहीजण केसांच्या पोषणासाठी तर काहीजण कलर्ड केसांसाठी तर काहीजण डँड्रफसाठी म्हणून शँपूचा वापर करतात. बरेचदा आपण शँपूसोबतच कंडिशनर आणि हेअर मास्कचाही वापर करतो. केसांची काळजी ही कधीही न संपणारी आणि नियमितपणे बदलणारी प्रक्रिया आहे. पण तुम्ही केसांसाठी हेअर प्रोडक्ट घेताना एक गोष्ट पाहून घेता का? ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शँपू सल्फेट फ्री आहेत का? हो…जर तुमचे केस निरोगी आणि सुंदर हवे असतील तर तुमचे हेअर प्रोडक्ट हे सल्फेट-फ्री असले पाहिजेत. सल्फेट फ्री शँपूचे फायदे जाणून घेण्याआधी पाहूया सल्फेट म्हणजे नेमकं काय?

सल्फेट म्हणजे काय?

सल्फेटचे अनेक प्रकार असतात. एसएलएस म्हणजे सोडियम लोरल सल्फेट, एसएलइसी म्हणजे सोडियम लॉरथ सल्फेट, एएलएस म्हणजे अमोनियम लॉरथ सल्फेट हे सर्व कमी खर्चातले सर्फेकेंट्स म्हणजे सफाई करणारे घटक आहेत. ज्याने फेस चांगला होतो. त्यामुळे अनेक कंपन्या याचा वापर शँम्पू किंवा कंडिशनरमध्ये करतात. या सल्फेट्समधील मीठ आणि केमिकल्समुळे तुमचे केस कोरडे होतात. तसंच यामुळे स्कॅल्पलाही नुकसान पोचतं. सल्फेट्स तुमच्या केसांच्या टेक्श्चरसाठीही नुकसानदायक आहे. एका सर्व्हेनुसार, सल्फेटयुक्त पदार्थ शरीरामध्ये त्वचेला मॉईश्चराईज करणाऱ्या नैसर्गिक चरबीलाही पूर्णतः नष्ट करते.

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

केसांना सल्फेटमुळे होणारे नुकसान

वरील समस्या तुम्हाला नक्कीच जाणवणार नाहीत जर तुम्ही शँपू खरेदी करताना तो सल्फेट फ्री आहे की नाही हे पाहून घेतल्यास.

सल्फेट-फ्री शँपूसाठी पर्याय निवडताना…

सल्फेट-फ्री हेअर प्रोडक्ट्सच्या शोधात असताना POPxoMarathi ने नुकतंच रिव्ह्यू केले #theskinstory चे हेअर प्रोडक्ट्स.

द स्कीन स्टोरीचा हा शँपू आणि कंडीशनर आम्ही वापरून पाहिला. जे आहेत सल्फेट फ्री आणि कॅराटीनयुक्त. हे हेअर प्रोडक्ट्स तुमच्या केसांना हळूवार स्वच्छ करून केसांचं पोषण करून नैसर्गिकरित्या कॅराटीन देतात. यामुळे तुमचे क्युटिकल्स बंद होऊन केस बळकट होतात. 

हा शँपू तुमच्या केसांना आणि स्कॅल्पला मॉईश्चराईज करून फ्रिझीनेस घालवतो. यामध्ये आहेत आर्गन ऑईल, व्हिटॅमीन ई आणि मॅकडेमीया ऑईल जे केसांना देतात चमकदारपणा. हा शँंपू कोणत्याही प्रकारच्या केसांना चालतो. केस ओले करून हा शँपू हातावर घेऊन केसांना हळूवार मसाज करा आणि मग धुवून टाका.

हा शँपू तुम्हीही खरेदी करू शकता. या शँपूची किंमत आहे फक्त 299 रूपये. 

कॅराटीन रिपेअर कंडीशनर तुमच्या केसांना कंडीशन करतं. यामध्ये आहे आर्गन ऑईल, ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमीन ई जे तुमच्या स्कॅल्पला करतं हायड्रेट. वरील शँपूने केस धुतल्यावर तुम्ही हे कंडीशनर लावा. कंडीशनर लावताना ते केसांच्या मुळांना नाही तर केसांच्या टोकाला लावा. मसाज करा आणि 1-3 मिनिटाने केस धुवून टाका.

हे कंडीशनरही तुम्ही खरेदी करू शकता. ज्याची किंमत आहे फक्त 175 रूपये.

मग लक्षात ठेवा की, केसांसाठी चांगल्या शँपूचाच वापर करा. जो केसांना देईल उत्तम पोषण आणि सुंदरता. कोणताही शँपू वापरण्याआधी त्याची संपूर्ण माहिती नक्की घ्या. सल्फेट फ्री आहे की नाही ते पाहा आणि मगच वापर करा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

Read More From Care