केस

Hair Mehndi Tips In Marathi | केसांना मेहंदी लावण्याच्या सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Dec 21, 2021
hair-mehndi-tips

केसांच्या अनेक समस्या असतात. केस पांढरे झाल्यानंतर कोणताही केमिकलयुक्त रंग लावण्यासाठी अनेक जण घाबरतात. पण केसांसाठी मेंदी अर्थात हिना (Henna) लावणे अनेकांना योग्य वाटते. हिना (Heena) केसांना काळे, चमकदार आणि मजबूत बनविण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना केसांना डाय करायचा आहे त्या व्यक्तीही केसांना मेंदी लावण्याचा प्रयत्न करू शकतात. केसांना मेहंदी लावण्याचे फायदे (Kesana Mehandi Lavne) आहेत. मात्र केसांना मेहंदी कशी लावावी (Kesana Mehandi Kashi Lavavi), केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी, केसांना मेंदी लावण्याच्या टीप्स (Hair Mehndi Tips In Marathi) आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला देत आहोत. केसांना मेहंदी लावणे सोपे आहे. केसांना रंग देण्यासह कोंडा आणि हेअरफॉलच्या अर्थात केसगळतीच्या त्रासापासूनही मेंदी वाचवते. वास्तविक मेंदी ही केसांसाठी टॉनिकप्रमाणे काम करते. 

मेंदी म्हणजे काय?  (What Is Henna In Marathi), मेहंदीचा योग्य वापर कसा करावा याबाबत फारच कमी जणांना योग्य माहिती असते. मेहंदीमध्ये काय मिसळायला हवे, मेंदी कशी भिजवावी, केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी (Kesana Mehandi Kashi Lavavi), हिना लावल्यानंतर केसांना तेल लावावे की नाही अथवा हिना कोणत्या भांड्यात किती वेळ भिजवून ठेवावी असे अनेक प्रश्न असतात. या सर्वांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळतील. काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. 

Hair Mehndi Tips In Marathi | केसांना मेंदी लावण्यासाठी खास टिप्स

केसांना मेंदी लावण्यासाठी नक्की काय टिप्स तुम्ही फॉलो करायला हव्यात याबाबत इत्यंतभूत माहिती. आम्ही सांगितलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही केसांना मेहंदी लावा आणि पाहा काय फरक पडतो. 

शँपू (Shampoo)

केसांना मेहंदी लावण्याचे फायदे

केसांना हिना लावण्यापूर्वी अर्थात केसांवर मेंदी लावण्यापूर्वी तुम्ही केस व्यवस्थित शँपू करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच काही जण मेंदी लावल्यानंतर केस धुताना शँपूचा वापर करतात. जे अजिबात योग्य नाही. केसांना मेंदी लावल्यानंतर नाही तर केसांना मेंदी लावण्याच्या आधी केस धुताना शँपूचा वापर करा. मेंदी लावल्यानंतर केस धुताना शँपू वापरल्यास, केसांना मेंदीचा रंग चढत नाही. त्यामुळे ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वापरा. 

तेल लावू नये

ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहंदी लावणार असाल त्यादिवशी तुम्ही केसांना अजिबात तेल लावू नये. ही अत्यंत महत्त्वाची टिप आहे. केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही मेंदी लावल्यास, केसांवर अजिबातच मेंदीचा रंग चढणार नाही. त्याशिवाय तेलाच्या चिकटपणामुळे मेंदी केसांना लागणारही नाही. त्यामुळे मेहंदी लावताना या गोष्टीची नक्की काळजी घ्या. तसंच मेंदीमध्ये तेल मिक्स करून चालते. मात्र त्यापूर्वी केसांना तेल लावणे मात्र नक्की टाळा.

मेंदी भिजविण्यासाठी करा लोखंड्याच्या भांड्याचा उपयोग

hair mehndi tips in marathi

केसांना मेहंदी लावायची म्हटल्यानंतर काही जणी कोणत्याही भांड्यात मेहंदी भिजवतात. ही मेहंदी साधारणतः रात्रभर भिजत घालायची असते. मग अशावेळी कोणत्याही भांड्यात ती भिजवून चालत नाही. तर त्यासाठी तुम्ही लोखंडाच्या भांड्याचाच वापर करावा. कधीही मेंदी स्टील, सेरेमिक अथवा प्लास्टिकच्या भांड्यात अजिबात भिजवू नका. मेंदीमध्ये लोखंड उतरते आणि याचा रंग अधिक गडद केसांमध्ये बसतो. तसंच केसांना त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे मेंदी भिजवताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. केसांना तुम्हाला हवा तसा रंग द्यायचा असेल तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. 

मेंदी किमान 6-7 भिजवा

kesana mehandi kashi lavavi

मेंदी भिजवली आणि त्वरीत केसाला लावली असं अजिबात होत नाही. मेंदी भिजण्यासाठी किमान 6-7 तासांचा कालावधी द्या. केसांना मेंदी लावण्याच्या आधी तुम्ही रात्रभर अथवा किमान दिवसभर मेंदी भिजवून ठेवा. असं न केल्यास, केसांवर चांगला रंग चढत नाही. केसांना अधिक चांगला रंग देण्यासाठी तुम्ही त्यात हर्बल हिनाचादेखील वापर करू शकता. हर्बल हिनाचे केसांना फायदेदेखील होतात. 

केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी

केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी

बरेच वेळा केसांना मेहंदी एकच तास ठेऊन काही जण केस धुतात. पण असे अजिबात करू नका. ज्या दिवशी मेंदी लावायची असेल तेव्हा रिकामा वेळ असेल असाच दिवस निवडा. आपले केस अधिक मुलायम आणि चमकदार करण्यासाठी तसेच पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही मेंदी किमान 3-4 तास तरी केसांवर ठेवायला हवी. तसंच तुम्हाला केसांवर हलकासा रंग हवा असेल तर तुम्ही 1 तासात मेंदी काढली तरी हरकत नाही. पण मेंदीचा व्यवस्थित रंग चढायला हवा असेल तर तुम्हाला ही टीप लक्षात ठेवणे नक्कीच गरजेचे आहे. 

आवळा आणि रिठा करा मिक्स

काही जण केसांना मेंदी लावताना त्यामध्ये दही, आवळा, रिठा, लिंबू, कॉफी अथवा अन्य अनेक पदार्थांचे मिक्सिंग करतात. यामुळे केसांना अधिक गडद रंग येतो असं त्यांना वाटत असतं. मात्र आपल्या केसांना टोन कसा आणि आपल्या केसांच्या नक्की कोणत्या समस्या आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे केसांमध्ये आवळा, रिठा अथवा अन्य पदार्थांचे मिक्सिंग आपण करावे. उगीच कोणतेही पदार्थ मिक्स करून त्याचा वापर केसांवर करू नये. तुमचे केस पांढरे असतील तर नक्की मेंदीमध्ये आवळा पावडर, चहा पावडर अथवा कॉफी पावडरचा उपयोग करावा. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर हिना पावडरमध्ये दही अथवा लिंबाचा उपयोग नक्की करा. तसंच कोरड्या केसांची समस्या असल्यास, हिना पावडरमध्ये अंडे मिक्स करा आणि मग केसांवर लावा. 

मेंदी लावण्यापूर्वी केसांवर ब्रश फिरवा

hair mehndi tips in marathi

केसांना मेंदी कशी लावावी (Kesana Mehandi Kashi Lavavi) असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण केसांना मेंदी लावण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे केसांमध्ये गुंता होऊ न देणं. केसांना मेंदी लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या नेहमीच्या कंगव्याने केस व्यवस्थित विंचरून घ्या. जेणेकरून केसांमध्ये गुंता होणार नाही आणि मेंदीदेखील केसांना व्यवस्थित लावता येईल. 

अंड्याचा करा वापर

hair mehndi tips in marathi

केसांसाठी अंडे हे उपयुक्त ठरते. मुलायम आणि चमकदार केसांसाठी नेहमीच अंड्याच्या बलकाचा उपयोग केला जातो. हिना पावडरमध्ये तुम्ही अंडे फेटून मिक्स करा आणि हे केसांना लावा. यामुळे केस अधिक चमकदार आणि मऊ मुलायम होण्यास मदत मिळते. केस कोरडे असल्यास, याचा नक्की उपयोग करा. मेंदीमध्ये याचा उपयोग केल्यास, तुमच्या केसांना एक वेगळीच चमक आलेली दिसून येते. 

केसांना मेंदी कशी लावायची 

केसांना मेंदी लावणे (Kesana Mehandi Lavne) म्हणजे नेमके काय आहे अथवा कशा प्रकारे लावायची हेदेखील महत्त्वाचे आहे. केसांना मेंदी लावताना ही टीप लक्षात घ्यायला हवी. तुम्ही रात्री कधीही मेंदी लावू नये. रात्रभर मेंदी केसांना लाऊन अजिबातच झोपू नये. एकतर मेंदी शरीरासाठी अत्यंत थंड असते. डोक्यावर रात्रभर मेंदी राहिल्यास, दुसऱ्या दिवशी सर्दी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय रात्रभर झोपेत आपल्याला काहीही कळत नाही आणि त्यामुळे अगदी चेहऱ्यावरही मेंदी येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही चूक करणे टाळा. 

मेहंदी लावल्यावर तेल लावा

मेहंदी धुतल्यानंतर जेव्हा केस सुकतील तेव्हा सर्वात पहिले केसांना तुम्ही हेअर ऑईल लावा. रात्रभर केसांना तेल तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माईल्ड शँपूचा वापर करून केस धुवा. केसांना नेहमी हेव्ही ऑईलिंग करा. ज्यामुळे शँपू लावल्यानंतर तेल निघेल आणि केसांवर मेंदीचा रंग व्यवस्थित टिकून राहील. 

Benefits Of Mehndi For Hair In Marathi | केसांना मेहंदी लावण्याचे फायदे

केसांना मेहंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. बाजारातील रसायन मिश्रित हेअरडाय वापरण्यापेक्षा हर्बल मेहंदी अथवा हीना पावडर हा उत्तम पर्याय आहेत. केसांना मेहंदी लावण्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या. 

Mehndi Hair Packs in Marathi | केसांसाठी मेंदी हेअर पॅक

केसांसाठी मेंदी हेअर पॅक तुम्ही घरच्या घरी तयार करून त्याचा वापर करून घेऊ शकता. असेच काही हेअर पॅक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला केस अधिक चमकदार आणि मुलायम करायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे हेअर पॅक वापरायला हवेत.

मेंदी आणि मुलतानी माती

mehndi hair packs in marathi

मुलतानी मातीचा उपयोग चेहऱ्यासाठी उत्तम होतो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र मेहंदीमध्ये मिक्स करून तुम्ही केसांवरही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

मेंदी आणि शिकेकाई 

आवळा आणि रिठ्याप्रमाणे शिकेकाईचादेखील केसांसाठी चांगला परिणाम होतो. मेंदीसह तुम्ही शिकेकाईचा कसा वापर करू शकता पाहा. 

मेंदी आणि कॉफी पावडर 

मेंदीमध्ये कॉफी पावडर मिक्स करावी हे अनेक जणांना माहीत आहे. केसांना हायलाईट करण्यासाठी तुम्ही सलॉनमध्ये जाणार असाल तर त्यापेक्षा घरीच तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. हा हेअरपॅक अधिक सोपा आणि चांगला आहे. 

Top Mehendi Brands in Marathi | मेंदीचे उत्तम ब्रँड्स

आता अर्थातच बाजारातील कोणतीही मेहंदी तुम्ही तुमच्या केसांसाठी तर नक्कीच वापरणार नाही. त्यासाठी तुम्हाला कोणती मेंदी योग्य आहे हेदेखील माहीत करून घेणे आवश्यक आहे. मेंदीचे उत्तम ब्रँड्स कोणते आहेत आणि तुम्ही कोणत्या ब्रँड्सची मेंदी वापरू शकता हे घ्या जाणून. 

गोदरेज नुपूर हिना (Godrej Nupur Henna)

भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध ब्रँड असून यामध्ये सर्व नैसर्गिक घटक वापरण्यात आल्याचा दावा कंपनी करते. ब्राम्ही, शिकेकाई, कोरफड, मेथी, आवळा, जास्वंद इत्यादीचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. केसांना अधिक चांगला रंग देण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. तसंच हे केसांना चांगले पोषणदेखील देते. 

व्हीएलसीसी आयुर्वेदिक हिना (VLCC Ayurvedic Henna)

मेंदीच्या पानांसह या मेहंदीमध्ये मूळ, भारतीय गुजबेरी, शिकेकाई आणि अन्य नैसर्गिक प्रोटीन्स आणि विटामिन सी आणि ई चा देखील वापर करण्यात आला आहे. यामुळे केसांना चांगले कंडिशनिंग मिळते आणि याची किंमतही खिशाला परवडणारी आहे. 

पतंजलि हर्बल मेहंदी (Patanjali Herbal Mehndi)

बाबा रामदेवची देशी उत्पादने अनेक जण वापरतात. यामध्ये पतंजलिची हर्बल मेंदीदेखील तितकीच चांगली आहे. केसांसाठी योग्य असणाऱ्या या मेंदीमध्ये सर्व नैसर्गिक आणि केसांना उपयुक्त अशा उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे केसांना चांगले कंडिशनिंग तर मिळतेच, त्याशिवाय केसांना चांगला रंग येण्यासही मदत मिळते.  

आयुर हर्बल मेहंदी (Ayur Herbal Mehndi)

केसांना अधिक चांगला रंग आणि मऊ, मुलायमपणा देण्यासाठी या मेहंदीचा वापर करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा ब्रँड भारतात असून याचा अधिक वापर राजस्थानमध्ये करण्यात येतो. राजस्थानची ही मेंदी अधिक प्रसिद्ध आहे. केसांना पोषण देण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. मेंदीमध्ये नारळाचा रस मिक्स करून लावता येतो का?
हो केसांना मेंदी लावण्यासाठी तुम्ही त्यात नारळाचा रसही मिक्स करू शकता. ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांना याचा जास्त उपयोग होतो. तुमचे केस फ्रिजी असतील आणि त्यांना योग्य कंडिशनिंग देऊन मुलायम करायचे असेल तर तुम्ही एक कप नारळाचा रस काढा आणि तो कोमट करा. त्यामध्ये 10 लहान चमचे मेंदी पावडर आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट स्काल्प आणि केसांना अगदी व्यवस्थित लावा. साधारण एक तास झाल्यावर थंड पाण्याने केमिकलफ्री शँपूने केस धुऊन घ्या. तुम्हाला याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो. 

2. मेंदी लावल्यावर केस कोरडे होतात का?
काही जणांना मेंदी लावल्यानंतर केस कोरडे होण्याचा त्रास होतो. तसंच यामुळे केसगळतीचा त्रासही होतो. यासाठी तुम्ही मेंदीमध्ये अंडे, आवळा, कॉफी पावडर अशा काही गोष्टींचा समावेश करून घ्या. यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या केसांसाठी योग्य नसेल तर ती तुम्ही वापरू नका. 

3. तयार मेंदीपेक्षा पानांचा उपयोग ठरतो का अधिक फायदेशीर?
नैसर्गिक मेंदी ही उत्तम कंडिशनर असते. पण याच्या वापरामुळे केसांना सुंदर चमक मिळते. केसांची वाढ होण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच मेंदीची पाने तुम्हाला अधिक चांगला रंग मिळवून देतात.

Read More From केस