Care

हेअर ऑइल की हेअर सिरम, काय वापरणे आहे अधिक फायदेशीर

Vaidehi Raje  |  May 26, 2022
hair oil vs hair serum

पूर्वी केसांच्या आरोग्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावण्याची शिफारस केली जात असे. तर आता हेअर सिरम आल्यापासून अनेक लोक हेअर ऑइल सोडून हेअर सिरमकडे वळू लागले आहेत.  हेअर सीरम आणि तेलातील फरक हा आहे की हेअर सीरम हे एक स्टाइलिंग उत्पादन आहे, ज्याचा वापर केसांना चमकदार आणि गुळगुळीत करण्यासाठी केला जाऊ शकतो, तर तेल मुख्यतः आपल्या केसांचे पोषण होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते. या दोन्ही उत्पादनांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही कारण दोघांमध्ये विशिष्ट गुण आहेत जे पूर्णपणे भिन्न असले तरी केसांसाठी चांगले आहेत. तुम्हाला यापैकी काय वापरावे याबद्दल खात्री नसल्यास, पुढे वाचा. तुम्ही दोन्हीपैकी काहीही निवडले तरी तुमचे केस नंतर तुमचे आभार मानतील याची खात्री बाळगा!

हेअर सीरम म्हणजे काय?

हेअर सीरम हे तेलासारखेच आहे का? नाही. हेअर सीरमचा वापर तुमच्या केसांवर उपचार करण्यासाठी केला जातो, जो केसांचा पोत मऊ करतो आणि त्यांना झटपट चमक देतो. दुसरीकडे, केसांचे तेल तुमच्या केसांना अंतर्गत पोषण आणि कंडिशनिंग म्हणून काम करते. हेअर सीरम हे सिलिकॉन-आधारित फॉर्म्युलेशन आहे जे तुमच्या केसांच्या पृष्ठभागावर कोट करते, कर्ल पॅटर्नमध्ये लॉक करते आणि क्युटिकल्स सील करते. अतिरिक्त ब्रशिंग, उष्णता (इलेक्ट्रिकल स्टाइलिंग टूल्समुळे निर्माण झालेली उष्णता), प्रदूषण आणि दीर्घकाळापर्यंत सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले सीरम हे मूलत: अतिरिक्त फायदे असलेले स्टाइलिंग उत्पादन आहे जे तुमच्या केसांसाठी ‘बोटॉक्स’ म्हणून काम करते. सीरममध्ये प्रकाश-प्रतिबिंबित करणारा गुणधर्म देखील असतो, ज्यामुळे केसांचे स्ट्रँड अधिक चमकदार, मऊ आणि निरोगी दिसतात.

Hair Oil Vs Hair Serum

हेअर सीरम कसे लावायचे

हेअर सीरम लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नुकतेच धुतलेले ओले किंवा ओलसर केसांच्या स्ट्रॅन्डना सिरम लावावे.   तुमच्या केसांसाठी सिरमचे फक्त काही थेंब आवश्यक आहेत.सिरम तुमच्या तळहातावर घ्या आणि केसांच्या स्ट्रॅन्डना वरपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. स्काल्पला सिरम लावू नये.  सीरममुळे कुरळेपणा नियंत्रित करणे सोपे होते. सीरम तुमच्या केसांना झटपट चमक देते. ओलावा, उष्णता, प्रदूषण, अतिनील किरण इत्यादी पर्यावरणीय घटकांपासून सीरम तुमच्या केसांसाठी संरक्षणात्मक थर म्हणून काम करू शकते. सीरम वापरल्याने तुमच्या केसांना झटपट मऊपणा येतो कारण ते तुमच्या केसांच्या क्यूटिकलमधील अंतर भरते.

.

आठवड्यातून एकदा तरी लावायला हवे तेल 

Hair Oil Vs Hair Serum

प्रत्येकानेच आठवड्यातून किमान एकदा तरी केसांना तेल लावावे. मग  केसांचा प्रकार काहीही असला तरी त्याचा फायदाच होईल.जेव्हा तेलांचा विचार केला जातो तेव्हा दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्यात त्या म्हणजे केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत तेल व्यवस्थित लावावे. अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले तेल तुमच्या follicles आणि केसांना भरपूर पोषण प्रदान करतात. जर तुमची वात पातळी वाढली असेल, तर तुमचे केस खूप कोरडे, निर्जीव आणि विखुरलेले असतील. यष्टिमधु, ब्राह्मी, कृष्ण टिळा, मेथिका इत्यादी वातदोष शांत करणाऱ्या औषधी वनस्पतींनी समृद्ध केलेले केसांचे तेल वरील प्रकारच्या केसांसाठी प्रभावीपणे काम करू शकतात. जर तुमच्या शरीरात पित्ताचे प्रमाण जास्त असेल तर तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमची टाळू फुगते, जळते, केस अकाली पांढरे होतात. अशा परिस्थितीत पित्तदोषाचा समतोल राखण्यासाठी निंबा, जपा, मुस्ता इत्यादी थंड औषधी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. गुंजा, देवदार, सारियाका यांसारख्या कफ कमी करणार्‍या औषधी वनस्पतींनी समृद्ध केसांचे तेल तुमच्या टाळूवरील सीबम पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे कफ संबंधित समस्या जसे की मायक्रोबियल स्कॅल्प इन्फेक्शन, तेलकट कोंडा, टाळूवरील मुरुम इत्यादींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

म्हणूनच केस धुण्यापूर्वी तेल लावावे आणि केस धुतल्यानंतर हेअर सीरम लावावे. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care