Handbags

हटके डिझाईन्सच्या ‘6सौ4व्हिक्टोरियाबझार’ टोट बॅग्ज

Aaditi Datar  |  Jan 22, 2019
हटके डिझाईन्सच्या ‘6सौ4व्हिक्टोरियाबझार’ टोट बॅग्ज

६सौ४ व्हिक्टोरिया बजार
बजारों में एक! हजारों में एक!!
गर्मी हो या थंडी, क्वर्की और ट्रेंडी!
उधार मांगने आना नही, बिना खरीदे जाना नही! 

अशा ओळी ‘6सौ4 व्हिक्टोरिया बजार’च्या इन्स्टा अकाउंटवर दिसतात.

तुम्ही पाहिल्या आहेत का या टोट बॅग्ज. आजकाल बाहेर जाताना मस्ट अॅक्सेसरीजपैकी एक म्हणजे टोट बॅग्ज. आता या टोट बॅग्ज पाहिल्यावर कोणालाही वाटेल की, याची डिझाईनर नक्कीच कोणीतरी स्त्री असेल. पण आश्चर्य म्हणजे या सुंदर आणि क्रिएटीव्ह टोट बॅग्जच्या पाठीमागे चक्क दोन पुरूष आहेत. विश्वास बसत नाही ना. पण हे खरं आहे. मीसुद्धा जेव्हा पहिल्यांदा या टोट बॅग्जच्या टीमशी संवाद साधला. तेव्हा मला वाटलं रिप्लाय करणारी समोरची व्यक्ती ही महिला असावी. पण जेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज आला तेव्हा पाहिलं तर पुरूष. मग आश्चर्याचा धक्काही बसला आणि कौतुकही वाटलं. तसंच मज्जाही वाटली. कारण हे खूपच इंटरेस्टींग होतं की, नारीशक्तीला सलाम करणाऱ्या सर्व टोट बॅग्ज डिझाईन करणारी व्यक्ती ही पुरूष आहे. मग जाणून घेतली या हटके टोट बॅग्जच्या निर्मितीची तेवढीच हटके स्टोरी. तुम्हीही नक्की वाचा.  

६सौ४ व्हिक्टोरिया बजारचे कर्ते ‘पुरूष’

फोटो सौजन्य : Ashay Tulawar

गीतकार अभिषेक खणकर आणि अभिनेता धवल पोकळे ही मराठी इंडस्ट्रीतील परिचित नावं आहेत. नेहमीच्या कामातून ब्रेक म्हणून काहीतरी हटके करण्याचं त्यांनी ठरवलं आणि निर्मिती झाली ‘६सौ४ व्हिक्टोरिया बझार’ची. आपल्या क्रिएटीव्ह टोट बॅग्ज्सबद्दल अभिषेक खणकरने POPxo मराठीशी दिलखुलास बातचीत केली. अभिषेकने सांगितलं की, ‘हे आम्ही कधीही ठरवून केलं नव्हतं. मी स्वतः एक लेखक आहे आणि धवल अभिनेता आहे. मी लेखक असलो तरी बरेच प्रोफाईल चेंज केले आहेत आणि मला एका ब्रेकची गरज होती. मग माझ्यापुढे प्रश्न होता की काय करायचं. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला वाढदिवसाच्या वेळी आम्ही काहीतरी हटके आणि क्रिएटीव्ह गिफ्ट्स द्यायचो. पण ते त्या व्यक्तीपर्यंत सीमीत राहायचं. ती व्यक्ती कौतुक करायची आणि इतरांनाही कौतुकाने सांगायची पण त्यापुढे काही होतं नव्हतं. त्यातूनच ही आयडिया आली की, काहीतरी वेगळं करावं. मग आम्ही ठरवलं की, बायकांसाठी एखादी वस्तू बनवावी. कारण शॉपिंग ही महिलांची मक्तेदारी आहे. कोणताही पुरुष असो स्वतःला एखादी गोष्ट घेताना तो पटकन घेऊन मोकळा होतो. पण गर्लफ्रेंड, बायको किंवा बहीण यांना गिफ्ट करताना तो बराच विचार करून मग वस्तू देत असतो. तसंही पुरुषांना गिफ्ट देण्यासारख्या फारच कमी गोष्टी आहेत. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पुरुषांचे कपडे. स्त्रियांना कपड्यांच्याबाबतीत कितीतरी ऑप्शन्स आहेत आणि त्यातूनच हा ब्रॅड आम्ही सुरू करायचं ठरवलं.’

टोट बॅग्ज्सचं का?

टोट बॅग्ज्सची निवड का, याबाबत सांगताना अभिषेक म्हणाला की, ‘महिलांसाठी काहीतरी करायचं होतं हे नक्की होतं. मग पहिली गोष्ट डोळ्यांसमोर आली ती म्हणजे टोट बॅग्ज्स. साधारण प्रत्येक वयोगटातील महिला या टोट बॅग्ज्स वापरतात. सो आम्ही ठरवलं की, टोट बॅग्ज करूया. पण आम्हाला वाटलं नव्हतं की, या प्रॉडक्टला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. तसंच या बॅग्ज्स ईकोफ्रेंडली म्हणजेच कापडाच्या आहेत.’

सुंदर मेसेजेस मागची आयडिया

अभिषेक स्वतः या सर्व कॅप्शन्स लिहीतो आणि डिझाईन् ही करतो. मुख्य म्हणजे टोट बॅग्ज्सवरील सर्व कॅप्शन्स या महिला किंवा नारीशक्तीला अधोरेखित करणाऱ्या आहेत. या विशेष मेसेजेसच्या मागेही एक स्टोरी आहे. ‘टोट बॅग्ज्सवरील मेसेज आणि डिझाईन्स मी करतो. सुरुवातीला मी दुर्गा डिझाईन बनवलं होतं कारण तेव्हा नवरात्रीचे दिवस होते. कोणत्याही शॉपमधली टोट बॅग्ज्सवरील मेसेजेस हे जेनरिक असायचे. पण काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. माझ्या कुटुंबातील महिला म्हणजे माझी आई, बायको, बहीण किंवा इतर स्त्रिया प्रत्येकीची पर्सनॅलिटी वेगळी आहे. मग त्याला अनुसरून काहीतरी करावं. त्यातच आजकाल स्त्री पुरूषांच्याही पुढे आहे. ‘वेड्या बहिणीची वेडी माया’ अशा बहिणी आजकाल नाहीत. त्यातूनच या डिझाईनची आयडिया आली.

साधं उदाहरण म्हणजे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बायकांचे हमखास ग्रुप असतात. अशा बऱ्याच ग्रुप्सना ट्रीब्यूट म्हणून डिझाईन करण्यात आली लेडीज फर्स्ट टोट.

आजही आपल्याकडे स्त्रीला लक्ष्मी मानलं जातं मग त्यातून आली या डिझाईनची आयडिया.

604 व्हिक्टोरिया नावामागचं गुपित

या हटके नावाची स्टोरी रंजक आहे. 604victoria  काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स नाव हवं म्हणून अभिषेक आणि धवलने चक्क फ्लॅट नं.ची निवड केली. याबद्दल सांगताना अभिषेक म्हणाला की, ‘आमच्या बॅग्ज तयार होत्या, पण आमच्या ब्रॅडचं नाव ठरलं नव्हतं. मग आम्ही ठरवलं की, माझ्या घराचा नं. 604 हा आहे. या ब्रँडची सुरूवात आणि या बॅग्जशी निगडीत अनेक गोष्टी याच घरातन झाल्या म्हणून आम्ही हा नंबर द्यायचं ठरवलं. बझार कारण या ब्रँडनेमखाली तुम्हाला अनेक गोष्टी घेता येणार आहेत आणि व्हिक्टोरिया कारण हा आहे मुंबई बेस्ड बाजार. योगायोगाने हे हटके नावंही लोकांना वडलं.

महिला वर्गाच्या आवडत्या टोट्स

या टोट्सना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच लोकांना बल्कमध्ये हव्या असल्यास कस्टमाईज्ड प्रोडक्ट्स देण्याचाही या टीमचा विचार आहे. अजूनही वेगळ्या डिझाईन्सबाबत सतत विचारणा होत असते. आश्चर्य म्हणजे अनेक पुरुषांचेही मेसेज येतात की, आमच्यासाठी काही बनवणार का? त्यामुळे आता अभिषेक आणि धवल त्याबद्दलही विचार करत आहेत की,पुढची प्रोडक्ट्स नक्की कोणती आणावीत. तसंच त्यांना हाही आनंद आहे की, मीडिया पर्सन असल्यामुळे लोकांना त्यांचा मेसेज सहज मिळत आहे. एवढंच नाहीतर काही इतर ब्रँड्स आता या टोट बॅग्जप्रमाणे मेसेजेस कॉपी करताना आढळत आहेत. त्यामुळे अभिषेक धवलला आनंद आहे की. ते योग्य मार्गावर आहेत.

भारताबाहेरही पोचलीये ६सौ४ व्हिक्टोरिया बजार

भारताबाहेरूनही या टोट्सला चांगला प्रतिसाद आहे. देवनागरी डिझाईन्स असल्यामुळे भारताबाहेरील मराठी लोकांच्या ऑर्डर येत आहेत.

६सौ४ व्हिक्टोरिया बजारची हटके टोट डिझाईन्स

या टोट बॅग्जची डिझाईन्स अगदी हटके आहेत. जी बघता क्षणी तुम्हाला घ्यावीशी वाटेल. या बॅग्ज अतिशय माफक किमतीत उपलब्ध असून त्या ईको फ्रेंडलीही आहेत.

पण एवढ्यावरच न थांबता या टीमने आता संक्रांतीनंतर ज्वेलरी, ड्रेसेस, कुशन कव्हर्स आणि होम डेकोरच्या वस्तू ही त्यांच्या बजारमध्ये आणायचं ठरवलंय. या वस्तूही बहुतेक महिलावर्गासाठीच डिझाईन करण्याचा त्यांचा मानस आहे.

मग कशा वाटल्या या हटके टोट बॅग्ज तुम्हाला काही अशाच हटके फॅशन अॅक्सेसरीज दिसल्या तर आम्हाला नक्कीच कळवा. 

हेही वाचा –

विंटर जॅकेट्सची मुंबईत चलती…सध्याचा नवा ट्रेंड

खास तुमच्यासाठी टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे ’61’ सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस

Read More From Handbags