चिकू हे असे फळ आहे जे हिवाळ्यात व उन्हाळ्यात देखील मिळते.उन्हातून घरी आल्यावर एक गोड चिकू खाल्ला की थोडी तरतरी येते कारण यात नैसर्गिक साखर असते. चिकू किंवा Sapota हे Sapotaceae फॅमिली मधील एक स्वादिष्ट उष्णकटिबंधीय फळ आहे आणि “सपोडिला” म्हणून देखील ओळखले जाते. खरं तर चिकू आपल्याकडे आला तो स्पेन मधून! स्पॅनिश लोक नसते तर चिकू कदाचित भारतात कधीच आला नसता. मेक्सिको, इस्टर ग्वाटेमाला आणि बेलीझमुळे, वसाहतवाद्यांनी ते फिलीपिन्समध्ये नेले, तेथून ते उर्वरित आशियामध्ये गेले आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच चिकू भारतात आले. आता कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या अनेक राज्यांमध्ये चिकूची लागवड केली जाते.
चिकूमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात जे शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण त्यात कॅलरीज जास्त असतात आणि त्यामुळे ते आंबा, संत्री आणि फणस यांसारख्या फळांच्या श्रेणीत येते. म्हणूनच जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही एखादे खास डाएट करत असाल तर तुमच्या डॉक्टरांना किंवा डायटिशियनना विचारून मग आहारात चिकूचा समावेश करू शकता. चिकूचे पुढील आरोग्यदायी फायदे वाचल्यावर नक्कीच तुम्ही नियमितपणे आहारात चिकूचा समावेश कराल.
व्हिटॅमिन ए, सी व डी ने समृद्ध
चिकू व्हिटॅमिन ए,सी व डीचा एक समृद्ध स्रोत आहे. दररोज एक चिकू खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.आपल्या डोळ्यांची नजर चांगली राहण्यास मदत होते. चिकूमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आपले डोळे निरोगी ठेवते आणि व्हिटॅमिन सी आपली प्रतिकारशक्ती बळकट ठेवते, तसेच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आपल्या पेशींमधील फ्री रॅडिकल्स नष्ट करते. चिकूचे सेवन कॅन्सर व हृदयरोगासारख्या घातक आजारांपासून दूर राहण्यास मदत करते.
ऊर्जेचा उत्तम स्रोत
चिकूमधील नैसर्गिक फ्रूक्टोज आणि सुक्रोज घटक तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देऊ शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला इतर काही खाण्यासाठी वेळ नसतो किंवा काही कष्टाचे काम करायचे असते तेव्हा ऊर्जा वाढवण्यासाठी घर सोडण्यापूर्वी एक चिकू नक्की खा.
अँटी-इंफ्लेमेटरी
चिकूमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते, जे नैसर्गिक दाह-विरोधी म्हणून काम करते.
पचनास मदत करते
चिकू आपली पचनसंस्था नियंत्रणात व निरोगी ठेवते. नियमितपणे चिकू खाल्ल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास कमी होण्यास मदत होते. चिकूमध्ये फायबरचे प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे चिकू रेचक आहे. चिकू खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.पोट साफ होण्यासाठी चिकू खाणे हा एक चांगला व सोपा उपाय आहे.
अँटिऑक्सिडंट्सचा स्त्रोत
चिकू डाएटरी फायबर, जीवनसत्त्वे ए, बी, सी व डी यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, अँटी-ऑक्सिडंट्सचा देखील उत्तम स्रोत आहे. चिकू खाल्ल्यास तोंडाच्या कर्करोगासारख्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून शरीराचे रक्षण होण्यास मदत होते.
हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम
चिकू कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाने समृद्ध आहे आणि त्यामुळे आपली हाडे मजबूत राहण्यास मदत होते. लोह, फोलेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, फॉस्फरस, सेलेनियम इत्यादीसारख्या खनिजांचा चिकू हा एक चांगला स्रोत आहे. ही पोषक तत्वे हाडांच्या योग्य वाढीसह शरीराची विविध कार्ये सुलभरित्या चालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत
चिकूमध्ये असलेली दोन खनिजे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आपला रक्तदाब सामान्य व नियंत्रणात ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.. पोटॅशियम तुमच्या शरीरातून सोडियम काढून टाकण्यास मदत करते, तुमच्याकडे जितके जास्त पोटॅशियम असेल तितके जास्त सोडियम तुमचे शरीर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास सक्षम असेल. सोडियमचा उच्च रक्तदाबाशी खूप जवळचा संबंध आहे. खरं तर, हायपरटेन्शनच्या उपचारांमध्ये अनेकदा मीठाचे सेवन कमी करावे लागते कारण त्यात सोडियम असते. चिकूमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
चिकूचे इतके सगळे फायदे वाचल्यावर आहारात चिकूचा समावेश नक्कीच करायला हवा.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक