जेवणानंतर बडीशेप चघळायला अनेकांना आवडते. बडीशेप मुखवास म्हणून खाल्ले जाते. जर तुम्हाला बडीशेप खाण्याची सवय असेल तर तुम्ही बडीशेपनंतर धणाडाळसुद्धा खा. कारण धनाडाळ खाण्याचे भरपूर फायदे आहेत. जर तुम्ही धणाडाळ खाल्ली तर तुम्हाला अन्न पचायला तर मदत होईलच. पण तुम्हाला त्याचे अन्यही फायदे होतील. म्हणूनच आज जाणून घेऊया धणाडाळचे फायदे
स्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा
अशी तयार केले जाते धणाडाळ
shutterstock
धणाडाळ तयार करण्याची प्रक्रिया फार मोठी आहे. ती तुम्हाला घरच्या घरी करणे शक्य नाही. त्यामुळेच तुम्हाला ती विकत घ्यावी लागते. धण्याचे दाणे मशीनमध्ये प्रोसेस करुन त्याचे दोन भाग केले जाते. त्यामधील बिया काढून धणाडाळ रोस्ट केली जाते. ही डाळ रोस्ट करताना त्यामध्ये मीठ घातले जाते. म्हणूनच धणाडाळ इतकी खमंग आणि छान लागते. त
धणाडाळीचे फायदे
shutterstock
आता आपण जाणून घेणार आहोत धणाडाळीचे फायदे
- पचनशक्ती सुधारते
बडीशेप किंवा मुखवासाचे कामच असते पचनशक्ती सुधारणे. जेवणानंतर किंवा काहीही खाल्यानंतर तुम्हाला सतत ढेकर येत असतील किंवा पदार्थ गळ्याकडे आल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही धणाडाळ खायला हवी. धनाडाळ दाताखाली चावल्यानंतर त्याचा रस पोटात जातो त्यावेळी तुमचे अन्न पचायला तुम्हाला मदत मिळते. डायरियाच्या समस्येमध्येही धणाडाळ फायद्याची आहे. - झोप चांगली लागते
जर तुम्हाला झोप चांगली नसेल तर तुम्ही धणाडाळ खायला हवी. धणाडाळीमधील तेल तुमचे मन शांत करते. तुमच्या नसा शांत करते. त्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागते. त्यामुळे जेवल्यानंतर अगदी थोडीशी धणाडाळ खायला विसरु नका. तुम्हाला झोप चांगली लागेल. - दुर्गंधी कमी होते
बडीशेपचे आणखी एक काम असते ते म्हणजे मुखशुद्धीचे. तुमच्या तोंडाला येणारा खाद्यपदार्थांचा वास घालवण्यासाठी तुम्ही धणाडाळ खा. धण्याचा सुगंध खूप छान येतो. त्याहून अधिक चांगला सुंगध धणाडाळीचा येतो. त्यामुळे दुर्गंधी जाण्यासाठी तुम्ही धणाडाळीचे सेवन करायला विसरु नका. - रोग प्रतिकार शक्ती वाढते
फायटोन्युट्रीएंट्स आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. यातील अँटीबॅक्टेरिअल गूणधर्म तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही धणाडाळ खाऊ शकता. अगदी चिमूटभर धणाडाळ खाल्ली तरी चालू शकेल.
प्रत्येकाला माहीत हवे बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे (Saunf Benefits In Marathi)
यांनी खाऊ नये धणाडाळ
धणाडाळ फारच कोरडी असते. ती एकदा खाल्ली की, खाण्याची चटक लागत राहते. पण धणाडाळ सतत खाऊन चालणार नाही. कारण ती जास्त खाल्ली तर तुमचे तोंड कोरडे पडू शकते. शिवाय तुम्हाला ठसका लागू शकतो. धणाडाळीच्या अतिसेवनामुळे तुमच्या तोंडाला अल्सर येण्याची शक्यता असते. जर धणाडाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असेल तर धणाडाळ मोजून मापून खा. किंवा ती बडीशेपेसोबत खा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.