आरोग्य

तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

Trupti Paradkar  |  Jul 3, 2019
तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

चहा हे पेय सर्वांनाच आवडतं. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम मसालेदार चहा पिण्याची बातच न्यारी आहे. भारतातच नाही तर जगभरात चहा आवडीने प्यायला जातो. चहा दिवसभरात कधीही घेता येत असला तरी सामान्यपणे दिवसाची सुरूवात चहाने केली जाते. चहाचा सुंगध, रंग, कडकपणा यासोबत चहामध्ये काही असेही घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. शिवाय चहा हे सर्वसामान्यांना परवडणारे एक पेय आहे. त्यामुळे भारतात घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत पाणी आणि चहा  देऊन करण्याची पद्धत आहे. 

चहा पिण्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. चहात दूध आणि साखर अतीप्रमाणात वापरल्यास अॅसिडिटी अथवा मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. चहा अतीप्रमाणात घेणं योग्य नसलं तरी जर तुम्हाला आजारापणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही मसाला चहा नक्कीच ट्राय करू शकता. मात्र लक्षात ठेवा दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन कपच चहा घ्या. त्यापेक्षा अधिक चहा घ्यायचा असेल तर चहामध्ये दूध आणि साखर वापरू नका.

यासाठी मसाला चहा करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जरूर जाणून घ्या.

shutterstock

कसा कराल मसालेदार चहा

मसाला चहा तयार करण्यासाठी आधी गॅसवर एक कप पाणी उकळून घ्या. त्यात थोडंसं आलं किसून टाका. मग अर्धा चमचा चहापावडर टाका. चहा उकळल्यावर शेवटी चहाचा मसाला टाका. चहाला मसालेदार करण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तुळशीची पाने, गवती चहा वापरू शकता. चहामध्ये साखर आणि दूधाचा वापर कमी करा. ज्यामुळे चहाचे चांगले फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात.

ब्लॅक टीच्या पौष्टिक मूल्याबद्दल देखील वाचा

shutterstock

मसाला चहातील घटकांचे आरोग्यदायी फायदे

अधिक वाचा

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

‘दालचिनी’चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते (Cinnamon Benefits In Marathi)

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

Read More From आरोग्य