Recipes

जाणून घ्या वीगन टीचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

Trupti Paradkar  |  Nov 23, 2021
Health Benefits Of Vegan Tea and Recipe in Marathi

वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी नेहमीच वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो केले जातात.  वजन नियंत्रित ठेवण्यासासाठी वीगन डाएट सध्या लोकप्रिय होत आहे. वीगन डाएट बद्दल यापूर्वीच तुम्ही नक्कीच ऐकलं असेल पण सध्या जोरदार चर्चा आहे ती वीगन टीची म्हणजे वीगन चहाची…वास्तविक वीगन म्हणजे प्राण्यांपासून निर्माण झालेले कोणतेही पदार्थ न वापरणे…पण चहा म्हटला की सर्वात आधी लागतं ते गाईचं अथवा म्हशीचं दूध. पण वीगन टीची खासियत ही की यासाठी तुम्हाला गाईम्हशीच्या दुधाची नाही तर प्लांट बेस्ड मिल्कची गरज असते. सोया मिल्क अथवा बदामाच्या दुधाने तुम्ही हा चहा बनवू शकता. यासाठीच जाणून घ्या वीगन टीचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

वीगन टी पिण्याचे फायदे

Health Benefits Of Vegan Tea and Recipe in Marathi

चहाप्रेमींसाठी चहा म्हणजे अमृतच… म्हणूनच चहाला अमृततुल्य हे नाव पडलं असावं. काहींचा तर दिवसच हे अमृतपेय घेतल्याशिवाय सुरू होत नाही. पण दुधाचा चहा घेण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. अती प्रमाणात चहा घेतल्यामुळे अॅसिडिटी, वजन वाढू लागते. यासाठीच वीगन टी सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे कारण वीगन टी पिण्याचे दुष्परिणाम तर नाहीतच पण फायदेच जास्त होतात.

कसा कराल वीगन टी 

वीगन टी बवण्यासाठी आधी तुम्हाला हा चहा कसा बनवायचा हे माहीत असायला हवं. 

वीगन टीसाठी लागणारे साहित्य

तुम्हाला माहीत आहेत का हे विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

कसा बनवाल चहा –

वीगन टी बनवण्यासाठी आधी गॅसवर टी पॉटमध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यामध्ये चहापावडर, साखर अथवा गूळ टाका. पाणी उकळू लागलं की त्यात आलं किसून आणि चहा मसाला टाका. पुदिन्याची पानं टाका आणि चहा चांगला उकळून घ्या. चहात बदामाचे दूध अथवा सोया मिल्क टाका आणि गॅस मंद करून एकदा चांगलं ढवळून घ्या. एक ते दोन मिनीटांमध्ये गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. 

वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट

Read More From Recipes