आरोग्य

मासिक पाळीच्या काळात आनंदी राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Dec 18, 2019
मासिक पाळीच्या काळात आनंदी राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

मासिक पाळी येणं हा प्रत्येकीच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे जरी या काळात तुम्हाला त्रास झाला अथवा थकवा आला तरी निरोगी जीवनासाठी मासिक पाळी वेळेवर येणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही जाणताच.  मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला हा त्रास असह्य आहे असं वाटत असतं. मात्र मासिक पाळीचं वेळेवर येणं, योग्य प्रमाणात रक्तस्त्राव होणं ही लक्षणे तुमच्या निरोगी आरोग्याची स्थिती दर्शवत असतात. प्रत्येकीला हळूहळू अनुभवातून तिच्या मासिक पाळीच्या लक्षणांविषयी जाणिव होऊ लागते. मासिक पाळीत मूड स्वींग होणं, पोटात क्रॅम्प्स येणं, पोटात गॅस होणं अशा गोष्टी तुम्हाला पुढे पुढे नित्याच्या वाटू लागतात. म्हणूनच या काळात काही सोप्या टिप्स पाळल्या तर तुम्ही नेहमीप्रमाणे आनंदी राहू शकता. 

या लेखातून आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही  तुमच्या मासिक पाळीतही फ्रेश राहू शकता. 

मासिक पाळीत आनंदी राहण्यासाठी टिप्स

मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी फॉलो करा या काही सोप्या टिप्स

हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा –

दिवसभरात मुबलक पाणी पिणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी गरजेचं आहे. मात्र एवढंच नाही जर तुम्ही दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पित असाल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. या टिप्समुळे तुम्हाला मासिक पाळीत फ्रेश वाटू शकतं. कारण पाण्यातून तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळीच्या काळातील वेदनेपासून आराम मिळतो. फार त्रास होत असल्यास कोमट अथवा  गरम पाणी पिण्याने तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. 

Shutterstock

मासिक पाळीत व्यायाम चुकवू नका –

निरोगी आणि सुडौल शरीरासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र काही जणी मासिक पाळीच्या काळात व्यायाम आणि योगासने करणे टाळतात. असं मुळीच करू नका कारण यामुळे तुम्हाला मासिक पाळीत येणाऱ्या वेदनेपासून मुक्तता मिळू शकते. यासाठी मासिक पाळीच्या काळात हलका व्यायाम अथवा स्ट्रेचिंग एक्सरसाईज अवश्य करा. 

पेनकिलचा हलका डोस घ्या –

जर तुम्हाला फार वेदना होत असतील तर अशावेळी एखाद्या पेनकिलरचा हलका डोस घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या  सल्लाने एखाद्या पेनकिलरबाबत सल्ला घ्या. पेनकिलर सतत घेणं नक्कीच योग्य नाही मात्र डॉक्टरांच्या सल्लाने एखाद्या वेळी पेनकिलर घेण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तुम्हाला मासिक पाळीतील तीव्र वेदनेपासून आराम मिळू शकतो.

Shutterstock

मोबाईल अॅपवर तुमचे मासिक पाळीच्या चक्राचा आढवा घ्या –

जेव्हा तुम्ही मासिक पाळीबाबत बेसावध असता तेव्हा तुम्हाला विनाकारण त्रास, संकोच  आणि अवघडलेपणा जाणवतो. मात्र जर तुम्हाला तुमची मासिक पाळी कधी येणार हे माहीत असेल तर तुम्ही तो त्रास सहन करण्यासाठी  तयार असता. म्हणूनच तुमच्या मोबाईलवर पिरिएड ट्रॅक करणारं अॅप डाऊनलोड करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पाळीचा अचूक अंदाज घेता येईल. यासाठी POPxo चं Gulabo अॅप तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल.

गरम पाण्याने अथवा हिट पॅडने पोट आणि पाठ शेकवा –

गरम पाण्याची पिशवी अथवा हिट पॅडने पाठ आणि पोट शेकवल्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटू शकतं. यासाठी हा उपाय जरूर करा.

योग्य आणि संतुलित आहार घ्या –

मासिक पाळीतील मूड स्वींग, पोटात येणारे क्रॅम्प, वेदना यापासून दूर राहण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कारण  तुम्हाला होणाऱ्या शारीरिक समस्या हे तुमच्या अपुऱ्या पोषणाचा एक भाग असतात. जर तुम्ही नियमित संतुलित आहार घेतला तर मासिक पाळीत होणारा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. यासाठी आहारात सुकामेवा, सोयाबीन, पालक, केळी अशा गोष्टींचा समावेश करा. 

भरपूर झोप घ्या –

ताणतणाव, दगदग, थकवा आणि अशक्तपणा कमी करण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे पुरेशी झोप घ्या. यासाठी या काळात पुरेशी झोप अवश्य घ्या. ज्यामुळे तुम्ही या काळातही आनंदी आणि फ्रेश दिसू शकता. तेव्हा या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या मासिक पाळीचा काळ सुखावह करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

एकत्र राहणाऱ्या मुलींची मासिक पाळीची तारीख का येते पुढेमागे, जाणून घ्या सत्य

Read More From आरोग्य